Pradeep Punekar Case : मला संजय राऊतला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, मग दिशा सालियनच्यावेळी.. प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंनी सोडलं मौन
Pradeep Punekar Case : एखादी व्यक्ती मरते, ती मेल्यानंतर टाळवूरच लोणी खाण्याचा प्रयत्न सुरु आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत घाणेरड राजकरण करत आहेत. पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड सुरु आहे.

“एखादी व्यक्ती मरते, ती मेल्यानंतर टाळवूरच लोणी खाण्याचा प्रयत्न सुरु आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत घाणेरडं राजकरण करत आहेत. पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड सुरु आहे. हे पाहून खूप वाईट वाटलं. एखाद्या महिलेला अडकवण्यासाठी धडपड चालू होती. मेल्यावर बॉडीची विटंबना करण्याचा प्रयत्न सुरु होता” असा आरोप ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केला. ठाण्याचे उद्धव ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदे यांच्यावर आरोप होत आहेत. त्या पार्श्वभूमी मिनाक्षी शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. “हा संवदेनशील विषय आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एफआयआरमध्ये नाव टाकण्यासाठी धडपडत होते. कोणताही पुरावा नसताना माझ्यावर बेछूट आरोप करतायत. असं घाणेरडं राजकारण मी माझ्या 20 वर्षाच्या करिअरमध्ये बघितलेलं नाही. एका महिलेला गोवण्यासाठी हे सर्व चाललं आहे” असं मिनाक्षी शिंदे म्हणाल्या. शिंदे गटातले कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांना अडकवण्यासाठी धडपड चालू आहे असं शिंदे म्हणाल्या.
“दिशा सालियन प्रकरणात तिचे वडिल सहावर्ष पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते. त्या एफआयआरमध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरेंच नाव आहे. मला संजय राऊतला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, ती पण कोणाची तरी मुलगी होती. अशावेळी तुम्ही आदित्य ठाकरेला अटक करा अशी मागणी केली का?” असा सवाल मिनाक्षी शिंदे यांनी विचारला. “एफआयआरमध्ये माझं नाव टाकून मला अटक करा अशी मागणी करताय. त्याआधी या प्रकरणाचा उलगडा केला पाहिजे. उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते. पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेला अटक झाली पाहिजे” अशी मागणी मिनाक्षी शिंदे यांनी केली.
उद्या विमान हायजॅक झालं, तर मिनाक्षी शिंदे यामागे आहे असं म्हणाल का?
“प्रकरण पोलीस हाताळतायत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. जे कोणी दोषी असतील ते निष्पन्न होईल. मला असं वाटतय की, दिशा सालियन प्रकरणात एफआयआर कॉपी बघा, आदित्य आणि उद्धव ठाकरेंची नाव लिहिलेली आहेत. कोणी आरोप करत असेल तर पुरावे द्यावे लागतील. ज्या प्रकरणाशी माझं काही देण-घेण नाही. उद्या विमान हायजॅक झालं, तर मिनाक्षी शिंदे यामागे आहे असं म्हणाल का? बिनबुडाचे आरोप थांबवावेत” असं मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर काय म्हणाल्या?
“मी पोलिसांना चौकशीत सर्व सहकार्य करीन. मी कोणतही भाष्य करणार नाही. पोलीस चौकशीत सहकार्य करीनं” असं मिनाक्षी शिंदे म्हणाल्या. तुमचा आरोपींसोबत फोटो आहे, यावर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या की, “माझा या प्रभागात जन्म झाला. माझे आणि माझ्या नवऱ्याचे प्रत्येकाशी चांगले संबंध आहेत. कोणी फोटो दाखवले म्हणून आम्ही आरोपी ठरत नाही. फोटो पुरावा म्हणून ग्राह्य धरत असाल तर ते चुकीचं आहे” व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या मुद्यावर म्हणाल्या की, “ती AI जनरेटेड ऑडिओ क्लिप आहे. ती व्हायरल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. माझा आणि ऑडिओ क्लिपचा काहीही संबंध नाही”
