AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | झाडावर धडकून कार उलटली, ठाण्यात विहंग्स इन हॉटेलसमोर भीषण अपघात

कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातं. (Thane Accident Car Overturn )

VIDEO | झाडावर धडकून कार उलटली, ठाण्यात विहंग्स इन हॉटेलसमोर भीषण अपघात
ठाणे घोडबंदर रोडवर कार पलटली
| Updated on: Mar 15, 2021 | 12:45 PM
Share

ठाणे : कार झाडावर धडकून उलटल्यामुळे ठाण्यात घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला. ‘विहंग्स इन हॉटेल’च्या समोरच सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातातून चालक बचावला आहे. अपघातग्रस्त गाडीची दृश्यं समोर आली आहेत. (Thane Ghodbunder Road Accident Car Overturn near Vihangs Inn Hotel)

सोमवारी (15 मार्च) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातं. गाडी झाडाला धडकल्यानंतर भररस्त्यातच पलटी झाली. पण सुदैवाने चालक या अपघातातून बालंबाल बचावला. जखमी कार चालकाला रुग्णालयात दाखल करण्याते आले.

ठाण्याहून नवी मुंबईला जाताना अपघात

हा अपघात ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विहंग्स इन हॉटेलच्या समोरच घडला. ही गाडी ठाण्याहून घोडबंदर रोड मार्गे नवी मुंबई येथे जात असतानाच हा अपघात घडल्याची माहिती आहे. अपघातानंतर वाहतूक पोलिस आणि ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन विभाग यांनी ही गाडी बाजूला करुन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला.

पाहा व्हिडीओ :

ठाण्यात काही महिन्यांपूर्वी विचित्र अपघात झाला होता. वाघबीळ उड्डाणपुलावरुन पुठ्ठ्यांनी भरलेला ट्रक जात होता. यावेळी चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेले पुठ्ठ्यांचे गठ्ठे उड्डाणपुलाखाली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीवर पडले. त्यात एका गाडीचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता.

संबंधित बातम्या :

ठाण्यात विचित्र अपघात, पुलावरील अपघातग्रस्त ट्रकमधील पुठ्ठ्यांचे गठ्ठे गाडीवर पडले, एकाचा मृत्यू

ठाण्यात एसटीचा भीषण अपघात, महिलेनं गमावले दोन्ही पाय

(Thane Ghodbunder Road Accident Car Overturn near Vihangs Inn Hotel)

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.