ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद; थेट कल्याणला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी

ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टिप्पणी केली. जाणून नेमकं काय घडलं?

ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये वाद; थेट कल्याणला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 10, 2026 | 3:19 PM

राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. ऐन दिवाळीतच शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. एकनाथ शिंदे यांनी अंतर्गत वादावरून आपल्याच पालकमंत्र्यांना सुनावलं. शिंदे गटानंतर आता भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद समोर आले आहेत. खरंतर दोन्ही नेत्यांमध्ये आधीपासूनच वाद असल्याचे दिसून आलंय. आता दिवाळीच्या दिवशी देखील दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वाद समोर आले. वादामुळे कल्याण पश्चिम भागात भाजपचे दोन दिवाळी पहाट दिसल्याने पक्षातील अंतर्गत वाद उघडकीस आले. याचेवळी कल्याणला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी समोर आली आहे. त्यावरूनही दोन्ही नेत्यांमधील मतभेद उघड झाले.

कल्याण पश्चिमेत भाजपच्या दोन दिवाळी पहाट दिसल्या. दिवाली पहाटच्या माध्यमातून कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे समर्थकांनी या कार्यक्रमातून शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा आहे.  किसन कथोरे यांनी नव्या नेतृत्वाचे कौतुक केले. दुसरीकडे कार्यक्रम कोणी आयोजित केला, यापेक्षा जनता आपल्यासोबत असल्याची टिप्पणी कपिल पाटील यांनी केली. यावेळी नव्या जिल्ह्याची सुरुवात कल्याणमधून व्हावी, असं म्हणत कल्याणला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी किसन कथोरे यांनी केली.  तर राज्यातील आर्थिक आणि दुष्काळी परिस्थिती पाहता स्वतंत्र जिल्ह्यासाठी अतिरिक्त खर्च करणे सरकारला शक्य नसल्याने स्वतंत्र जिल्हा लगेच होणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया कपिल पाटील यांनी दिली. दोन्ही नेत्यांचं विधान, दोन कार्यक्रमांमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.

Loading...

भाजप आमदार किसन कथोरे नेमकं काय म्हणाले?

कल्याणला जिल्ह्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. कल्याणला उपजिल्ह्याचा दर्जा देत रितसरपणे जीआर काढला. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो. त्यांनी काहीतरी मागणीचा विचार झाला. जनगणनेनंतर ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन कल्याण जिल्हा होण्याचे हे पहिलं पाऊल आहे. निश्चितपणे कल्याण जिल्हा होणार आहे. आज आमच्या मागणीला यश आलं आहे. कल्याणला उपजिल्हा मिळाल्याने सर्व तालुक्यांना फायदा होणार आहे’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us