ऑडिओ क्लिप व्हायरल | आमदार संतोष बांगर समर्थकाकडून महिला कार्यकर्त्याला शिव्या, पण उद्धव ठाकरे म्हणतात…

अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

ऑडिओ क्लिप व्हायरल | आमदार संतोष बांगर समर्थकाकडून महिला कार्यकर्त्याला शिव्या, पण उद्धव ठाकरे म्हणतात...
| Updated on: Sep 28, 2022 | 12:13 AM

मुंबई : युवा सेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ-पाटील यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर(Santosh Bangar) यांच्या समर्थकांनी फोन करून धमकावणे अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर या प्रकरणात मुंबईच्या भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अयोध्या पौळ पाटील यांनी सांगितलं की, मी याकडे दुर्लक्ष करत होते. पण, पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना सर्व प्रकाराची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी मला पोलिसात तक्रार करण्यास सांगितले.

यांनतर मी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते योग्य कारवाई करतील. माझ्या सोबत पक्ष प्रमुख आणि माझे इतर वरिष्ठ नेते, शिवसैनिक सर्वजण आहेत.

17 जुलैला संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर अयोध्या यांनी एक पोस्ट लिहिली होती. 17 जुलैपासून सातत्याने फोन वरुन धमक्या आल्याचा अयोध्या यांचा आरोप आहे.

संतोष बांगर यांच्या समर्थकांनी फोन करून धमकावणे अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे कॉल रेकॉर्डींग उद्धव ठाकरें पर्यंत पोहोचली आणि त्यांचा मला फोन आला.

उद्धव ठाकरेंनी मला धीर दिला. पोलिसात तक्रार दे असेही सांगीतले. म्हणून मी आज तक्रार दिल्याचे त्यांनी सांगीतले. पोलिसांनी माझी तक्रार दाखल करुन घेतली आहे. लवकरच मला न्याय मिळेल.