Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकात 1 कोटी रकमेसह 9 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त, रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफची कारवाई

रेल्वे मार्गाने होणारी अवैध सामानाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग सक्रीय झाले आहेत. काल बुधवारी 25 मे रोजी हैद्राबादकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयाच्या अवैध मालमत्तेची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफ पथकाला मिळाली होती.

Kalyan Crime : कल्याण रेल्वे स्थानकात 1 कोटी रकमेसह 9 लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त, रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफची कारवाई
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 7:51 PM

मुंबई : हैद्राबादकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांच्या अवैध सामानाची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्‍यांना मिळाली होती. आरपीएफ व सीआयबीच्या पथकाने या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकावर आलेल्या देवगिरी एक्स्प्रेसमधून पाच संशयित इसमांना ताब्यात (Detained) घेतलं. गणेश मरिबा भगत, मयुर वालदास भाई कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून 1 कोटी 1लाख 55 हजार रुपयांची रोकड (Cash) आणि 9 लाख 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे (Gold Biscuits) जप्त केली आहेत. आरोपींनी आपण कुरिअर कंपनीसाठी काम करत असून कुरिअर पोचविण्यासाठी आल्याची माहिती दिली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याची तस्करी मागच्या रहस्याचा पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोध सुरु आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई

रेल्वे मार्गाने होणारी अवैध सामानाची तस्करी रोखण्यासाठी रेल्वेचे सर्व विभाग सक्रीय झाले आहेत. काल बुधवारी 25 मे रोजी हैद्राबादकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयाच्या अवैध मालमत्तेची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेल्वेच्या सीआयबी आणि आरपीएफ पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीआयबी निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जीएस एडले यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचला होता. आरपीएफचे निरीक्षक प्रकाश यादव आणि तुकाराम आंधळे यांनी तीन वेगवेगळ्या बोगीमध्ये 5 जण संशयितरित्या प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले.

एक कोटी रोकडसह सोन्याची बिस्किटे आढळली

या पाच जणांना सामानासह ताब्यात घेत त्यांच्या सामानाची झडती घेतली असता एकाच पार्सलमध्ये 9 लाख 14 हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे असलेले 3 बॉक्स तर इतर चौघांच्या पार्सलमध्ये मिळून 1 कोटी 1 लाख 55 हजार रुपयाची रोकड असल्याचे आढळून आली. या पाचही जणांनी आपण वेगवेगळ्या कुरिअर कंपन्यासाठी नांदेड, औरंगाबाद, परभणीमध्ये काम करत असून मस्जिद बंदरमधील संबंधित कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे पार्सल पोचविण्याचे काम आपल्याला देण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पुढील चौकशीसाठी ठाणे आयकर विभागाने या पाचही जणांना ताब्यात घेतले असून रेल्वेच्या आरपीएफ विभागाने ही रोकड आणि सोने ताब्यात घेत जप्त केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. (9 lakh gold biscuits along with Rs 1 crore seized at Kalyan railway station)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.