Tukaram Munde on Dairy Products: आता दुधात भेसळ करणाऱ्यांचं काही खरं नाही, तुकाराम मुंडेंचा सर्वात मोठा निर्णय, थेट…
तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार स्विकारल्यापासून कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत अनेक हॉटेल्स आणि इतर ठिकाणांवर एफडीएकडून छापे टाकण्यात आले आहेत. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारताच कारवाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत एफडीकडून अनेक हॉटेल आणि जिथे -जिथे अन्न पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा संशय आहे, अशा अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात गोवा, गुटखा या सारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आहे, मात्र तरी देखील तुकाराम मुंडे हे एफडीचे आयुक्त होण्यापूर्वी या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री कधी चोरीच्या मार्गाने तर कधी खुलेपणाने सुरूच होती. याविरोधात तुकाराम मुंडे यांनी कडक अॅक्शन घेतली आहे, या प्रकरणातील आरोपींविरोधात मोकोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.
दरम्यान मुंडे यांनी आता आपला मोर्चा हा दुधात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. त्यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे, ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध जाणं हा ग्राहकांचा हक्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी आता दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना नवे नियम लागू केले जाणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुंडे?
ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध जाणं हा ग्राहकांचा हक्क आहे. भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी आता दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना नवे नियम लागू केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांची बैठक देखील घेण्यात आली आहे. दूध संकलन केंद्र, दूध शितकरण सेंटर, दुग्ध प्रतिक्रिया युनिट्स, आणि उत्पादक, वितरक, वाहतूकदार, घाऊक विक्रेते यांना देखील हे नियम लागू असणार आहेत. यासोबतच नवे नियम हे किरकोळ दूर विक्रेते यांना देखील लागू असणार आहेत. पनीर, खवा, तूप, दही, चीज, दूध पावडर या सारख्या उत्पादनावरही नवे नियम लागू असतील, अशी माहिती यावेळी तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे आता दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. या मुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.