AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Story | आईसोबत भाजीविक्री, नंतर शिक्षक ते अधिकारी, सुदाम महाजन यांचा थक्क करणारा प्रवास !

आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत, त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, अशी भावना हृदयात ठेऊन शेकडो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तहसीलदार सुदाम महाजन नेहमीच तत्पर असतात (Story of Tahsildar Sudam Mahajan).

Special Story | आईसोबत भाजीविक्री, नंतर शिक्षक ते अधिकारी, सुदाम महाजन यांचा थक्क करणारा प्रवास !
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 30, 2021 | 8:44 AM
Share

मुंबई : सुदाम म्हणजे योग्य असं दाम. सुदाम म्हटलं की, डोळ्यांसमोर उभे राहतात ते श्रीकृष्णाचे मित्र सुदाम. त्यांची दोघांमधील ती जीवलग आणि निष्ठावंत मैत्री. त्यांच्या याच निष्ठावंत प्रतिमेचे प्रतिबिंब आजही काही लोकांमध्ये जाणवताना दिसते. त्या लोकांमधील सुदाम महाजन हे एक नाव. आजच्या घडीला मायभूमीशी एकनिष्ठ राहून मायमातीशी घट्ट असं नातं जपणारे अधिकारी म्हणून नावलौकीक मिळवणारे अशी त्यांची ख्याती (Story of Tahsildar Sudam Mahajan).

आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत, त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, अशी भावना हृदयात ठेऊन शेकडो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तहसीलदार सुदाम महाजन नेहमीच तत्पर असतात. समाजाप्रती असणारा जिव्हाळा आणि कळकळीमुळे त्यांच्या सहवासातील लोकांनाही समाजासाठी काम करण्याची भुरड पडते. त्यांच्या सामाजिक कामकाजांपैकी इंधन वाचविण्याच्या मोहीमेचा गाजावजा सर्वत्र खान्देशात झाला होता. अगदी इयत्ता तिसरी-चौथी चिमुकल्यांनीही सुदाम महाजनांना या मोहिमेत साथ दिली होती. त्याचबरोबर दुष्काळ आणि शेतकरींचे समीकरण ध्यानात ठेऊन त्यांनी पाणी फाऊंडेशनचे काम हाती घेतले होते (Story of Tahsildar Sudam Mahajan).

महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका म्हटलं की पाण्याची बोंबच बोंब. या तालुक्यात दरवर्षी फक्त तीस ते चाळीस टक्के पाऊस पडतो. त्यामुळे पाणी ही येथील गंभीर समस्या. या समस्येचे निवारण व्हावे यासाठी सुदाम महाजन यांनी एकट्याने पाणी फाऊंडेशनचे शिवधनुष्य हाती घेतले. त्यांनी स्वतः जातीने कुदळ घेऊन जमीन खणली. आपल्या सोबताली काम करणार्‍या इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात त्या कामाबद्दल गोडी निर्माण केली. आणि एक नवा इतिहास रचला. त्यांच्या या कार्याची दखल प्रसारमाध्यमांनीही घेतली. अखेर सुदाम महाजनांचे धोरण जिंकले आणि शिंदखेडे तालूक्यात सत्तर टक्के पाण्याचा प्रश्न सुटला.

कोरोना काळात सुदाम महाजन यांनी केलेलं काम शब्दात सांगता येणार नाही. कोरोनामुळे निधन झालेल्या अनेक बेवारस रुग्णांना त्यांनी स्वत: पीपीई किट परिधान करत अग्नी दिला. त्यांच्या संवेदनशील मनाचं आणखी एक उदाहरण म्हणजे कोरोना काळात लोककलावंतांना त्यांनी मनापासून प्रचंड मदत केली. त्यांच्या कार्यालयात मदतीसाठी येणाऱ्या लोककलावंताचे ते आधी सत्कार करत. त्यानंतर त्यांना ते मदतही करायचे.

समजासाठी झटणाऱ्या या अवलिया अधिकारीचा जन्म अमळनेरच्या एका मोलमजूरी करणार्‍या घराण्यात झाला. तीन भाऊ नंतर मुलगी हवी, अशी आशा घरच्यांनी बाळगली असताना, सुदाम नावाचा हिरा जन्माला आला. परंतू, मुरगी न झाल्याने घरच्यांनी नाकं मुरडली. त्यामुळे त्यांच्या बालपणाला लाडीगोडीची भावना ज्ञात झाली नाही.

घरात अठरा विश्ल दारिद्र्य. अंगावरती धड घालायला कपडे नव्हते. ज्या दिवशी दोन वेळचं जेवन मिळायचं तो दिवस उत्साहाचा मानला जाई. निमंत्रण नसतानाही कुठल्याही पंगतीत बसायला जायचं. लोकांनी कितीही थिटकारलं, उठवलं तरीही लागटपणे पंगतीला बसायचं. आई भाजी विकायची आणि घरादाराचं पालनपोषण करायची, अगदी जमेल तसं. परंतु, शिक्षणाची प्रचंड इच्छाशक्तीने सुदाम महाजनांनी आकाशात उंच अशी भरारी घेतली.

सुदाम महाजनांचे दहावी पर्यंतचे शिक्षण अमळनेरच्या साने गुरूजी शाळेत झाले. त्यानंतर डी.एड. साठी जळगावला नंबर लागला. जाण्यायेण्यासाठी पैसे नसल्याने अमळनेर ते जळगाव फुकट प्रवास करावा लागला. परंतु, डी.एड. पुर्ण झाल्यावरती लगेच अमळनेरच्या साने गुरुजी शाळेत शिक्षक म्हणून नौकरी मिळाली. आपण ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत गुरूजी म्हणून नौकरी मिळणे यापेक्षा कुठलाच आनंद मोठा नाही.

2000 मध्ये जिल्हा परिषद जळगाव कडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. 2002 मध्ये लोकसेवा आयोगाच्या परिषेत महाजन उत्तीर्ण झाले आणि नव्या प्रवासाला सुरूवात झाली. सुरूवातील सुदाम महाजन अमळनेरला नायब तहसीलदार म्हणून लागले. त्यानंतर नायगांव, नाशिक, शिंदखेडा अशा बर्‍याच ठिकाणी अधिकारी म्हणून कर्तव्य पार पाडत राहीले.

आमच्या आणखी स्पेशल स्टोरी वाचा :

Special Story | संयमी स्वभाव आणि धडाकेबाज कामगिरी, मराठमोळ्या अधिकाऱ्याची कर्तबगार कहाणी

Special Story | नारपार प्रकल्प : महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...