बसची काच फोडल्याची का होतेय चर्चा, सिटी लिंकच्या बसची काच फोडण्याचे कारण तर ऐका…
त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनचा विद्यार्थी दर्शन पाटीलच्या हाताला लागले आहेत, तो किरकोळ जखमी झाला असून या प्रकारामुळे सातपुर परिसरात गोंधळ उडाला आहे.

नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या सिटी लिंकच्या बसची काच फोडल्याची नाशिकमध्ये जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नाशिक शहरातील सातपुर परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये एक महाविद्यालयीन मुलगा देखील जखमी झाला आहे. त्याच्या हाताला काच लागली आहेत. दरम्यान, त्र्यंबकेश्वर रोडवरुन टोमॅटोची वाहतुक करणारा टेम्पो जात होता. बेळगाव ढगा परिसरात असताना सिटी लिंकच्या बसने टेम्पोला कट मारला. त्यावेळी मोठा अपघात होता होता राहीला असून मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक बिथरला होता. त्यामुळे सिटी लिंकच्या बस चालकाचा पाठलाग टेम्पो चालकाने सुरू केला होता. परंतु, सिटी लिंक कर्मचाऱ्यांने बस भरधाव वेगाने चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, टेम्पो चालकाने पाठलाग करत सिटी लिंकच्या पाठीमागील बाजूने जोरात दगडफेक केली. यामध्ये सिटी लिंकच्या बसची काच फुटली आहे.
टेम्पो चालकाने पाठीमागील बाजूने दगडफेक केली त्यात काच फुटली आणि त्याचे काही तिकडे बसमधील विद्यार्थ्यावर पडले त्यात एकाच्या हाताखाली दुखापत झाली होती.
मात्र बेशिस्तपने वाहन चालवणाऱ्या बस चालकाला टेम्पो चालकाने धडा शिकवला म्हणून या घटनेची चर्चा होऊ लागली आहे.
त्र्यंबकेश्वर रोडवरील संदीप फाउंडेशनचा विद्यार्थी दर्शन पाटीलच्या हाताला लागले आहेत, तो किरकोळ जखमी झाला असून या प्रकारामुळे सातपुर परिसरात गोंधळ उडाला आहे.
त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणाऱ्या सिटी लिंकच्या बस क्रमांक एमएच 15 जीव्ही 7694 चालकाला टेम्पो चालकाने सातपुर स्थानकावर बस थांबवून जाब विचारण्यास सुरुवात केल्याने मोठी गर्दी झाली होती.
सिटी लिंकचे कर्मचारी बेशिस्तपणे बस चालवत असल्याच्या अनेक तक्रारी होत असतांना सातपुर परिसरात घडलेला हा प्रकार चर्चेचा विषय ठरत असून सिटी लिंकला असाच धडा शिकवला पाहिजे अशी चर्चा होऊ लागली आहे.
