AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तेलंगणामध्ये कारचा भीषण अपघात; मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या पोर्ट झोनमध्ये पोस्टिंग असलेले पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये हा अपघात झाला.

मोठी बातमी! तेलंगणामध्ये कारचा भीषण अपघात; मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2025 | 6:19 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, मुंबईच्या पोर्ट झोनमध्ये पोस्टिंग असलेले पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ते हैदराबादला ट्रेनिंगसाठी गेले होते. त्यानंतर ते आज आपल्या एका नातेवाईकासोबत ज्योतिर्लिंग श्रीशैलमच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातामध्ये सुधाकर पठारे आणि त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत मुंबई पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएस सुधाकर पठारे तेलंगणाच्या श्रीशैलमहून नगरकुरलुनकडे निघाले होते. याचदरम्यान त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पोलीस अधिकारी सुधाकर पठारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकाचा देखील मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे ज्या कारने प्रवास करत होते, ती कार ट्रकला धडकली या भीषण अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होतं आहे.

सुधाकर पठारे हे अहमदनगर जिल्ह्यातील वळवाने गावचे रहिवासी होते. आयपीएस होण्यापूर्वी त्यांनी विविध विभागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून काम केलं होतं. सुधाकर पठारे यांनी एमएस्सी अ‍ॅग्री आणि एलएलबीची पदवी देखील मिळवली होती. 1995 साली स्पर्धा परीक्षेत यश मिळून ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक बनले होते. त्यानंतर 1996 साली सेल्स टॅक्स विभागामध्ये ते क्लास वन ऑफिसर झाले. 1998 मध्ये त्यांची निवड पोलीस उपाधीक्षकपदी झाली. त्यानंतर ते 2011 ला आयपीएस बनले.

आतापर्यंत सुधाकर पठारे यांनी पंढरपूर अकलूज, कोल्हापूर शहर आणि राजुरा या ठिकाणी पोलीस उपाधीक्ष म्हणून देखील काम केलं. सध्या त्यांची नियुक्ती मुंबईमध्ये होती. मात्र अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांनी सुधाकर पठारे यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ‘आयपीएस सुधाकर पठारे जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त दुःखद आहे. पठारे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो.त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.भावपूर्ण श्रद्धांजली’ असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी