मुहूर्त टळून जात होता, नवरी मंडपातच नव्हती; ‘त्या’ 20 मिनिटात असं काय घडलं?

| Updated on: May 30, 2023 | 12:26 PM

भाईंदरमध्ये एका लग्नात बाका प्रसंग निर्माण झाला होता. लग्नघटिका जवळ आलेली असतानाच नवरी लिफ्टमध्ये अडकली. त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. मंडपात एकच गोंधळ उडाला. अग्निशमन दलाच्या जवानांनाही घटनास्थळी पाचारण केलं.

मुहूर्त टळून जात होता, नवरी मंडपातच नव्हती; त्या 20 मिनिटात असं काय घडलं?
bride
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाईंदर : लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता. पाहुण्यांची लगबग सुरू होती. वर लग्नामंडपात वधूची वाट बघत बसला होता. लग्नघटिका जवळ येऊ लागली आणि वधू विवाहस्थळी पोहोचण्यासाठी निघाली… नवरी लिफ्टमधून येत होती अन् अचानक लिफ्ट बंद पडली. वधू लिफ्टमध्ये अडकली… इकडे मुहूर्त निघून चालला, त्यामुळे सगळ्यांचा जीव टांगणीला लागला.

वधू लिफ्टमध्ये अडकल्यानंतर तिला बाहेर काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण प्रयत्न काही सफल होताना दिसेना. तिकडे वधूही घामाघूम झाली. तिलाही रडू कोसळू लागलं. त्यामुळे अखेर अग्निशनम दलाच्या जवानानांना बोलावण्यात आलं आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न 20 मिनिटांनंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या वधूला बाहेर काढलं. रात्री 8 च्या मुहूर्तापूर्वी हे बचाव कार्य यशस्वी झालं आणि वधू वराचं लग्न सुखरूप पार पडलं. सोमवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास भाईंदर येथे ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा

सहाजण अडकले

भाईंदर येथे राहणार्‍या एका तरुणीचं सोमवारी लग्न होतं. भाईंदर पश्चिमेच्या राई येथील विनायक नगर येथील सभागृहात लग्न सोहळा सुरू होता. रात्री 9 चा मुहूर्त होता. सगळे जण वधूची वाट बघत होते. तयारी करून रात्री सव्वा आठच्या सुमारास नवरी मुलगी आपल्या तीन बहिणी आणि दोन लहान बाळासोबत तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी निघाली. मात्र अचानक लिफ्ट बंद पडली.

वऱ्हाडींची धावपळ

ऐनवेळी लिफ्ट बंद पडल्याने मोठा बाका प्रसंग उद्भवला. लिफ्टमध्ये अडकल्याचे संकट एकीकडे तर दुसरीकडे लग्नाचा मुहूर्त चुकण्याची भीती. कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला. वऱ्हाडी मंडळीचीही धावपळ सुरू झाली. या प्रसंगाची माहिती अग्निशमन दलाा मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारीही घटनास्थळी पोहोचेले. 20 मिनिटांच्या प्रयत्नानंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या वधूसह इतरांची सुटका कऱण्यात आली आणि तिचे लग्न सुखरूप पार पडले.

महिला रुग्णालयात दाखल

लिफ्टमध्ये अडकलेल्या इतर महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांची प्रकृती सुखरुप असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आम्हाला घटनेची माहिती मिळताच लिफ्टमध्ये अडकलेल्या महिलांची सुखरूप सुटका केली अशी माहिती अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.