Special Story | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे सयाजीराव गायकवाड, गरिबी अनुभवलेला राजा

आपला जन्म कोणत्या घरात व्हावा हे आपल्या हातात नसतं. मात्र, त्या घराचं, समाजाचं आणि संपूर्ण देशाचं भविष्य उज्ज्वल करणं हे आपल्या हातात असतं (Story of Maharaja Sayajirao Gaekwad).

Special Story | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे सयाजीराव गायकवाड, गरिबी अनुभवलेला राजा
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 8:47 AM

मुंबई : आपला जन्म कोणत्या घरात व्हावा हे आपल्या हातात नसतं. मात्र, त्या घराचं, समाजाचं आणि संपूर्ण देशाचं भविष्य उज्ज्वल करणं हे आपल्या हातात असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका थोर व्यक्तीची माहिती देणार आहोत, ज्यांनी देशात इंग्रजांची राजवट असताना प्रत्येक क्षेत्रात दैदीप्यमान अशी कामगिरी केली. ती व्यक्ती म्हणजे बडोदा संस्थानचे संस्थापक छत्रपती सयाजीराव गायकवाड महाराज! सयाजीराव यांचा एक गुराखी ते राजा होण्याचा प्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. त्यांनी शिक्षण, नागरि सुविधा, वाचन संस्कृती वाढावी, क्रीडा, बँकींग अशा अनेक क्षेत्रांसाठी मौल्यवान कामगिरी केली. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी पडद्यामागून प्रचंड खटाटोपही केला (Story of Maharaja Sayajirao Gaekwad).

सयाजीराव गायकवाड यांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी एका गरीब शेतकऱ्याच्या घरात झाला. अनेक राजांनी गरिबी पाहिली होती, महाराजांनी गरिबी अनुभवली होती. गोपाळ असं त्यांचं लहाणपणीचं नाव होतं. गोपाळ काशिराव गायकवाड असे त्यांचे पूर्ण नाव होते. गोपाळच्या घराण्याचा संबंध बडोद्याच्या राजघराण्याशी होता. म्हणूनच बडोद्याच्या महाराणी जमनाबाई यांनी त्यांचे पती महाराज खंडेराव गायकवाड यांच्या निधनानंतर राजगाधीसाठी गोपाळला दत्तक घेतले. 27 मे 1875 रोजी बडोद्यास राज्यभिषेक समारंभ आटोपला आणि बाळराजांचे नाव सयाजीराव ठेवण्यात आले.

श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड भारतातील एकमेव राजे होते, ज्यांनी यशस्वीपणे 60 वर्षे राज्य केले होते. महाराजांनी लोककल्याणाची आणि प्रजाहीताची अतिशय महत्त्वाची कामे केली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ठ नागरी व्यवस्था उभारली. त्यांच्या कार्याची ख्याती भारतातच काय आख्या जगाला होती (Story of Maharaja Sayajirao Gaekwad).

डॉ. बाबासाहेबांना शिष्यवृती

सयाजीराव यांनी भारताचे महान घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी दरमहा पन्नास रूपये शिष्यवृत्ती दिली होती. त्याचबरोबर महाराजांनी बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी म्हणजेच पीएच.डी च्या पदवीसाठी अमेरिकेत पाठविले होते. महाराजांनी परदेशात त्यांचा शिक्षणाचा व वस्तीगृहाचा सर्व खर्च केला होता. त्यानंतर परदेशातून पदवी मिळवून आणल्यावर आंबेडकरांची महाराजांनी बडोद्यास सचिवालयामध्ये उच्च पदावरती नेमणूकही केली.

शिकागोच्या ‘जागतिक सर्वधर्म परिषदेचे’ प्रमुख अतिथी 

सयाजीराव गायकवाड हे तेच राजे होते जे 1933 साली अमेरिकेत शिकोगा येथे झालेल्या ‘जागतिक सर्वधर्म परिषदेचे’ प्रमुख अतिथी आणि तिथे भरलेल्या एका सभेचे प्रमुख अध्यक्ष होते. महाराज अतिशय सुंदर इंग्रजी बोलत. त्यांना उत्कृष्ट इंग्रजी भाषा बोलता येत होती. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जगात विद्वान मित्र झाली होती. महाराजा सयाजीराव गायकवाड हे इंगलंण्डच्या राणी ‘व्हिक्टोरिया’चे अतिशय लाडके होते. व्हिक्टोरिया राणीचे पुत्र ‘प्रिन्स ऑफ वेल्सशी’ महाराजांची घट्ट मैत्री होती. व्हिक्टोरिया राणीने महाराजांना ‘फरदंज-ई-खास’ आणि ‘दौलत-इ-इंग्लिशीया’ हे बहुमोलाचे किताब बहाल केले होते.

