Maharashtra Breaking Marathi News Live : मुन्नाभाई स्टाइल कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

| Updated on: May 31, 2023 | 7:10 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live : मुन्नाभाई स्टाइल कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
Marathi News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई : IPL 2023 च्या सीजनची काल सांगता झाली. चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएलच विजेतेपद मिळवलं. पावसामुळे रात्री उशिरा सुरु झालेल्या सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सवर 5 विकेट राखून विजय मिळवला. चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे आजारपणाने आज पहाटे निधन झाले.

बाळू धानोरकर यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना उपचारासाठी नवी दिल्लीत पाठवण्यात आले होते. आज हवाई रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव वरोरा येथे आणण्यात येईल. संध्याकाळी वरोरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 May 2023 08:43 PM (IST)

    अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंती, चौंडीत बॅनरबाजीवरून राजकारण तापले

    अहिल्याबाई होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन

    मात्र जयंतीच्या पूर्वसंध्येला बॅनरबाजीवरून राजकारण तापले

    रोहित पवारांकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर

    राम शिंदे आणि रोहित पवार यांचे बॅनर युद्ध रंगले

  • 30 May 2023 08:38 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अहमदनगरच्या दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अहमदनगरच्या दौऱ्यावर

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथे जाणार

    तेथील काही कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

  • 30 May 2023 08:22 PM (IST)

    अद्याप जागावाटपाबाबत कुठलेही चर्चा झालेली नाही : जयंत पाटील

    अद्याप जागावाटपाबाबत कुठलेही चर्चा झालेली नाही

    शिंदे गटाचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा

    त्यामुळे शिंदे गटाची पंचाईत होणार आहे

  • 30 May 2023 08:05 PM (IST)

    दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वाढदिवस

    वाढदिवसानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम

    या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्याता

  • 30 May 2023 07:58 PM (IST)

    पुण्यातील भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, शेतकऱ्यांची धावपळ

    पुण्यातील भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस

    वादळी वाऱ्याने दुकानांचे पत्रे उडून रस्त्यावर

    अवकाळी पावसाचा आठवडे बाजारावर परिणाम

    अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ

    तासभर पडलेल्या पावसानं परिसरात पाणीच पाणी

  • 30 May 2023 05:54 PM (IST)

    कांद्याला 50 पैसे व एक रुपये किलो प्रमाणे भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त

    शेतकऱ्यांनी तिसगाव कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या गेटवरच कांदा दिला पेटवून

    मंगळवार असल्याने तिसगाव उपबाजार समितीमध्ये सकाळपासूनच शेतकरी कांदा घेऊन होते

    दुपारी तीन वाजेपर्यंत एकही कांदा व्यापारी कांद्याचे निलाव करण्यासाठी उपस्थित न राहिल्याने घेतली भूमिका

    50 पैसे एक रुपया प्रमाणे भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीचे गेटवर कांदे पेटवून देत केली नाराजी व्यक्त

  • 30 May 2023 05:39 PM (IST)

    वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर वनविभागाची गदा

    ग्रामसभेला देण्यात आलेल्या अधिकार हे वनविभागाला मान्य नाही का ?

    संपत झालेल्या ग्रामसभेने केले आमरण उपोषण सुरू

    जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील आंदोलनकर्ते त्यांची भूमिका....

  • 30 May 2023 05:36 PM (IST)

    मुन्नाभाई स्टाइल कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

    नाशिक - मुन्नाभाई स्टाइल कॉपी करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

    पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या लिपिक पदासाठी होती परीक्षा

    बटन कॅमेरा आणि ब्ल्यू टूथच्या मदतीने कॉपी केल्याच झालं उघड

    मूळ उमेदवार, डमी उमेदवार, उत्तर पुरवणारे आशा तिघांविरोधात गुन्हा दाखल

    कॉपीचे रॅकेट आणखी मोठे असण्याची शक्यता

    पोलिसांचा तपास सुरू

  • 30 May 2023 05:30 PM (IST)

    बारसू रिफायनरी विरोधात पुण्यात विविध संघटना एकवटल्या

    पुण्यात बारसू रिफायनरी विरोधात बैठक संपन्न

    महाराष्ट्रव्यापी लढा समिती आणि अभ्यास समिती गठीत

    बारसू रिफायनरी विरोधात सुरु असलेल्या बारसू आंदोलनाला महाराष्ट्रभरातील जनचळवळींचा पाठिंबा

    पुण्यात एस. एम. जोशी फौंडेशन सभागृहात बारसु रिफायनरी विरोधी व्यापक बैठक संपन्न

    डॉ. भारत पाटणकर आणि सत्यजीत चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक

  • 30 May 2023 05:28 PM (IST)

    सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात रुग्णांचे हाल

    सोलापूर शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन मागील सहा महिन्यांपासून बंद

