AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul President Election : अध्यक्षाची निवड होताच गोकुळमध्ये क्षणात मोठा ट्विस्ट? वर्षानंतर पुन्हा अध्यक्ष बदलणार? महायुतीचा फॉर्म्यूला नेमका काय ठरला?

महायुतीच्या सर्व घटकांना समावून घेतलं जाईल. सध्या पहिल्या वर्षी राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला पाहिजे असं आमचं एकमत झालं. पढच्या वर्षी कोणाचा अध्यक्ष झाला पाहिजे ते आम्ही त्यावेळी बसून ठरवू, असं धनंजय महाडिक म्हणाले.

Gokul President Election : अध्यक्षाची निवड होताच गोकुळमध्ये क्षणात मोठा ट्विस्ट? वर्षानंतर पुन्हा अध्यक्ष बदलणार? महायुतीचा फॉर्म्यूला नेमका काय ठरला?
gokul milk sanghImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 3:44 PM
Share

Gokul President Election : कोल्हापूमधील गोकुळ या दूध उत्पादक संघावर कोणाचा अध्यक्ष होणार, कोण बाजी मारणार याकडे फक्त महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सरकारने तज्ज्ञ चार संचालकांची नेमणूक करून त्यांना मतदानाचा हक्क दिल्याने गोकुळमध्ये मोठा उलटफेर घडून आलाय. गोकुलमध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलला सर्वाधिक जागा मिळालेल्या असल्या, त्यांनी निवडणूक जिंकलेली असली तरीही गोकुळच्या अध्यक्षपदी मात्र महायुतीचे राजेश पाटील विराजमान झाले आहेत. सतेज पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, महायुतीच्या राजेश पाटील यांची गोकुळ संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे महायुतीच्या नेत्यांनी घोषित केले आहे. सध्या महायुतीचा वरचष्मा असल्याचे दिसून येतेय. दरम्यान, राजेश पाटील यांची निवड झालेली असली तरीही ते किती काळ या पदावर असणार, असा प्रश्न निर्माण झालाय. भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी केलेल्या विधानानंतर तर आणखी संभ्रम वाढला आहे.

धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले?

अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर धनंजय महाडिक यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन कोल्हापुरातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला,” असे कौतुक महाडिक यांनी केले. फडणवीसांनी चार तज्ज्ञ संचालकांची नेमणूक केली. त्यांनी कोंडी फोडण्याचे काम केले. त्यांनी कोंडी फोडली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप संभ्रम निर्माण केला. त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवला,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

राजेश नरसिंग पाटील यांचे नाव आम्ही एकमताने…

ते (सतेज पाटील) न्यायालयामध्ये गेले. न्यायालयानेही त्यांना चपराक दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे माजी आमदार असलेले राजेश नरसिंग पाटील यांचे नाव आम्ही एकमताने अध्यक्षपदासाठी दिले. आज या ठिकाणी 16 मतं राजेश पाटील यांना मिळालेली आहेत. राजेश पाटील हे चेअरमन झाले आहेत, अशी माहितीही महाडिक यांनी दिली.

भविष्यात या जिल्ह्यातील साडे पाच लाख शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार आमचे संचालक, चेअरमन करतील. दूध उत्पादकांना अधिकचा दर देण्याच्या दृष्टीकोनातून आमचे कामकाज असेल, असे आश्वासनही यावेळी महाडिक यांनी दिले.

महायुतीचा फॉर्म्यूला नेमका कसा असेल?

सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड करताना महायुतीचा नेमका फॉर्म्यूला काय ठरलाय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर बोलताना महायुतीच्या सर्व घटकांना समावून घेतलं जाईल. सध्या पहिल्या वर्षी राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला पाहिजे असं आमचं एकमत झालं. पुढच्या वर्षी कोणाचा अध्यक्ष झाला पाहिजे ते आम्ही त्यावेळी बसून ठरवू. सध्यातरी राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, अशी माहिती महाडिक यांनी दिली. दरम्यान, सध्या राजेश पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असली तरीही ते या खुर्चीवर किती वर्षे असतील असे या निमित्ताने विचारले जात आहे. पुढच्या वर्षी पुन्हा काही फेरबदल होणार का? असा संभ्रमात टाकणारा प प्रश्न आता उपस्थित झालाय.

Follow Us
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?