भारतीय उद्योगपती आणि स्वातंत्र्य सेनांनींसोबत जिव्हाळ्याचा संबंध

महाराज मुळचे महाराष्ट्रातील एका गरिब शेतकरी कुटूंबातील असल्यामुळे महाराष्ट्रातील विद्वान नेते आणि समाजसुधारक जोतिबा फुले, न्या.रानडे, लो.टिळक, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, जमशेदजी टाटा, वगैरे नेत्यांना महाराजांबद्दल प्रेम, सहानुभूती वाटत होती. महाराजांनी महाराष्ट्रातही महत्वाची आणि लोककल्याणाची कामे केली. त्यातील एक उदाहरण म्हणजे जोतिबा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाज’ चळवळीला पाठींबा दिला. त्याचबरोबर महाराजांनी वेळोवेळी आर्थिक साहाय्यही केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याबद्दल तर महाराजांना अतिशय प्रेम आणि आदर होता.

भारतातील पहिलं धरण बांधलं

महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या संस्थानात लोककल्याणाची आणि नागरी सोयीची असंख्य कामे केली. त्यांनी नागरी सोयींची सुरुवात त्यांच्या राज्यात पिण्याच्या पाण्यापासून केली. 1890 साली महाराजांनी बडोद्यापासून बारा मैलांवर सुर्या नदी आणि वागली नाला हे दोन जलप्रवाह अडवून भारतातील पहिले नाविण्यपूर्ण बांधकाम असलेले धरण बांधले.

शिक्षण क्षेत्रात मौल्यवान कामगिरी

सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यात शिक्षण प्रसार मोठ्या जोमाने केला. दारिद्रय, रोगराई, बेकारी, सारख्या समस्यांचे मुळ कारण शिक्षणाचा अभाव असल्याचे महाराजांना समजले होते. म्हणून त्यांनी गावागावांमध्ये शाळा सुरू केल्या आणि सक्तीने शिक्षण करावयास लावले. गरीब घरांमध्ये शिक्षणासाठी पैशांचा अभाव असल्यामुळे महाराजांनी गरिबांच्या मुलांसाठी ‘कमवा आणि शिका’ ही योजना आमलात आणली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला.

स्त्री शिक्षणासाठीदेखील मौल्यवान कामगिरी

महाराज सयाजीराव गायकवाड हे एकमेव असे राजे आहेत कि, ज्यांनी सुमारे 3500 गावांत शाळा सुरू केल्या होत्या. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ‘स्त्री शिक्षणालाही’ तितकेच उत्तेजण दिले. त्यांनी बडोद्यात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. त्यांच्या याही मोहीमेला इतका प्रतिसाद मिळाला कि, शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्याला जेवढ्या मुली शाळेत शिकायला येत त्याहीपेक्षा जास्त मुली बडोद्यातील शाळेत शिक्षणासाठी येत.

महाराजांनी आपल्या राज्यात वाचणालयांचा प्रचार मोठ्या प्रमाणात केले होते. त्यांनी बडोदे येथे ‘सेंट्रल लायब्ररी’ची स्थापना केली. त्याचबरोबर फिरते वाचणालयांचीही सुरूवात केली. त्या वाचनालयांचे नाव ‘सयाजी वैभव’ ठेवले. त्यामुळेच मोफत वाचणालयात बडोदा हे शहर अग्रगण्य आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, जळगाव, धुळे आणि बहुजन समाजातील जी शिकलेली माणसे दिसतात त्यांचे सर्विधिक श्रेय सयाजीराव महाराजांकडे आहे. महाराष्ट्रात त्यांच्या प्रेरणेने एक कर्तबगार पिढी निर्माण झाली. त्या पिढीने नवा महाराष्ट्र घडविला. छ. शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात, पंजाबराव देशमुख यांनी सयाजीराव महाराजांपासून स्फूर्ती घेऊन उभ्या महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे कार्य केले. त्याचबरोबर इतर राज्यांमध्येही महाराजांनी शिक्षणासाठी श्रम केले होते. बनारस विद्यापिठात ‘सर्वधर्म समभाव’ या समाजप्रबोधनाचे नेतृत्व विद्यार्थींमध्ये करून त्या विद्यापीठाला दोन लाख शिष्यवृत्ती दिली होती. त्याचप्रमाणे वेगवेगळया जाती-धर्माच्या लोकांसाठी शाळा सुरू केल्या होत्या.