    त्याचबरोबर रुग्णालयातील संगणक प्रणाली ही धुळखात पडलीय

    सिटीस्कॅन मशीन बंद असल्याने रुग्णांना खाजगी लॅबमधून करावे लागते सिटीस्कॅन

    शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन नसल्याने रुग्णांच्या आजाराचे निदान होणेही दुरापास्त झाले

    सरकारने एकीकडे विविध आरोग्य योजना लागू केल्यात मात्र त्याचा फायदा रुग्णांना होण्यासाठी सिटीस्कॅन मशीन नाही

    त्याचबरोबर शासकीय रुग्णालयातील संगणक प्रणाली बंद असल्याने रुग्णांची हिस्ट्री डॉक्टरांना भेटत नाही

  • 30 May 2023 05:19 PM (IST)

    जुन्नर तहसिलदारावर कारवाई करावी या मागणीसाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

    शिवाजीनगर परिसरातील पुलाच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

    जुन्नरच्या तहसीलदार विविध मागण्यांसाठी कारवाईची तरुणाची मागणी

  • 30 May 2023 05:10 PM (IST)

    निळू फुले यांच्या मुलीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

    गार्गी फुले यांनी घेतली पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट

    भेट घेऊन शरद पवारांशी साधला संवाद

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागात गार्गी फुलेंना संधी मिळण्याची शक्यता

  • 30 May 2023 05:00 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार संवाद

    मुख्यमंत्री आज रात्री घेणार पत्रकार परिषद

    मुख्यमंत्री आज रात्री 8 वाजता घेणार पत्रकार परिषद

    कोणत्या विषयावर मुख्यमंत्री शिंदे बोलणार याकडे लक्ष

    वर्षा निवासस्थानी रात्री साधणार संवाद

  • 30 May 2023 04:51 PM (IST)

    जळगाव महापालिकेच्या महासभेत खडाजंगी

    ठाकरे गट-भाजप नगरसेवकांमध्ये दावे-प्रतिदावे

    विकास निधी खेचून आणल्याचा दोघांचा दावा

    महापालिका महासभेत मोठा गोंधळ

  • 30 May 2023 04:42 PM (IST)

    ज्यांचा जन्मच झाला नाही त्यांचा वर्धापन दिन कसला

    अरविंद सावंत यांचा शिंदेंच्या शिवसेनेवर सवाल

    शिवसेनेच्या वर्धापन दिनावर सावंत यांचे प्रश्नचिन्ह

    ज्यांचा जन्मच झाला नाही त्यांचा वर्धापन दिन कसला?

  • 30 May 2023 04:40 PM (IST)

    मणिपूर हिंसाचारावरुन काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी साधला निशाणा

    आतापर्यंत अनेक लोकांचा नाहक गेला बळी

    हिंसाचार देशाच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना असल्याचे मत

    माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी भाजपवर केली टीका

  • 30 May 2023 04:28 PM (IST)

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमानप्रकरणी भुजबळ आक्रमक

    संकेतस्थळाविरोधात कडक कारवाईची छगन भुजबळ यांची मागणी

    उपमुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र

    अन्यथा ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा

  • 30 May 2023 04:18 PM (IST)

    राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटणार

    उद्या घेणार पोलीस आयुक्तांची भेट

    महापुरुषांचे पुतळा हटविण्याचे प्रकरण

    उद्या भेटणार राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना

  • 30 May 2023 04:10 PM (IST)

    महाापालिका हद्दतील धोकादायक इमारतींचे होणार परिक्षण

    धोकादायक इमारतींचे त्रयस्थ संस्थेकडून होणार ऑडिट

    अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सूचना

  • 30 May 2023 04:06 PM (IST)

    आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

    कामगारांच्या सुरक्षेसाठी खास तरतूद

    सिल्लोड तालुक्यासाठी पुन्हा भरीव आर्थिक मदत

    बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला जीवदान

  • 30 May 2023 04:02 PM (IST)

    शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीकविमा मिळणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा

    मंत्रिमंडळ निर्णयात राज्य सरकारने घेतला निर्णय

    पीकविम्याचा हप्ता सरकार भरणार

  • 30 May 2023 03:55 PM (IST)

    शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    विम्यासाठी शेतकऱ्यांना फक्त १ रुपया द्यावा लागणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नमो शेतकरी सन्मान योजनेला मंजुरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आयटी क्षेत्राला चालना देणारे निर्णय घेतले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आयटी क्षेत्राला चालना देऊन बेरोजगारी कमी करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • 30 May 2023 03:51 PM (IST)

    मुंबई | येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चर्चा

    चर्चेत पाच नेत्यांची नावे समोर, तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचे नाव आघाडीवर

    त्याचबरोबर राजेंद्र फाळके, माजी आ अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर, घनःश्याम शेलार यांच्या नावांची चर्चा

    लवकरच अधिकृत नावाची घोषणा होण्याची शक्यता...

