Ulhasnagar Crime : उल्हासनगरात भरधाव दुचाकीस्वाराची दोघांना धडक, फरार दुचाकीस्वाराला दोन महिन्यांनी बेड्या

| Updated on: May 09, 2022 | 12:53 AM

डोंबिवलीला राहणारे गोकुळ आणि राधा सिंग हे 18 मार्च रोजी उल्हासनगरात नातेवाईकांकडे आले होते. रात्री उशिरा ते घरी परतत असताना त्यांच्या मागून एका दुचाकीवर भरधाव वेगात दोन जण आले. या दोघांपासून काही फुटांवर असताना ही दुचाकी स्लिप झाली आणि थेट गोकुळ आणि राधा सिंग यांना जाऊन धडकली.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात भरधाव दुचाकीस्वाराची दोघांना धडक, फरार दुचाकीस्वाराला दोन महिन्यांनी बेड्या
देशातील पहिला रॅपिड रेल्वे प्रकल्पाच्या ठिकाणी मोठी दुर्घटना
Image Credit source: tv9
Follow us on

उल्हासनगर : भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेत महिलेचा मृत्यू (Death) झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी फरार दुचाकीस्वाराला दोन महिन्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील लाल साई गार्डन परिसरात 18 मार्च रोजी होळीच्या रात्री उशिरा एक अपघात (Accident) झाला होता. एका जोडप्याच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीने धडक दिली होती. यात दुचाकीवरील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला होता. आता दोन महिन्यांनी तो उल्हासनगरात परतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. करण लबाना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Accused arrested in woman’s death in Ulhasnagar two-wheeler collision)

आरोपीच्या दुचाकीच्या धडकेत जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

डोंबिवलीला राहणारे गोकुळ आणि राधा सिंग हे 18 मार्च रोजी उल्हासनगरात नातेवाईकांकडे आले होते. रात्री उशिरा ते घरी परतत असताना त्यांच्या मागून एका दुचाकीवर भरधाव वेगात दोन जण आले. या दोघांपासून काही फुटांवर असताना ही दुचाकी स्लिप झाली आणि थेट गोकुळ आणि राधा सिंग यांना जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती, की हे दोघेही काही फूट हवेत उडून खाली कोसळले. या घटनेत राधा सिंग यांना गंभीर दुखापत होऊन त्या कोमात गेल्या आणि काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे या अपघातानंतर दुचाकी चालवणारा करण लबाना हा तरुण मात्र फरार झाला. दोन महिन्यांनी प्रकरण शांत झालं असेल, असं समजून तो उल्हासनगरात परतला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Accused arrested in woman’s death in Ulhasnagar two-wheeler collision)

हे सुद्धा वाचा