AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election: ‘गोकुळ’वर महायुतीचा झेंडा! विजयानंतर हसन मुश्रीफांची गर्जना, ‘अमुल’चं नाव घेत म्हणाले…

पहिल्या वर्षी राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेले आहे, पुढच्या वर्षी कोणाचा अध्यक्ष करायचा हे आम्ही ठरवू," असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे. 

Gokul Election: 'गोकुळ'वर महायुतीचा झेंडा! विजयानंतर हसन मुश्रीफांची गर्जना, 'अमुल'चं नाव घेत म्हणाले...
| Updated on: Nov 10, 2026 | 3:37 PM
Share

Kolhapur Gokul Election 2026:  गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. गोकुळच्या दूध संघ अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. नाट्यमय घडामोडीनंतर गोकुळवर महायुतीने झेंडा फडकवला असून राजेश पाटील हे एका मताने निवडून आले आहेत. या विजयानंतर मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांनी जल्लोष करत सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोकुळवर महायुतीचा झेंडा, कुणाला किती मते?

“गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार  राजेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. राजेश पाटील यांना १६ मते पडली असून ते नुतन चेअरमन झालेत. भविष्यात साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. पहिल्या वर्षी राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेले आहे, पुढच्या वर्षी कोणाचा अध्यक्ष करायचा हे आम्ही ठरवू,” असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

या निवडणुकीमध्ये महायुती अतिरेक करत आहे असं नॅरेटिव्ह पसरवले गेले. याबद्दल राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशामुळेच गोकुळच्या कामाकाजाला स्थिरता आली. भविष्यकाळात गोकुळच्या कामकाजाबद्दल शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.

हसन मुश्रीफांची गर्जना! 

“गोकुळच्या निवडणुकीत दूध संघ अमुलला विकण्याचा घाट घालण्यात येत आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. मात्र आज आम्ही सांगतो रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही अमुल वगेरे काही करणार नाही तज्ज्ञ संचालकांनी त्यांच्या सददविवेक बुद्धीने मतदान केलं आहे. सतेज पाटील यांनी त्यांची पुढील रणनिती आखावी, त्यांचा मार्ग मोकळा आहे. कोर्टामध्ये सुनावणी चालू राहील. आमचे संचालक मंडळ दूध उत्पादकांना न्याय देईल,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना थेट इशाराही दिला आहे.

Follow Us
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?