  • 30 May 2023 03:41 PM (IST)

    पुणे | सारसबाग येथील अहिल्याबाई होळकर पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुक आंदोलन

    राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या निषेधार्थ मूक आंदोलनाचं आयोजन

    महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त  अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आले होते.

  • 30 May 2023 03:32 PM (IST)

    न्यायामूर्ती नितीन जमादार यांची मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड

    हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश रमेश धनुका हे 31 तारखेपासून निवृत्त होत आहेत

    त्यापूर्वी कायदा आणि न्याय विभागाकडून जमादार यांची नियुक्ती

    उद्यापासून मुख्य न्यायाधीश म्हणून जमादार काम पाहणार...

  • 30 May 2023 03:23 PM (IST)

    मुंबई | कोस्टल रोड प्रकल्पातील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचे खनन काम पूर्ण

    मंगळवारी दुपारी २ वाजता प्रियदर्शनी पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्याचा ‘ब्रेक थ्रू’ होणार आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे.

    मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम वेगात सुरू आहे.

    या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहेत. बोगदे खणण्याच्या कामाला ११ जानेवारी २०२१ रोजी सुरुवात झाली होती.

    पहिल्या बोगद्याचे खोदकाम १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाले होते. १ एप्रिल २०२२ पासून दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम सुरू करण्यात आले.

    दुसऱ्या बोगद्याचे काम सुरू असताना झालेल्या यंत्र बिघाडामुळे बोगदा खणण्यास उशीर झाला होता. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे.

  • 30 May 2023 03:11 PM (IST)

    नाशिक | वणी ग्रामपंचायतीचा ड्रेस कोड बाबत ठराव

    ड्रेस कोड लागू करावा असा ठराव वणी देवस्थानकडे सुपूर्द

    ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केलेला ठराव वणी देवस्थानकडे दिला

    देवस्थानच्या बैठकीत होणार ड्रेस कोड बाबत अंतिम निर्णय

    विश्वस्थांच्या निर्णया नंतर ड्रेस कोड बाबत अमलबजावणी होणार अमलबजावणी

  • 30 May 2023 03:05 PM (IST)

    मोदींनी देशातला दहशतवाद संपवला की वाढवला - संजय राऊत

    गजानान किर्तीकर हे सिनियर नेते आहेत

    त्यांनीच सांगितले आहे की त्यांनीच पाढा वाचून दाखवला आहे

    शिवसेना सोडताना त्यांनी हाच पाढा काँग्रेस राष्ट्रवादीबाबत वाचला होता

    त्यांना पक्षांतराची चटक लागली आहे
    त्यांच्याकडे आता कोणता नेता आहे

    भाजपा फक्त राहिल असं अमित शहाही म्हणाले होते

    मित्र म्हणून जवळ करायचं आणि मित्राचा गळा घोटायचा

    भाजपा पातळ झाली आहे

    आम्हाला आमंत्रण आलं तरी स्विकारणार नाही

    ही 9 वर्ष देशाला नाकी नऊ आणणारे आहेत

    हा देश 2014 च्या आधी देश जगाला माहिती नव्हते का ?

    मी असं म्हणालो की सध्याच्या लोकसभेत 19 खासदार आहेत

    18 महाराष्ट्रातील आहेत

    कोणत्याही पक्षाचा आकडा असतो

    19 खासदार आम्ही विजयी करू आम्ही भूमिका घेतली तर चुकीचंकाय ?

    मोदी सरकाला 9 वर्ष झाली

    मोदींनी देशातला दहशतवाद संपवला की वाढवला

    काश्मीरात आजही हत्या सुरू आहेत

    मणिपुरात हिंसाचार भडकला आहे

    दिल्लीत रोज अत्याचार होतायेत

    कसला दहशतवाद कमी झाला आहे

    अत्यंत दुर्दैवी घटना आहे

    अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुलेचं समर्थन करणार का?

    कोणाला भेटल्यानं शिवसेनेला शह काही होणार नाही

    त्यांनी शिवतीर्थावर आठ दिवस राहावं

    लॉजिंग बोर्डींग करावं काही फरक पडणार नाही

    अन्यथा बाहेर चांगला परिसर आहे चांगलं खायलाही मिळतं

    राज ठाकरे चांगलं येणाऱ्या लोकांच चांगलं स्वागतही करतात

    शिवसेनेला काही फरक पडणार नाही

    फडणवीसांच्या राज ठाकरे भेटीवर उपरोधिक टीका

  • 30 May 2023 03:02 PM (IST)

    धानोरकर यांच्या निधनाचा धक्का काँग्रेसलाच नाही तर शिवसेनेलाही - संजय राऊत

    मी सकाळी लवकर दिल्लीथ येणार होतो आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेणार होतो
    बाळू धानोरकर हे मूळचे शिवसेनेचे होते
    शाखा प्रमुख ते आमदार असा प्रवास होता
    त्यांना लोकसभा लढवायची होती, मात्र युतीत त्यांना लढवता आली नाही
    जरी ते काँग्रेसमध्ये गेले तरी वागणं शिवसैनिकासारखं होतं
    आम्ही त्यांना सांगत होतो की प्रकतीची काळजी घेतली पाहिजे

