
बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. सोलापूर- धुळे महामार्गालगत एका कारमध्ये या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहासोबत कोयता देखील आढळून आल्यामुळे घातापाताचा संशय व्यक्त होत आहे. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे, सचिन जाधवर हे कालपासून बेपत्ता होते, त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. सोलापूर- धुळे महामार्गालगत एका कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला, तसेच याच कारमध्ये एक कोयता देखील आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड जिल्हा चर्चेत आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती बीड पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सचिन जाधवर असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते कालपासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या पत्नीने बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. आज दुपारी सचिन जाधव यांची कार सोलापूर – धुळे महामार्गालगत आढळून आली, त्या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केली असता सचिन जाधवर हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले, दरम्यान त्यांच्या कारमध्ये एक कोयता देखील आढळून आला आहे. दरम्यान सचिन जाधवर यांचा मृतदेह बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे.
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसच्या नूतन नगरसेवकांचा आमदार विश्वजीत कदमांनी केला सत्कार
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
घटनेनं खळबळ
बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. त्यातच आता एका सरकारी अधिकाऱ्याचा मृतदेह कारमध्ये संशयास्परित्या आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.