भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न कधी-कधी झाला? सुनील तटकरे यांचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गौप्यस्फोट

"लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी मोठ्या मनाने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. देशात वेगळं वातावरण होतं. राज्यात वेगळं वातरण होतं. निवडणुकीत अपप्रचार केला गेला. त्यामुळे काही मतदार आमच्यापासून दुरावले गेले", असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न कधी-कधी झाला? सुनील तटकरे यांचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात गौप्यस्फोट
अजित पवार आणि सुनील तटकरे यांचा फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 6:34 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी भाषण केलं. “निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केलीय. 2004 मध्ये लोकसभेमध्ये फार काही यश मिळालं नव्हतं. पण विधानसभेत मोठं यश मिळालं. सर्वात जास्त मतं विधीमंडळात छगन भुजबळ यांना मिळाली होती. तरी भुजबळ मुख्यमंत्री झाले नाही. बारामतीमध्ये सर्वात जास्त मताने निवडून आलेले अजित दादा होते. शरद पवार यांना मंत्रीपदाचा 7 वर्षाचा अनुभव होता. तेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. तसंच अजितदादांचादेखील 7 वर्षाचा अनुभव होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता”, अशी खंत सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.

“भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची चर्चा 2014 मध्ये झाली होती. आम्ही 2016 मध्येही भाजपसोबत जात होतो. पण भाजपसोबत शिवसेना होती म्हणून आम्हाला तेव्हा शिवसेना चालत नव्हती. 2019 मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजपसोबत जायचं ठरलं होतं”, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केलं.

‘अजित पवार पहिल्या रांगेत बसले ते काहींना पचत नाही’

“लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांनी मोठ्या मनाने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. देशात वेगळं वातावरण होतं. राज्यात वेगळं वातरण होतं. निवडणुकीत अपप्रचार केला गेला. त्यामुळे काही मतदार आमच्यापासून दुरावले गेले. आपण एक जागा जिंकलेली आहे, तरी आपला कार्यकर्ता खचून गेलेला नाही. आपल्याला आता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आपले अजित दादा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसले होते ते काही लोकांना पचत नाही”, असं सुनील तटकरे म्हणाले.

“काही लोक बोलत आहेत की, दिल्लीमध्ये लाचारी करावी लागत आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझी आपल्या सर्व प्रवक्तांना विनंती आहे की, जागा संदर्भात काहीही बोलू नये. ना समोरच्या सहयोगी पक्षाचे प्रवक्ते काही बोलतील. सर्वांना वाटत होतं की, मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे. प्रसारमाध्यमांवर काही बातमी चालत होती. तेव्हा सांगितलं होतं की, संख्याबळाच्या आधारे एक जागा मिळेल. मी सांगितलं की, प्रफुल्ल पटेल यांना मंत्री बनवा. मी अजित दादांना संकटात आणणार नाही”, अशी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली.

सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.