    त्यांची वागण्याची पद्धत बेबंद होती

    काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले, तरी शिवसेनेतून ते तयारी करत होते

    उद्धवजींनी ग्रीन सिग्नल दिला होता

  • 30 May 2023 02:56 PM (IST)

    लाखो शेतकऱ्यांना शिंदे सरकारचा दिलासा, केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ मिळणार 

    राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

    - केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    - कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता. लाखो कामगारांचे हित जपले.

    - नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार

    - "डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन" योजनेस मुदतवाढ. ही योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार आहे.

    - सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून यासाठी २२.१८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

    - महिलांना पर्यटन व्यवसायात अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण

    - राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

    - कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

    - सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार

    - बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार. अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय

    - अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती करणार

    - नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार. अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता

  • 30 May 2023 02:54 PM (IST)

    नागपूरमध्ये दौहराबात रोडवर संतप्त गावकऱ्यांनी महामार्गावरील उडानपुलाचं काम थांबवलं 

    गावकऱ्यांनी बोगद्याची मागणी केली, पण तरीही बोगदा झाला नाही
    “शेडगाव चौरस्ता येथे जबरदस्तीने पुलाचं काम सुरु असल्याचा गावकऱ्यांचा आरोप”
    संतप्त गावकऱ्याने उडानपुलाचं काम थांबवलं
    बोगदा होतपर्यंत काम सुरु न करण्याची  गावकऱ्यांची मागणी
  • 30 May 2023 02:52 PM (IST)

    चार वर्ष सेवा सुशासन, गरीब कल्याण सेवा, ईशान्य मुंबईची सेवा यांना घेऊन लेखा जोखा मांडत आहे - मनोज कोटक

    गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या अनेक चांगले उपक्रम पार पाडले

    सरकार आणि नागरिक यांच्यामधील दुवा बनण्याचे मला भाग्य लाभले

    केंद्राने राज्याला भरीव मदत केली, त्यामुळे मुंबई च्या विकासात तेजी आली आणि नव्याने खूप काही करू शकलो

    गेले अनेक वर्षे प्रलंबित राहिलेली काम देखील आपण या काळात केली आहे

    मुलुंड येथे मेडिकल आणि नर्सिंग कॉलेज देखील बनवण्याची मागणी पास झाले आहे

    रेल्वे आणि राज्यसरकार यांची मदत घेऊन मुंबई येथील सर्वात मोठे गार्डर देखील टाकण्यात आले

    तसेच दिव्यांगा देखील मदत करण्यात आली

    मोदी सरकारचा धोरण गरिबांना पुढे आणण्यासाठी आहे

    11करोड 72 लाख लोकांना आपण शौचालयची सुविधा केंद्र मार्फत देण्यात आली

    तसेच पाणी आणि उज्वला योजना देखील राबवण्यात आली

    कोविडमध्ये आपण मोफत धान्य देण्याचं काम केलं आहे

    जवळपास युरोपच्या लोक संख्येएवढी आपण त्या काळात भारतात आपण लोकांना धान्य दिलेले आहे

    युरियासाठी आपण काम केला आणि जगभरात आपण ते दिलेले आहे

    शेतकरी सन्मान योजना निधी आपण वाढवून दिलेली आहे

  • 30 May 2023 02:44 PM (IST)

    राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    शेतकऱ्यांसाठी दोन योजना मंत्रिमंडळात मंजूर

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती योजनांची मागणी

  • 30 May 2023 02:43 PM (IST)

    दिल्ली महिला हत्याकांडातील आरोपींना भर चौकात मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी

    परभणी शिंदे गटाच्या महिला आघाडीची मागणी

  • 30 May 2023 02:36 PM (IST)

    पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर 25 ते 30 हजार नागरिकांचा धडक मोर्चा

    किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला मोर्चा
    जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चे कारणांनी घातला घेराव
    पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापटी
    काही वेळ तणावाचे वातावरण
    अखेर आंदोलनकर्ते आत शिरून जिल्हाधिकारी कार्याला घातला घेराव
  • 30 May 2023 02:32 PM (IST)

    खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव चंद्रपूरमध्ये दाखल

    खांबाडा येथून चंद्रपूर जिल्ह्यात ताफा प्रवेशला

    चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांचा ताफ्यात समावेश

    पुढील 20 मिनिटात पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी होणार दाखल

    यानंतर पार्थिव मतदार संघातील जनता आणि नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवले जाणार

  • 30 May 2023 02:22 PM (IST)

