AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्र्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप, फेसबुकवर झाली मुलीशी मैत्री, लग्नाचं आमिष, केला गर्भपात?

जयपूर – २३ वर्षांच्या तरुणीने राज्स्थानच्या एका मंत्र्याच्या (Rajasthan)मुलाविरोधात नवी दिल्लीत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जलसंपदा मंत्री डॉ. महेश जोशी (Minister Mahesh Joshi)यांचा मुलगा रोहित याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशा येणारे पेय देऊन अनेकदा बलात्कार (rape)केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. अनेकदा कपाळावर सिंदूर भरुन त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याचाही तरुणीचा आरोप […]

मंत्र्याच्या मुलावर बलात्काराचा आरोप, फेसबुकवर झाली मुलीशी मैत्री, लग्नाचं आमिष, केला गर्भपात?
Rajsthan minister son accusedImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: May 08, 2022 | 9:17 PM
Share

जयपूर – २३ वर्षांच्या तरुणीने राज्स्थानच्या एका मंत्र्याच्या (Rajasthan)मुलाविरोधात नवी दिल्लीत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जलसंपदा मंत्री डॉ. महेश जोशी (Minister Mahesh Joshi)यांचा मुलगा रोहित याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशा येणारे पेय देऊन अनेकदा बलात्कार (rape)केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. अनेकदा कपाळावर सिंदूर भरुन त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याचाही तरुणीचा आरोप आहे. तरुणी आपली पत्नीच असल्याचे सांगत लवकरच लग्न करण्याचे खोटे आश्वासनही रोहितने दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही लग्नाआधीच हनीमूनलाही गेले होते. त्यानंतर या तरुणीला गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपातही मंत्र्याच्या मुलाने घडवून आणल्याचा या तरुणीचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तर दिल्लीत एफआयआर नोंदवण्यात आला असून, तो पुढे जोधपूरला तपासासाठी पाठवण्यात आला आहे.

फेसबुकवर झाली होती मैत्री

रोहित जोशीशी तिची ओळख फेसबुकवर झाल्याचे या तरुणीने सांगितले आहे. सुरुवातीला दोघे फेसबुकवर बोलत होते, नंतर ते एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर ८ जानेवारी २०२१ रोजी या तरुणीला रोहित त्याच्या मित्राच्या घरी सवाई मधोपूरला घेऊन गेला. तिथे तिला गुंगीचे पेय पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. तरुणी बेशुद्ध असताना तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओही करण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे.

कपाळावर लावला होता सिंदूर

त्यानंतर रोहीत २१ एप्रिल २०२१ रोजी तिला घेऊन मित्राच्या फार्म हाऊसवर गेला,. तिथे त्याने तिच्या कपाळावर सिंदूर लावल्याचेही तिने सांगितले आहे. त्यावेळी त्याने तरुणी आता त्याची पत्नी झाल्याचे सांगितले. लवकरच लग्नाचे रिसेप्शन करु, असे खोटे आश्वासनही त्याने दिल्याचा तिचा आरोप आहे. त्यानंतर २६ जून २०२१ ला तिला घेऊन रोहित मनालीला गेला. हा त्यांचा हनिमून असल्याचे त्याने तिला सांगितले. ११ ऑगस्ट २०२१ रोजी तरुणी गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. हे तरुणीने रोहितला सांगितल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. यावेळी दोघांनीही एकमेकांना मारहाणही केली.

तरुणीचा गर्भपात केला

१२ ऑगस्टला या तरुणीला रोहितने मित्राच्या कार्यालयात बोलावले. तिथे तिला मारहाण केली त्यानंतर तरुणीने गर्भपात केला. त्यानंतरही ३–४ सप्टेंबरला दिल्लीच्या हॉटेल सम्राटमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. १७ एप्रिल २०२२ रोजीही रोहितने बलात्कार केल्याचा या तरुणीचा आरोप आहे.

वडील मंत्री असल्याची धमकी

रोहित वडील मंत्री असल्याची धमकी तिला देत असल्याचे तिने एफआयआरमध्ये लिहिले आहे. पोलिसांना घाबरत नाही, माफिया आणि गुंडांशी संबंध असल्याचे रोहित तिला सांगत असे. तरुणीने आपल्या जीवाला धोका असल्याचेही नमूद केले आहे. राजस्थानात तक्रार घेत नसल्यने दिल्लीत येवून तक्रार दिल्याचे तिचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करुन, पुढील तपाससाठी हे प्रकरण सवाई माधोपूरला पाठवण्यात आले आहे.

कल्पना नसल्याचे मंत्र्यांचे उत्तर

रोहित हा प्रदेश काँग्रेसचा महासचिव होता. सध्या तो विधानसभा निवडणुकांची तयारी करतो आहे. याबाबत मंत्र्यांशी संपर्क साधला असता, आपण बाहेर आहे, जयपूरात येऊन माहिती घेतो, असे उत्तर त्यांनी दिले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?