पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कृषी कार्यालयात तोडफोड

जिल्ह्याला खरीप पीक विमा अनुदानातून वगळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करत पीक विमा द्या, अशी घोषणाबाजी केली.

पीक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कृषी कार्यालयात तोडफोड
Follow us
| Updated on: Jan 20, 2020 | 5:38 PM

उस्मानाबाद : जिल्ह्याला खरीप पीक विमा अनुदानातून वगळल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले (Swabhimani Shetkari Sanghatana). त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करत पीक विमा द्या, अशी घोषणाबाजी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात 2019 च्या सुरुवातीला भीषण दुष्काळ होता. त्यामुळे नापिकीची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपाल यांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने हेक्टरी 8 हजार रुपयांची मदत केली (Crop insurance).

उस्मानाबाद जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ही 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर पाऊस आणि पाणीसाठाही कमीच आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, हे मान्य करते. दुसरीकडे, पीक विमा कंपन्या मात्र पीक विमा नाकारतात. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संतप्त कार्यकर्तेनी कृषी अधीक्षक कार्यालयात तोडफोड करत पीक विम्यासाठी आंदोलन केलं.

उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आगामी काळात पीक विम्याचा आणि विमा कंपनीच्या मनमानी कारभाराचा मुद्दा चांगलाच पेटणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.