AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सीएसएमटी बस स्टॉपजवळ संशयित बॅग आढळल्यानं खळबळ, बस डेपो केला रिकामा

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या सीएसएमटी बस स्टॉपजवळ संशयित बॅग आढळल्यानं खळबळ उडाली आहे, घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी हा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला होता.

मोठी बातमी! सीएसएमटी बस स्टॉपजवळ संशयित बॅग आढळल्यानं खळबळ, बस डेपो केला रिकामा
संशयित बॅग Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 14, 2025 | 5:58 PM
Share

दिल्लीमध्ये सोमवारी मोठा स्फोट झाला, या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले, या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. पोलीस अजूनही अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान त्यानंतर आता मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबईच्या सीएसएमटी बस स्टॉपजवळ आज एक लाल रंगाची संशयित बँग आढळून आली आहे. या रस्त्यावर नेहमी गर्दी असते, त्यामुळे या ठिकाणी संशयित बँग आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली, दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबतच आरपीएफ आणि जीआरपीचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं. या बँगमध्ये नेमकं काय आहे, याचा शोध बॉम्बशोधक पथकाकडून घेण्यात आला.

बस डेपो केला रिकामा 

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार  मुंबईच्या सीएसएमटी बस स्टॉपजवळ आज एक लाल रंगाची संशयित बँग आढळून आली आहे. या रस्त्यावर नेहमी गर्दी असते, संशयित बँग आढल्यानं एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, आरपीएफ आणि जीआरपीचं पथक घटनास्थळी दाखल झालं. बॉम्बशोधक पथकाकडून या बँगेमध्ये नेमकं काय आहे, याचा शोध घेण्यात आला, खबरदारी म्हणून यावेळी संपूर्ण बस डेपो रिकामा करण्यात आला होता.

बँगमध्ये काय आढळलं?  

बॉम्बशोधक पथकाकडून या बँगेची तपासणी करण्यात आली. या बँगमध्ये नेमकं काय आहे? काही घातपाताचा तर कट नाहीना? या बॅगेला इथे नेमकं कोण सोडून गेलं असे अनेक प्रश्न सुरुवातीला होते, दरम्यान त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून या बॅगेची तपासणी करण्यात आली,  तपासणीदरम्यान या लाल रंगाच्या बँगमध्ये कपडे आणि काही वस्तू आढळून आल्या आहेत, त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र ही बॅग नेमकी कोणाची आहे, हे अद्याप समोर आलेलं नाहीये, पोलिसांकडून या बॅगेचा पंचनामा करण्यात आला आहे, दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....