    गोंदियात रब्बीत 13 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट

    34 केंद्रांवरून 64 हजार क्विंटल धान खरेदी

    68 हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

  • 30 May 2023 02:21 PM (IST)

    नाशिकमधील वणी ग्रामपंचायतीचा ड्रेस कोडबाबत ठराव

    ड्रेसकोड लागू करावा असा ठराव वणी देवस्थानकडे सुपूर्द

    ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केलेला ठराव वणी देवस्थानकडे दिला

    देवस्थानच्या बैठकीत होणार ड्रेस कोडबाबत अंतिम निर्णय

    विश्वस्थांच्या निर्णया नंतर ड्रेस कोडबाबत अमलबजावणी होणार अंमलबजावणी

  • 30 May 2023 02:21 PM (IST)

    गौतमी पाटील यांच्या पाटील आडनाव लावण्याला माझा विरोध नाही

    तर त्यांच्या अदांना माझा विरोध - घनश्याम दरोडे

    पाटील आडनाव लावण्याचा ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे

    गौतमी पाटील यांना आडनावरून कोणी विरोध करू नये, आपले अधिकार आपण ठरू शकतो

    तुम्ही कुठेही गौतमीताईची गडचेपी करू नये असं मला वाटतं

    गौतमी पाटील यांचं पाटील आडनाव काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल

    तर मी गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभा असेल

    9 तारखेनंतर मी गौतमी पाटील यांची भेट घेणार आहे महाराष्ट्राच्या वतीने त्यांना समजून सांगणार आहोत

  • 30 May 2023 02:19 PM (IST)

    कांदा उत्पादन शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहे - सदाभाऊ खोत

    त्यांच्यासाठी मध्यप्रदेश सरकारने ज्या योजना राबवल्या, राज्य सरकारनेही त्या योजना राबवावी

    यासाठी आम्ही नाशिकमधील शिष्ट मंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी घेऊन जात आहोत

    गारपीट वेगवान वारा यामुळे डाळिंब आणि द्राक्षाच्या बागा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    जूनमध्ये नव्याने शेतकऱ्यांना पेरणी करायची आहे

    ती मदत तात्काळ मिळावी ही सरकारकडनं आमची अपेक्षा आहे

    या दृष्टीनेही आम्ही चर्चा सरकार बरोबर करणार आहोत

    नमो किसान योजना ही योजना पेरणी हंगामामध्ये दिलासादायी ठरणार

    जून महिन्यात पेरणी करायच्या अगोदर खत घेण्यासाठी पैशाची त्यांना गरज असते

    त्यामुळे सरकारने उचललेले हे पाहून ऐतिहासिक असं पाऊल आहे

    राज्याचे 6000 आणि केंद्राचे सहा हजार से बारा हजार शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी पेरणी करायला बिंधास्त राहिल

  • 30 May 2023 02:11 PM (IST)

    थुंकून चाटणारे आमच्यापैकी कोण नाही - संजय गायकवाड

    ठाकरे गटाला आमचे 22 आमदार किंवा 9 खासदार नाराज आहेत

    याची काळजी करण्याची गरज नाही

    तुम्ही त्यावेळी सांगितले होते की, गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे

    मग आता कशाला काळजी करता

    आमचे सगळे आमदार खासदार खुश आहेत

  • 30 May 2023 02:09 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील जनेतेला कमळ पाहिजे - अनिल बोंडे

    कमळावर निवडणूक लढवणारा उमेदवार पाहिजे

    अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या कमळ चिन्हावरील उमेदवार पाहिजे ही जनभावना आहे

    भारतीय जनता पक्षाचा कमळावरील उमेदवार निश्चित असावा ही मागणी भाजपच्या वतीने करणार

    खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हंवर निवडणूक लढल्या तर अधिक चांगला आशीर्वाद मिळेल

  • 30 May 2023 02:08 PM (IST)

    अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी ठोस पुरावे सादर करावे - भरत गोगावले

    पुरावे आले तर त्याच्यावरती ॲक्शन करता येईल

    संजय राऊत यांचा ज्योतिष कधी खरे ठरला आहे का

    आतापर्यंत जेवढे त्यांनी सांगितले, ते सगळं खोटं ठरलं आहे

    ते बोलतात त्याचे उलट होतं, त्याची काळजी करायची गरज नाही

    आम्हाला भाजपमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही

    काही असेल तर आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा करून बघू

    त्यांनी बोलत राहो आम्ही आमचं काम करत राहू

  • 30 May 2023 02:01 PM (IST)

    दिल्लीत कुस्तीपटूंच आंदोलन चिघळण्याची शक्यता

    ब्रूजभूषण शरण सिंह यांच्या घराबाहेर कलम 144 केलं लागू

    घराच्या परिसरात केंद्रीय यंत्रणाचा फौजफाटा तैनात

    घराबाहेर आंदोलन होण्याच्या इशाऱ्यामुळे पोलीस यंत्रणा तैनात

    माध्यमांनाही घराच्या परिसरात येण्यासाठी बंदी

  • 30 May 2023 01:59 PM (IST)

