AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणं हादरलं ! किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच…

ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलबाहेर एका ओला चालकाने किरकोळ कारणावरून वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात वृद्ध जमिनीवर कोसळले. शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्या ओला चालकाला पकडून 'शिवसेना स्टाईलने' चोप दिला. आरोपीला वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

ठाणं हादरलं ! किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच...
ठाण्यात वृद्धाला परप्रांतीय चालकाकडून मारहाण
| Updated on: Jun 10, 2026 | 11:00 AM
Share

गुन्ह्यांच्या अनेक घटनांनी राज्यात सध्या गदारोळ माजला आहे. कुठे चोरी, कुठे दरोज, खून तर कधी अत्याचार मुंबईपालून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाण्यात घडलेल्या घटनेने अख्खं शहर हादरलं आहे. ठाण्यात एक वयोवृद्ध नागरिकाला परप्रांतीय चालकाने बेदम मारहाण केल्याचे समोर आहे. अगदी किरकोळ कारणावरून त्या चालकाने वृद्ध नागरिकाला मारला, बेदम मारहाण केली, त्यातच तो वृद्ध माणसून खाली पडून जखमीही झाला. एवढंच नव्हे तर तो चालक सातत्याने त्या इसमाला शिव्याही देत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

मात्र सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली. आणि त्या ‘त्या’ परप्रांतीय ओला चालकाचा तत्काळ शोध घेत त्याला पकडून शिवसेना स्टाईलने चोप दिला. त्यानतंर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

परप्रांतीय ओला चालकाची वृद्धाला शिवीगाळ आणि बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या बाहेर काल संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास एका परप्रांतीय ओला चालकाचा किरकोळ कारणावरून वृद्ध व्यक्तीशी वाद झाला. मात्र त्यीनमंतर त्या चालकाने त्या व्यक्तीचं वय, स्थळ काळ काहीच न पाहात, त्या इसमाला डायरेक्ट मारहाण सुरू केली. त्या वृद्ध माणसाला त्या चालकाने मारलं, खाली ढकललं, तो दाणकन खाली आपटला. त्याच्यासोबत असेलली वृद्ध महिला त्याला वाचवायचा प्रयत्न करत होती,. मात्र संतापलेला चालक त्याला आणखीनच मारत होता, वरतून त्याने त्याला शिवीगाळही केली. आसपासच्या लोकांनी त्याला समजावण्याचा प्रय्तन केला, मात्र त्याने कोणाचच ऐकलं नाही. त्याच्या शिव्या सुरूच होत्या.

हा धक्कादायक प्रकार व्हिडीोत कैद झाला आणि कोणीतरी तो सोशल मीडियावर अपलोड करताच पाहता पाहता प्रचंड व्हायरल झाला. यामुळे ठाणेकर हादरले, लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे सुमित बोराडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे नितेश पाटोळे हे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी पाहिला. त्यानंतर, दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी, बोराडे आणि पाटोळे यांनी तात्काळ शोध घेऊन ‘त्या’ परप्रांतीय ओला चालकाला पकडलं आणि शिवसेना स्टाईलने चोप दिला. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी आरोपीला तात्काळ वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं. त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर