आठ दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता, फक्त क्रिकेट खेळण्याचं निमित्त झालं… तरुणावर काळाचा घाला

भिवंडीत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ऐन दिवाळीत या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्याच्या गावावरही शोककळा पसरली आहे.

आठ दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता, फक्त क्रिकेट खेळण्याचं निमित्त झालं... तरुणावर काळाचा घाला
Ganesh Patil Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 7:59 PM

संजय भोईर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, भिवंडी | 15 नोव्हेंबर 2023 : आयुष्य हे क्षणभंगूर असतं. याचा प्रत्यय वारंवार येत असतो. त्यामुळे जपून राहणे, काळजी घेणं आणि स्वत:ला फिट ठेवणं हेच आपल्या हातात असतं. पण एवढं करूनही काळ कधी येईल हे सांगता येत नाही. आज हसतखेळत असणारी व्यक्ती पुढच्या क्षणाला असेल की नाही याचा भरवसा नसतो. भिवंडीतही अशीच एक दुर्देवी आणि वेदनादायी घटना घडली आहे. गेल्याच आठवड्यात साखरपुडा झालेल्या एका तरुणाचा अचानक मृत्यू झाला आहे. त्यामुळे या तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

गणेश रामदास पाटील असं या तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 27 वर्षाचा आहे. भिवंडीत तालुक्यातील कोनगाव येथे हा तरुण राहतो. दिवाळीनिमित्त गावात क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. बॉक्स क्रिकेटच्या या सामन्यात गणेशही सहभागी झाला होता. क्रिकेट खेळत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गणेशवर उपचारही करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

आठ दिवसांपूर्वीच साखरपुडा

गणेश पाटील याचा गेल्या आठवड्यातच साखरपुडा झाला होता. ऐरोलीत मोठ्या थाटामाटात हा साखरपुडा पार पडला होता. लग्नाची तारीख ठरवून लवकरच त्याचं लग्नही करण्यात येणार होतं. पण त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. गणेशच्या अचानक जाण्याचा पाटील कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. गणेश आपल्यात नाही याच्यावर त्याच्या कुटुंबीयांचा विश्वासच बसत नाहीये. तर गणेशच्या जाण्यामुळे संपूर्ण गावही दु:खात बुडाला आहे. ऐन दिवाळीत गावावर शोककळा पसरली आहे.

मित्रांनाही धक्का

दरम्यान, गणेश याच्या मित्रांनाही गणेशच्या निधनामुळे धक्का बसला आहे. सोबत क्रिकेट खेळत असताना अचानक गणेशला अस्वस्थ वाटले आणि तो आपल्यातून कायमचा निघून गेला याचा त्यांना धक्का बसला आहे. तसेच एवढ्या कमी वयात हृदयविकाराचा धक्का येऊन होत्याचं नव्हतं होऊ शकतं याची भीतीही अनेकांच्या मनात बसली आहे.

Non Stop LIVE Update
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं UNCUT भाषण; विरोधकांचा घेतला समाचार.
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल
जय शाहाला बॉलिंग, बॅटिंग तरी येते का? 'त्या' टीकेवरून कुणाचा हल्लाबोल.
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा
ठाकरे की शिंदे धक्का कुणाला? हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटात?कुणाचा दावा.
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा
राज्यात लोकसभेच्या भाजपच्या 23 जागा फिक्स, निरिक्षकांचीही घोषणा.
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात
फडणवीसांवर केलेल्या जरांगेंच्या टिकेनंतर भाजपनं छापली पानभर जाहिरात.
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.