बँक ऑफ बडोदाची स्थापना

शेतकरींसाठी महाराजांनी खूप महत्वाचे कामे केली होती. त्यातील एक उदाहरण म्हणजे दुष्काळाच्या वेळी बि-बियानांच्या, शेतीच्या खर्चासाठी स्वातंत्र्य बैकांची स्थापना केली होती. बँक ऑफ बडोदा ही सयाजीराव महाराजांनीच स्थापन केलेली बँक आहे. त्यामुळे शेतकरींना दुष्काळाच्या वेळी आधार मिळत होता. त्याचबरोबर महाराजांनी शेतकरी आणि गरिब लोकांवरील करांचे ओझे रद्द केले होते.

स्वातंत्र्य लढ्यातही महत्वाची कामगिरी

श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांनी स्वातंत्र्य लढ्यातही महत्वाची कामगिरी बजावली होती. परंतु त्यांनी सर्व कामे गुप्तपणे पार पाडली. कारण त्या काळात सर्वत्र इंग्रजांची सत्ता होती. इंग्रजांनी सर्व संस्थानांना आपल्या काबीज केले होते. राजांना नुकतेच नामधारी ठेवले होते. सगळे संस्थाने इंग्रजांच्या राजवटीखाली डूबत चालल्या होत्या. मात्र, पाच-सात संस्थाने या परिस्थिला अपवाद होते. बडोदे संस्थानही त्यातील एक होते.

इंग्रजांनी महसूलचा,पैशेपाण्याचा बराचसा अधिकार आणि सुत्रे हाती घेतले असली तरी राजाला इतर सर्व स्वातंत्र्य होती. ते नागरिकरण करू शकत होते. आणि या गोष्टीचे त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य होते. बरेच संस्थानिक राजे ऐशोआरामात जीवन घालवथ होते. मात्र सयाजीराव गायकवाड यांनी लोककल्याणाची असंख्य कामे केली होती. पिण्याच्या पाण्यापासून, रस्ते ते सांडपाणी पर्यंतचे कामे महाराजांनी केले होते. त्याचबरोबर भारत स्वातंत्र्य व्हावा यासाठीही अतोनात श्रम केले होते. त्याकाळात बरेचसे भारतीय हे झोपेतच होते. त्यांना स्वातंत्र्य म्हणजे काय? हेच ज्ञात नव्हते. शिक्षणाचा अभाव ही खूप मोठी समस्या होती. या जुलमी ब्रिटीश शासनाविरोधी जागृती व्हावी म्हणून शिक्षण सुरू केले होते. आपले शासन आदर्श बनविण्याकडे त्यांचा कल होता आणि ते त्यांनी करून दाखवलेच. न्यायमूर्ती रानडेंपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत आणि विवेकानंदापासून ते अरविंदापर्यंत सर्वांनी त्यांना या कार्यात मदत केली. आपल्या देशातील प्रजा सुक्षित आणि राष्ट्रवादी व्हावी यासाठी महाराज विद्याथ्यांना लष्करी व इतर शिक्षणासाठी परदेशात पाठवत.

उद्योगपती जमशेदजी टाटांना मदत

उद्योगपती जमशेदजी टाटा आणि महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या दोघांमध्ये घट्ट मैत्री आणि जिव्हाळ्याचा संबंध होता. महाराज नेहमी कामानिमित्य विदेशाय विशेषत: युरोपीय देशांत जात. तेथील आवाढव्य, विशाल आमि आकर्षित खानावळी, भव्य वास्तू पाहूण आपल्याही देशात असे वास्तू असावेत आणि आपल्या देशातील गरिबांनाही त्याचा उपभोग व्हावा असे महाराजांना सतत वाटत असायचे. मग एके दिवशी महाराजांनी ही इच्छा जमशेदजी टाटांकडे सांगितले. टाटांचीही खूप दीवसांपासूनची हीच इच्छा होती. मग महाराजांनी त्या वास्तूसाठी खर्च करण्याची जबाबदारी घेतली आणि भव्य ‘ताजमहल हॉटेल’ची निर्मिती झाली. परंतू , खंताची बाब अशी, गरिबांसाठी बनवलेली ही वास्तू आज त्यांना परवडणारी नाही. फक्त मोठमोठे उद्योगपति आणि विदेशी लोकच याठीकाणी जाऊ शकतात.

