गड आला, पण सिंह गेला… मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरील ‘त्या’ बॅनर्सनी वेधले सर्वांचे लक्ष

ठाण्यात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवर काही बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्सने सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

गड आला, पण सिंह गेला... मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवरील त्या बॅनर्सनी वेधले सर्वांचे लक्ष
Eknath Shinde and Rajan Vichare
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2024 | 10:36 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. सत्तेत असलेल्या महायुतीसाठी मोठा धक्का असून याचा परिणाम आगमी निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाने 9 जागा जिंकत बंडाचा फारसा काही परिणाम जागांवर दिसून दिला नाही. मुंबईमध्येही ठाकरे गटाने तीन जागांवर विजय मिळवला. शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं आहे. मात्र ठाण्यात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांचा पराभव झाला आहे. या पराभवानंतर मुख्यमंत्र्यांच्या होमपीचवर काही बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्सने सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाण्यातील शिवसैनिकांनी चंदनवाडी शाखेच्या बाहेर ‘गड आला पण सिंह गेला’ असा मजकुराचा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर लिहिलेला मजकूर सर्वांचे लक्ष वेधत आहे. हरलो तरी चालेल पण लढणं नाही सोडणार, संघर्ष हा आपल्या पाठीवर बांधलेला आहे. काही झालं तरी तुमची साथ सोडणार नाही. साहेब सदैव तुमच्या सोबत अशा प्रकारचा मजकूर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण वर उभे असणारे नरेश मस्के यांनी बाजी मारली आहे. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे मशाल चिन्हावर उभे असलेले राजन विचारे यांची हॅट्रिक मात्र चुकली आहे. नरेश मस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव दोन लाखाऊन अधिक मताधिक्याने केला आहे. नरेश म्हस्के यांना 7 लाखाहून अधिक मत पडली आहे. तर राजन विचारे यांना 5 लाखाहून अधिक मत ठाणे लोकसभेमध्ये पडली आहे.

महाविकास आघाडीला यश

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीला 17 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुती सत्तेत असून सुद्धा कमी जागा मिळाल्या. तर पक्ष फुटुनही शरद पवार आणि ठाकरे गटाने चांगलं यश मिळवलं आहे.