    दिल्लीत कुस्तीपटूंच आंदोलन चिघळण्याची शक्यता

    दिल्लीत कुस्तीपटूंच आंदोलन चिघळण्याची शक्यता

    ब्रूजभुषण शरण सिंह यांच्या घराबाहेर कलम 144 केलं लागू

    घराच्या परिसरात केंद्रीय यंत्रणाचा फौजफाटा तैनात

    घराबाहेर आंदोलन होण्याच्या इशाऱ्यामुळे पोलीस यंत्रणा तैनात

    माध्यमांनाही घराच्या परिसरात येण्यासाठी बंदी

  • 30 May 2023 01:58 PM (IST)

    गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले

    इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने इंदापूर तालुक्यातील रेडणी गावाच्या बस स्टँडजवळ मयूर खुडे याला बेकायदा बिगर परवानाची गावठी पिस्टल व काडतूस जवळ बाळगल्याने त्यास मोठ्या शिताफीने पकडून त्याच्या कडून एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले आहे

  • 30 May 2023 01:43 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगेश चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

    एकनाथ खडसेंबाबत केलं होतं असभ्य वक्तव्य

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगेश चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

    एकनाथ खडसेंबाबत केलं होतं असभ्य वक्तव्य

    चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या बाबत असभ्य वक्तव्य जळगाव केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीकडून बोदवडमध्ये मंगेश चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून मंगेश चव्हाण यांचा करण्यात निषेध आला

  • 30 May 2023 01:29 PM (IST)

    जेजुरीची देवस्थान विश्वस्त पदाचा वाद चिघळला

    जेजुरीची देवस्थान विश्वस्त पदाचा वाद चिघळला

    जेजुरी ग्रामस्थ आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार,

    जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस,

    थोड्याच वेळात जेजुरी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल।होणार

  • 30 May 2023 01:17 PM (IST)

    ठाकरे गट राष्ट्रवादीत विलिन होणार का ? नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

    संजय राऊत यांनी विचार करायला हवा

    ठाकरे गट राष्ट्रवादीत विलिन होणार का ? नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

    २०२४ ची निवडणूक आदित्य ठाकरे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार का ?

  • 30 May 2023 01:12 PM (IST)

    नाशिकमधल्या प्रकरणाचा वेगळं वळण

    अपहरण करणाऱ्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    भादवी कलम 306 अंतर्गत संशयित आरोपी समाधान झनकर विरोधात गुन्हा दाखल

    तसेच मुलाच्या घरासमोर मुलीच्या आई वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या ग्रामस्थांवर देखील गुन्हा दाखल

    मुलीचे अपहरण झाल्याने मुलीच्या आई वडिलांनी केली होती रेल्वे खाली आत्महत्या

    घटनेनंतर संशयित आरोपी अद्याप फरार

  • 30 May 2023 01:08 PM (IST)

    आम्ही पुन्हा १९ खासदार निवडून आणू - संजय राऊत

    मोदी सरकारला नऊ वर्षे झाली

    देशातील दहशतवाद मोदींनी कमी केला असं म्हटलं जात आहे.

    आजही काश्मीर पंडीताची हत्या सुरु आहेत.

    आम्ही पुन्हा १९ खासदार निवडून आणू - संजय राऊत

    राज ठाकरेंना पाहुणचारांची सवय आहे, त्यामुळे त्यांनी आयोध्येला जाऊन यावं

    प्रकाश आंबेडकरांकडून एक प्रस्ताव मागवला आहे.

    कुणी-कुणाला भेटलं म्हणून आम्ही अजिबात फरक पडणार नाही.

  • 30 May 2023 01:04 PM (IST)

    ठाण्यातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार..

    ठाण्यातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिराचा होणार जीर्णोद्धार..

    ठाण्यातील प्राचीन अशा कोपिनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

    ठाणे मार्केट परिसरामध्ये फार पूर्वीपासून कोपिनेश्वर मंदिर हे वसलेले आहे व याला प्राचीन इतिहास देखील प्राप्त आहे

    याच मंदिराच्या भोवतालचे बांधकाम हे पडीक झाले असून हे मंदिर पुन्हा नव्याने बांधण्यात येणार असून या ठिकाणी सर्व सुख सोयी देखील उपलब्ध होणार आहे.

    पुरातत्व खात्याने या संदर्भात परवानगी दिली असून आता या मंदिराच्या कामाला सुरुवात होणार आहे

    येत्या काही दिवसात या मंदिरामध्ये आपल्याला तीर्थक्षेत्राप्रमाणे सर्व सुविधा पाहता येणार आहेत.

