निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? गुन्हा दाखल होणार? बडया नेत्याच्या दाव्याने खळबळ

निवडणूक आयोगातील मतभेद उघड झाल्यानंतर आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत आल्याची चर्चा आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा दावा बड्या नेत्याने केला आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार अडचणीत? गुन्हा दाखल होणार? बडया नेत्याच्या दाव्याने खळबळ
dyanesh kumar news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 2:32 PM

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदावरून राजकारण तापलं आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका रिपोर्टमधून ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभारावरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाचा नारा दिला आहे. तर काही राजकीय पक्षांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो, असा दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. सोलापुरात माध्यमांशी संवाद साधताना अंधारे म्हणाल्या, ‘ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ज्ञानेश कुमार यांनी जे बहुमत भाजपकडे दिले, त्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही एक एफआयआर तयार केलाय. त्यानुसार ज्यांची नावे डिलीट झाली, त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल करावा. ज्यांची मत चोरी झाली, त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल करावा’.

अंधारे पुढे म्हणाल्या, ‘मी सोलापूरची मतदार नाही. त्यामुळे मी FIR दाखल करणार नाही. पण आमचे जिल्हाप्रमुख, कार्यकर्ते हे दाखल करतील. आम्ही कमळाचे बटन दाबले नाही, पण कमळ फुलले कसे? असे अनेक लोक सांगत आहेत. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. मात्र ज्ञानेश कुमार म्हणजे निवडणूक आयोग नाहीत. त्यामुळे 3 पैकी 2 जण विरोधात असतील तर बहुमताने ज्ञानेश कुमार हे एकटे आहेत आणि विरोधात 2 जण आहेत. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. निवडणूक आयोगाचा प्रवक्ता म्हणून भाजपच्या बडभुज्यांनी बोलू नये. नमुना 6 मध्ये जिथे जिथे गडबड झाली, तिथे तिथे गुन्हा दाखल झाला पाहिजे. कपिल सिब्बल यांचेही नाव मतदार यादीत नाही’.

‘ जस्टीस लोहिया, अजितदादा, गोपीनाथ मुंडे यांची फाईल ओपन होत नाही. नैतिकतेचा आणि भाजपचा काय संबंध आहे. झालेल्या निवडणुका रद्द करा आम्ही आत्ता निवडणूक लढायला तयार आहे. भाजपचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे. एकीकडे जीडीपी वाढला म्हणतात आणि दुसरीकडे तेल कमी खा म्हणून सांगता. देवेंद्र फडणवीस कितीही हसतमुखाने बोलले, तरी तुमची चोरी उघडी पडलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अहंकार बाजूला ठेवावा आणि हिम्मत असेल तर चर्चेला या, असं आव्हान अंधारे यांनी दिलं.

शेतकरी आत्महत्येवरून अंधारे म्हणाल्या, ‘ बार्शीचे शेतकरी सुभाष माळी नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. आत्महत्या हा उपाय नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. लढा अवघड आहे पण हिम्मत हरायची नाही. बाप शेतात लढतोय आणि दुसरीकडे पेपरफुटीविरोधात मुलगा शहरात लढतोय’. दुष्काळ स्थितीवर अंधारे म्हणाल्या, ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे गोडबोल्या आणि साखरझेल्या असे बोलून गेले. देवेंद्र फडणवीस यांना शेतातले फार काही कळतं नाही. एकीकडे सांगतायत की 130 दिवस पुरेल इतका चारा आहे. देवेंद्रजी, मराठवाड्यात भर पावसात उन्हाच्या झळा लागत आहेत’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us