स्वतःचे खोके, दुसऱ्यांना धोके, आदित्य ठाकरे यांची टीका; ठाण्यातील रोजगार मेळाव्यात मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 14, 2023 | 4:31 PM

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे. शिवसेनेकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू केलाय. बेरोजगरांकडं सरकारचं लक्ष नाही.

स्वतःचे खोके, दुसऱ्यांना धोके, आदित्य ठाकरे यांची टीका; ठाण्यातील रोजगार मेळाव्यात मोठं वक्तव्य
आदित्य ठाकरे
Image Credit source: tv9
Follow us on

ठाणे : ठाणे हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गड आहे. या गडात आदित्य ठाकरे यांनी काम सुरू केलं. आज ठाण्यात ठाकरे गटाकडून रोजगार मेळाव्याचं (Rojgar Melawa) आयोजन करण्यात आलं. पक्षाचे काही पदाधिकारी नेमायचे होते. काही नवीन पदाधिकारी कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू करून देण्यात आला. कारण महाराष्ट्रात बेरोजगार वाढत चालले आहेत. देशातही बेरोजगार युवकांकडं कुणी लक्ष देत नसल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. राजकीय पक्ष हे ५० वर्षांपूर्वी काय झालं. १०० वर्षांपूर्वी काय झालं, याकडं लक्ष देत आहेत. त्यासाठी भांडत बसले आहेत. तरुणांसाठी लढणारा किंवा पुढची ५० वर्षांसाठी लढणारा अजून दिसत नाही. तिथं शिवसेनेनं (Shiv Sena) काम सुरू केलंय.

पुण्यात विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एमपीएससीचे विद्यार्थी मोर्चे काढत आहेत. महिलांवर अत्याचार वाढत चालले. त्यांचा आवाज कुणी ऐकत नसल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

स्वतःचे खोके आणि दुसऱ्यांना धोके

महाराष्ट्रात मोघलांचं सरकार आहे, असं दिसत आहे. स्वतःचे खोके आणि दुसऱ्यांना धोके, असं सुरू आहे. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी दुःखी आहेत. सरकारकडून जनतेसाठी एक पाऊल पुढं असं कुठंही दिसत नाही.

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहे. शिवसेनेकडून ठाण्यात रोजगार मेळावा सुरू केलाय. बेरोजगरांकडं सरकारचं लक्ष नाही. तरुणांसाठी लढणारा कोणी दिसत नाही. तिथं शिवसेनेनं काम सुरू आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलंय.

आदित्य ठाकरे यांनी विचारलेले प्रश्न

मुंबईतील ४०० किलोमीटरचे रस्ते किती वेळात करणार आहेत. ४०० कोटी रुपयांचे टेंडर काढायला प्रशासकाला अधिकार आहेत का. लोकप्रतिनिधी नसताना कुठल्या बॉडीनं याला मान्यता दिली. सहा हजार कोटी रुपयांचं बजेट कुठल्या फंडातून डायव्हर्ट केले. हे तुम्ही पुढच्या बजेटमध्ये दाखविणार आहात का. पाच कंपन्या आहेत. पाच पॅकेट कसे मिळाले, असे काही प्रश्न यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारले.