डिलिमिटेशनवरून शिंदे बाप-लेकीत मतमतांतर, मुलगी विरोधात, वडिलांची वेगळी भूमिका

डिलिमिटेशन विधेयकावरून शिंदे कुटुंबातच वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांचा विरोध असताना सुशीलकुमार शिंदे यांनी विधेयकाचे समर्थन केले. शरद पवार यांच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

डिलिमिटेशनवरून शिंदे बाप-लेकीत मतमतांतर, मुलगी विरोधात, वडिलांची वेगळी भूमिका
Sushilkumar Shinde Delimitation
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 28, 2026 | 6:09 PM

सध्या देशामध्ये डिलिमिटेशन बिलावरून देशामध्ये राजकीय उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. मतदारसंघ विधेयकला पारित करण्यासाठी मोदी सरकारने सोमवारपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात या विधेयकावर काय चर्चा होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच, भाजपप्रणित एनडीए आघाडीला या विधेयकाला पास करण्यासाठी आणखी खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. पक्षाने तसा पाठिंबा दिला असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत आहे. दुसरीकडे स्टॅलिन यांच्या डीएमकेनेही या बिलाला पाठिंबा दिला आहे.

पण आता राज्यातील महत्त्वाचे काँग्रेस नेते आणि शरद पवारांचे एकेकाळचे सहकारी आणि सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे वडिल ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका समोर आली आहे. पण यावेळी बाप लेकींमधील भूमिकांमध्ये बदल पाहायला मिळाला आहे. वडिलांची व मुलीची दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आल्या आहेत. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेत मतभेद असल्याचे समोर आले आहे.

Loading...

डिलिमिटेशन विधेयकाला प्रणिती शिंदे यांचा विरोध असताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र या विधेयकाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. लोकसंख्या वाढली असेल तर लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याचवेळी शरद पवार यांच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

‘ही काँग्रेसशी नाही, तर देशाशी गद्दारी’

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी शरद पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसह इतर मुद्द्यांवर काँग्रेसची साथ घेतली. मात्र, आता डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस विधेयकाच्या बाजूने मतदान करत असेल, तर ती काँग्रेसशी गद्दारी नाही, तर देशाशी गद्दारी आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात जाऊन डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याची एवढी काय मजबुरी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा केवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीसोबत राहण्याचा विषय नसून देश, संविधान आणि लोकशाहीशी संबंधित विषय असल्याचे ते म्हणाले.

डिलिमिटेशन होणे गरजेचे, सुशीलकुमार शिंदेंची भूमिका

काँग्रेसने डिलिमिटेशन विधेयकाला अद्याप विरोध दर्शवला असला, तरी आपले वैयक्तिक मत वेगळे असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. डिलिमिटेशन होणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढत असेल, तर त्यानुसार लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली पाहिजे. त्यामुळे डिलिमिटेशन होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us