महाराजांनी जमशेदजी टाटांना त्यांचा ‘टाटा केमिकल्स’ कारखाना उभा राहावा, यासाठी भरपूर आर्थिक मदत केली होती. त्याचपणे त्या काळात इंग्रज अधिकारी भारतीय उद्योगपतींना सुरळीतपणे व्यावसाय करू देत नसत. नेहमी या ना त्या कारणाने व्यथ्य आणत असत. जमशेदजी टाटांना महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ‘टाटा आयर्न अॅन्ड स्टील’ कारखाना सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली. त्याचबरोबर त्यांचे मनोबल वाढवले. एका भारतीय कारखानदाराने आपल्याशी स्पर्धा करावी ही गोष्ट इंग्रज अधिकाऱ्यांना आणि शेफिल्डमधील कारखानदारांना रूचत नव्हती. परंतू, सयाजीराव गायकवाड जमशेदजींच्या पाठीशी उभे असत. महाराज नेहमी टाटांना पैसा आणि धीर देत. जमशेदजी टाटांना महाराजांविषयी खूप कृतज्ञता होती. स्वातंञ्य लढ्यातही महाराज पडद्यामागे उभे राहून स्वातंञ्यासाठी कामे करत. मग ती बंगालची फाळणी रद्द करण्यासाठी असो किंवा गांधीजींची दांडीयाञा.

चक्रवती राजगोपालचारी यांनी म्हणटले होते, “इंग्रजांशी मैत्री ठेवून सयाजीराव स्वातंञ्य चळवळीला जी मदत करीत त्यातच त्यांची मुत्सेद्देगिरी दिसून येते. असे, मुत्सद्दी संस्थानिक सयाजीराव महाराज एकमेव होते.” गोलमेज परिषदेतही महाराज सयाजीराव गायकवाड उपस्थित होते. त्याचबरोबर म.गांधी, पं.नेहरू, डॉ.सुमंत मेहता, मादाम कामा, विनायक रामचंद्र गोखले अशी बरीच मंडळींचे महाराज श्रद्धास्थान होते.

…तर सयाजीराव देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष असते

1915 साली गदर पार्टीची लष्करी योजना सफल झाली असती, तर महाराज सयाजीराव गायकवाड स्वातंञ्य भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष असते. महाराज सयाजीराव गायकवाड इतके कौशल्यवाण होते कि, स्वातंञ्याठी केलेल्या कामांचे धागे-दोरेही इंग्रजांना मिळत नसत. त्यामुळेच महाराजांनी स्वातंञ्यासाठी केलेल्या बरेच कामांची नोंद इतिहासकारांना घेता आली नसावी. बार्डोली तालुक्यात वल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या साराबंधी चळवळीने घरादारास मुकलेल्या शेतकऱ्यांना महाराजांनी आश्रय दिला. त्यामूळे ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये कुझबूझ चालू झाली होती. महाराजांनी यावरील विरोध झुगारून लावला होता.

श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड श्वास सुटण्या अगोदर खान्देशात आणि तेथील नातेवाईकांची भेट घेऊन आले होते. खान्देशात तर घरोघरी गुढी उभारल्या होत्या. परंतु, अशा लोकनायकाचा शेवटी मुंबईच्या महालात श्वास सुटला. देशाचा विकासाचा मोठा दिवा विझला होता. सगळीकडे शोकाकुलता पसरली होती. प्र.के.अञेंनी ‘मराठा’मध्ये पूर्ण पानभर त्या राजाची कृतज्ञता व्यक्त केली होती. तसेच देशाच्या बरेच साहित्यीकांनी महाराजांवरती पोवाडे, कवितांनी आदरांजली वाहिली होती.

(टीप : लेखातील माहिती ज्येष्ठ लेखक निंबाजी पवार यांच्या ‘जेव्हा एक गुराखी राजा होतो’ या पुस्कातून संपादीत करण्यात आली आहे)

आमच्या आणखी काही स्पेशल स्टोरी वाचा : 

Special Story | आईसोबत भाजीविक्री, नंतर शिक्षक ते अधिकारी, सुदाम महाजन यांचा थक्क करणारा प्रवास !

Special Story | संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कामगिरी, मराठमोळ्या अधिकाऱ्याची कर्तबगार कहाणी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.