  • 30 May 2023 01:03 PM (IST)

    सर्व पक्षांना संपवणं हे भाजपचं कामं आहे

    सर्व पक्षांना संपवणं हे भाजपचं कामं आहे

    मोदी हे बॉस आहेत, असं भक्तांनी जाहीर केलं, ऑस्ट्रेलियात मोदी जाऊन आल्यानंतर सात हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, हे सरकारनं जाहीर केलं आहे,

    १९ खासदार शिवसेना परत निवडून आणेल

  • 30 May 2023 01:01 PM (IST)

    यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यात चंदुकाका सराफ यांच्याकडून 350 सुवर्ण होन्सचा अभिषेक - छत्रपती संभाजीराजे

    - शिवराज्याभिषेक सोहळा जगभर पोहचावा यासाठी भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.

    - दोन ते अडीच लाख शिवभक्त या शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणार आहेत

    - सरकार तिथीप्रमाणे सोहळा साजरा करणार तर आम्ही तारखेप्रमाणे साजरा करणार आहे. यामध्ये कुठलाही वाद नाही.

    - यावर्षी 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्यामुळे चंदुकाका सराफ यांच्याकडून 350 सुवर्ण होन्सचा अभिषेक केला जाणार आहे

    - पोलिसांनी सर्व शिवभक्तांना गडावर येऊ द्यावं, कुणालाही अडवू नये, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे.

  • 30 May 2023 12:52 PM (IST)

    सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड, आमदार प्रणिती शिंदे यांचे आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन

    - सोलापूर शहरातील लिमयेवाडी परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

    - काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पन्नासहुन अधिक घरांची पडझड झाली.

    - घरावरील पत्रे, मोबाईल टॉवरसह स्लॅब कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

    - काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी या पडझड झालेल्या ठिकाणाना भेट देवून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

  • 30 May 2023 12:44 PM (IST)

    NGO चालवणार राज्यातील 500 अंगणवाडी, मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत करार

    - सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महत्वाचा करार करण्यात आला.

    - या करारानुसार राज्यातील 500 अंगणवाडी ngo मार्फत चालवणार आहे, अशी माहिती मंत्रो लोढा यांनी दिली.

    - शिवराज्यभिषक सोहळ हा आपल्या अभिमानाची गोष्ट आहे.

    - ३५० वा शिवराज्यभिषक सोहळा होणार आहे. २ जून हा तारखेप्रमाणे आणि ६ जून रोजी तिथी प्रमाणे आहे त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे.

  • 30 May 2023 12:34 PM (IST)

    अंबादास दानवे यांचा राज्य सरकारवर टॅब घोटाळ्याचा आरोप

    - जे सरकार महाराष्ट्रमध्ये आले विशेष करून शिंदे गटाचे मंत्री वाटेल तसे काम करत आहेत.

    - आनंदाचा शिधामध्ये घोटाळा झाला. फक्त 50 टक्के शिधावाटप झालं आहे.

    - रोजगार मंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे सचिव नंदकुमार यांनी त्यांच्या खात्यात घोटाळा केला आहे.

    - Tab साठी 15 ते 16 कोटी खर्च झाला. मात्र, gem पोर्टलसाठी 70 कोटी खर्च केला.

    - जीआयएस मोबाईल एप्लिकेशनसाठी ३५ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. हेही केवळ दोन वर्षासाठी वापरले जाणार.

    - केंद्राने हे मोबाईल एप्लिकेशन मोफत उपलब्ध करून दिले आहे. तर मग ३५ कोटी रूपयांचा खर्च का? असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

  • 30 May 2023 12:29 PM (IST)

    शिंदें गटाचा दावा असलेल्या मतदार संघात भाजपाने नेमले संयोजक

    - शिवसेना शिंदे गटाच्या 13 खासदारांच्या मतदारसंघात भाजपाने संयोजक नेमले आहेत.

    - भाजपाने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.

    - नाशिक लोकसभा मतदार संघात देवयानी फरांदे यांना तर शिर्डीत विखे पाटील यांना संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

  • 30 May 2023 12:21 PM (IST)

    आम्ही एकनाथ शिंदेंसोबतही बसायला तयार आहे, पण... प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

    - उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केलंय

    - आम्ही एकनाथ शिंदेंसोबत यांच्यासोबतही बसायला तयार आहोत.

    - भाजपासोबत आमचं कधीच जमणार नाही.

    - एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांची काम करण्यासाठी भेटावं लागतं त्याचा वेगळा अर्थ नको.

    - महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा.

    - कारण छगन भुजबळ ओबीसींचे नेते म्हणवतात आणि महाराष्ट्र सदन त्यांनीच बांधलं आहे.

    - ओबीसींचा अपमान झाला म्हणून छगन भुजबळांनी राजीनामा द्यावा

    - सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर आरएसएसच्या खिजगणतीत नाहीत.

