AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradeep Punekar Case : ‘चला मिनाक्षी शिंदे स्वत:हून अटक होतील, पण..’ प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिंदेच्या खासदाराने ठेवली एकच अट

Pradeep Punekar Case : "संजय राऊत तुमच्यात हिम्मत असेल तर पाटकरांच्या ऑडिओ क्लिप टाका. स्वप्ना पाटकरांनी सुद्धा आरोप केलेले आहेत. आम्हाला सुद्धा या गोष्टी करता येतात. पण अशा पद्धतीचं राजकारण आम्हाला करायचं नाही" असं नरेश म्हस्के म्हणाले.

Pradeep Punekar Case : 'चला मिनाक्षी शिंदे स्वत:हून अटक होतील, पण..' प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिंदेच्या खासदाराने ठेवली एकच अट
Meenakshi Shinde- Pradeep Punekar
| Updated on: Oct 02, 2026 | 1:42 PM
Share

“पुरवणी एफआयआरमध्ये जबरदस्ती नाव टाकलेलं आहे. एफआयआरमध्ये नाव आहे म्हणून अटक करा बोलत असाल तर दिशा सालियन प्रकरणात पहिल्यापासून नाव आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी म्हटलय की, मुख्यमंत्रीपदाचा आधार घेऊन पुरावे नष्ट केले. आदित्य ठाकरे जबाबदार आहे. त्याला अटक करा. चला मिनाक्षी शिंदे स्वत:हून अटक होतील” असं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. “तुमच्यात हिम्मत असेल, मिनाक्षी शिंदेंना अटक करा म्हणत असाल तर दिशा सालियन प्रकरणात अटक करा. काय दुटप्पी धोरण लावलय. आता टीव्हीवर बघितलं, दिनो मारियोला साक्षीदार म्हणून बोलवलय. दिशा सालियन प्रकरण, मिठी नदी गाळ घोटाळ्यात त्याचं नाव आहे. तुमच्यासोबत सतत फिरत असतो” असं नरेश म्हस्के म्हणाले.

“त्याला सुद्धा चौकशीसाठी बोलावलं पाहिजे. कसल्या गप्पा मारताय. राजकारण करा पण आपल्या एका कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा मृत्यू झालाय त्याच्या मूळ गुन्हेगारांना अटक करण्याऐवजी प्रकरणाला वेगळं वळण देताय. कसलं राजकारण करताय” अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन आता शिंदे शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे. “संजय राऊत कसल्या ऑडिओ क्लिप प्रकाशित करताय. संजय राऊत तुमच्यात हिम्मत असेल तर पाटकरांच्या ऑडिओ क्लिप टाका. स्वप्ना पाटकरांनी सुद्धा आरोप केलेले आहेत. आम्हाला सुद्धा या गोष्टी करता येतात. पण अशा पद्धतीचं राजकारण आम्हाला करायचं नाही” असं नरेश म्हस्के म्हणाले.

पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात ठाकरे गट शिंदेंच्या शिवसेनेला गोवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आता एकनाथ शिंदे शिवसेना दिशा सालियन प्रकरणावरुन आक्रमक झाली आहे. मिनाक्षी शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरुन प्रश्न विचारले. “दिशा सालियन प्रकरणात तिचे वडिल सहावर्ष पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते. त्या एफआयआरमध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरेंच नाव आहे. मला संजय राऊतला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, ती पण कोणाची तरी मुलगी होती. अशावेळी तुम्ही आदित्य ठाकरेला अटक करा अशी मागणी केली का?”

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद