Bhiwandi Rain : भिवंडी तालुक्यात मुसळधार, खडवली नदीला पूर, नागरिकांना रात्रीचं सुरक्षितस्थळी हलवलं, प्रशासन अ‌ॅलर्ट मोडवर

| Updated on: Jul 22, 2021 | 11:33 AM

भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. भिवंडीत जोरदार पाऊस झाला.

Bhiwandi Rain : भिवंडी तालुक्यात मुसळधार, खडवली नदीला पूर, नागरिकांना रात्रीचं सुरक्षितस्थळी हलवलं, प्रशासन अ‌ॅलर्ट मोडवर
Bhiwandi Flood
Follow us on

ठाणे: भारतीय हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. भिवंडीत रात्रभर जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी पडगा गावात पाणी साचलं असून रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलेलं आहे. खडवली आणि कुभांर नदीला पूर आल्यानं पडघा, भादाणे, कुंभारशिव गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तहसीलदार अधिक पाटील पूरस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला असून ग्रामीण भागात बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर वाढल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहण्यास सुरवात झाली आहे. खडवली नदीची पातळी वाढली असून त्यामुळे भिवंडी तालुक्यातील गणेश नगर पडघा येथे 40 लोकांना रेस्क्यू करण्यात आल खैरेपाडा येथे 3 लोकांना रेस्क्यु करण्यात सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली आहे.

भिवंडी तालुक्यातील भादाणे गावातील 55 घरांना पाण्याचा वेढा ,200 नागरीक विस्थापित…

मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला असून ग्रामीण भागात बुधवारी रात्री उशिरा पावसाचा जोर वाढल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहण्यास सुरवात झाली आहे. खडवली नदीची पातळी वाढली असून त्यामुळे भिवंडी तालुक्यातील खडवली नदी किनारी असलेल्या भादाणे गावातील रोहिदास नगर व सिद्धार्थ नगर या वस्त्यांना पाण्याचा वेढा पडला असून येथील 55 घरांमधून पुराचे पाणी शिरल्याने सुमारे 200 नागरीकांना गावा बाहेरील मंदिरात स्थलांतरीत करण्यात आले आहे.पाणी पातळी वाढत राहिल्यास पुन्हा एकदा मोठे संकट नदी लगतच्या गावांवर येऊ शकते. दरम्यान , येथील पूरपरिस्थिती वर तहसीलदार अधिक पाटील स्वतः लक्ष ठेवून असून ठाणे TDRF पथक पोहचले असून NDRF पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत .

कुंभारशिव गावातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हटवलं

मुसळधार पावसाने शहरा सोबतच ग्रामीण भागात हाहाकार उडविला असताना भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील कुंभारशिव ग्रामपंचायत क्षेत्रातील सहा घरांचा समावेश असलेल्या गोरले पाडा परिसराला रात्रीच्या सुमारास नजीकच्या कुंभार नदी सह नाल्याचे पाणी वाढल्याने पाण्याचा वेढा पडला व त्या मध्ये 25 नागरीक अडकून पडले. त्यानंतर कुंभारशिव गावातील नागरीकांनी रस्सीच्या सहाय्याने पाण्यात अडकलेल्या नागरीकांना सुखरूप बाहेर काढीत त्यांना कुंभारशिव येथे हलविले आहे. सदरच्या नाल्यात बांधकाम व्यावसायिकाने मातीचा भराव केल्या बाबत ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयास तक्रार केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे .

भिवंडीतील रस्ते जलमय

बुधवारी रात्रीपासून भिवंडीला झोडपून काढलं आहे. भिवंडीतील नदीनाका परिसराला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पाच ते सहा फुट पाणी साचलेलं आहे. भिवंडीतील 500 ते 600 दुकानं पाण्याखाली गेलेली असल्याचा अंदाज आहे. महानगरपालिका, स्थानिक आमदार, खासदार काय करतात असा संतप्त सवाल भिंवडीतील नागरिकांनी केला आहे.

इतर बातम्या:

Konkan Rain : कोकण, कोल्हापुरात तुफान पाऊस, NDRF ची पथकं रवाना, रस्ते, रेल्वे वाहतूक रखडली

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, प्रतापगडजवळच्या कोयनेवरचा पूल पाण्याखाली, 12 गावांचा संपर्क तुटला