भन्नाट ट्रीप, अवघ्या 2800 रुपयांत जीवाची इटली केली, घेतला स्पा आणि पिझ्झाचा आस्वाद

आपण 'अरांड द वर्ल्ड इन ऐट डॉलर' सारखे जुने हिंदी सिनेमा पाहिला असेल किंवा ऐकूण तरी असाल, असाच प्रकार एका अवलियाने केला आहे. त्याने केवळ पिझ्झा खाण्यासाठी इटलीचे मिलान शहर गाठले आणि तेथे मस्तपैकी स्पामध्ये रिफ्रेश झाला. नंतर पिझ्झा तर खाल्लाच शिवाय दिवसभर तेथील साईट पाहून मस्त मजेत वेळ घालविल्याचे उघड झाले आहे.

भन्नाट ट्रीप, अवघ्या 2800 रुपयांत जीवाची इटली केली, घेतला स्पा आणि पिझ्झाचा आस्वाद
MILANImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 7:40 PM

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : प्रत्येकाला वाटते की आपल्याकडे प्रचंड पैसा असावा आणि त्या पैशातून आपण अख्ख्या जगाची सफर करावी. त्यामुळे पैसे मिळविण्यासाठी मनुष्य जीव तोडून मेहनत करीत असतो. कारण सर्व सोंग करता येतात. मात्र पैशाचं सोंग करता येत नाही, त्यासाठी खिशात पैसा हा असावाच लागतो. परंतू ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याचेच स्वप्न पूर्ण होते असा काही नियम नाही. काही लोक आपल्या डोक्यानं कमी पैशात देखील आपलं स्वप्न पूर्ण करुन दाखवितात. असा एक किस्सा समोर आला आहे. एका अवलियाने कमी पैशात इटलीची सैर करीत स्पामध्ये रिफ्रेश होत पिझ्झा खाऊन मजा केल्याचे उघड झाले आहे.

इंग्रजी वेबसाईट डेली स्टारमध्ये आलेल्या बातमीनूसार इंग्लंडमध्ये रहाणाऱ्या एका व्यक्तीने इटलीच्या मिलान येथे केवळ तेथील पिझ्झा खाण्यासाठी स्पामध्ये अंघोळ करण्यासाठी दौरा केला. त्याने त्याचा संपर्ण दौऱ्याचा तपशील सोशल मिडीयात शेअर केला आहे. सोशल मिडीयावरील या व्यक्तीची पोस्ट वाचून सर्वजण हैराण झाले आहेत. की इतक्या कमी पैशात त्याने ही इटलीची ट्रीप कशी काय केली ?

कशी आणि किती पैशात इटलीची ट्रीप ?

आपली कहानी या व्यक्तीने सोशल मिडीयावरील एक्स ( आधीचे ट्वीटर ) वर पोस्ट केली आहे. त्याने म्हटले आहे की त्याने इटलीच्या मिलान शहरातील ट्रीप केवळी 2802 रुपयांत पूर्ण केली आहे. एवढ्या पैशात त्याने इटलीच्या मिलान शहरात पोहचला आणि संपूर्ण दिवस त्याने मौजमजा केली आहे. आपल्या ट्वीटर खात्यावर या व्यक्तीने लिहीले की आपण सर्वात आधी मिलान शहरात जाऊन स्पा घेतला आणि स्वत:ला रिलॅक्स केले आणि संपूर्ण दिवस वेगवेगळ्या साईट्स पाहत वेळ घालविला. त्यानंतर तेथील जेवण एन्जॉय केले.

ट्वीटरवरील पोस्ट येथे पाहा –

या शिवाय या व्यक्तीने आपला संपूर्ण प्रवासाची प्लान ट्वीटरवर शेअर केला आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की सकाळी 5.45 वाजता 2802 रुपयांची फ्लाईट पकडून मिलानला गेला. स्पा डे, पास्ता, पिस्ताशियो पिझ्झा, गेलॅटो आस्वाद घेतल्यानंतर तो रात्री 8.30 वाजता लंडनला परतला. हे पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधी देखील एका महिलेने आपल्या मित्रासोबत ती मिलान शहरात स्पासाठी गेली आणि दुसऱ्या दिवशी मुलं शाळेत जाण्यापूर्वी आपल्या घरी परतली देखील.

Non Stop LIVE Update
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं
... तेव्हा झोपले होते, भाजपच्या नेत्यानं आरक्षणावरून कुणाला सुनावलं.
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?
सुनील प्रभूंवर साक्ष बदलण्याची वेळ! शिंदेंच्या वकिलांनी काय केले सवाल?.
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?
राजीनाम्याची मागणी तर कॅबिनेटमध्ये भुजबळांवरून चर्चा अन् दिली तंबी?.
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?
मराठा आरक्षणावरून सरकार मोठा निर्णय घेणार? हिवाळी अधिवेशनात काय घडणार?.
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?
१५ दिवसांची मुदत अन्यथा नागपुरात..., तुपकर यांचा निर्वाणीची इशारा का?.