    - युतीचा प्रश्न कधी सुटणार माहिती नाही

  • 30 May 2023 12:14 PM (IST)

    ठाकरे आणि राऊत सिल्व्हर ओकवर मुजरे घालतात - संजय शिरसाट

    मुजरे घालून मानदुखी, पाठदुखी होणार नाही याची काळजी घ्या- संजय शिरसाट

    संजय राऊतांना अजितदादा नाना पटोले लाथाडतात- संजय शिरसाट यांची बोचरी टिका

  • 30 May 2023 12:14 PM (IST)

    भाजपचे उद्यापासून महा संपर्क अभियान, एक महिना चालणार अभियान - विनोद तावडे

    - 30 मे ते 30 जून असे एक महिना भाजप देशात भाजप महासंपर्क अभियान राबविणार आहे.

    - या संपूर्ण अभियानाच्या अंतर्गत सुमारे 80 कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याची योजना देशभर आखण्यात आली आहे.

    - केंद्रातले मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी हे या अभियानात सामील होणार आहेत.

    - देशातील सुमारे 543 लोकसभामध्ये 227 नेते प्रत्येक जण 14 दिवस त्यांना दिलेल्या लोकसभा मतदारसंघात ठाण मांडणार आहेत.

    - या 14 दिवसांमध्ये या नेत्यांबरोबर प्रदेशचे सगळे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते अभियानात सहभागी होतील अशी माहिती राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली.

  • 30 May 2023 12:04 PM (IST)

    छोटा पुढारी अमरावती दौऱ्यावर, आमदार रवी राणा यांची घेतली भेट

    छोटा पुढारी अमरावती दौऱ्यावर, आमदार रवी राणा यांची घेतली भेट

    - छोटा पुढारी म्हणून चर्चेत असलेला घनश्याम दरोडे हा अमरावती दौऱ्यावर आहे.

    - या दौऱ्यात दरोडे याने आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी भेट दिली.

    - मुसंडी या मराठी चित्रपटात घनश्याम दरोडे सहकलाकार म्हणून भूमिका करत आहे.

    - ९ जूनला मुसंडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

    - या भेटीदरम्यान आमदार रवी राणा यांनी चिखलदऱ्यात मराठी सिनेमा तयार व्हावा यासाठी छोटा पुढारी यांच्या टीमला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं.

  • 30 May 2023 11:35 AM (IST)

    राज ठाकरेंसोबत राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही - देवेंद्र फडणवीस

    गप्पा मारण्यासाठी शिवतीर्थावर गेलो होतो- देवेंद्र फडणवीस

    मतांच विभाजन करणे हा भाजपाचा अजेंडा आहे, फडणवीस- राज ठाकरे भेटीवर नाना पटोले यांची प्रतिक्रीया

    लोकांना भाजपचा खरा चेहरा समजलेला आहे- नाना पटोले

  • 30 May 2023 11:30 AM (IST)

    IPL Final 2023 : स्पंजमुळे लाज निघाली, ECB पेक्षा 728 टक्क्यांनी श्रीमंत BCCI पीचसाठी होव्हर कव्हर्स कधी वापरणार?

    IPL Final 2023 : इंग्लंड क्रिकेट बोर्डापेक्षा BCCI 728 टक्क्यांनी श्रीमंत आहे. हे होव्हर कव्हर्स काय असतात? स्पंज वापरताना या सगळ्याच लाइव्ह प्रक्षेपण सुरु होतं. वाचा सविस्तर....

  • 30 May 2023 11:29 AM (IST)

    CSK IPL 2023 Winner : IPL मध्ये टीम्स कसा पैसा कमावतात? त्यांच्या कमाईच इकोनॉमिक्स एकदा समजून घ्या

    CSK IPL 2023 Winner : आयपीएलमध्ये सर्व टीम्स अव्वल राहण्यासाठी जीवाच रान का करतात? सेंट्रल रेवेन्यू पॅक्टमधील पैसा हे त्यामागच मुख्य कारण आहे. कुठल्या टीमला कसा पैसा मिळतो, ते गणित जाणून घ्या. वाचा सविस्तर....

  • 30 May 2023 11:28 AM (IST)

    CSK IPL 2023 Winner : हरल्यानंतर Hardik Pandya ने कोणालाच दोष नाही दिला, फक्त एवढच म्हणाला....

    फायनलमध्ये सर्वोच्च क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार हे स्पष्ट होतं, घडलं सुद्धा तसच. एक कोणतरी जिंकणार आणि कोणतरी हरणार, तसं चेन्नई जिंकली, गुजरातची टीम हरली. वाचा सविस्तर....

  • 30 May 2023 11:27 AM (IST)

    CSK IPL 2023 Winner : CSK चॅम्पियन बनण्याच्या काहीतास आधीच मालकाला झाला तब्बल इतक्या कोटींचा फायदा

    CSK IPL 2023 Winner : नफ्याच्या रक्कमेचा आकडा वाचून डोळे विस्फारतील. धोनीने CSK ला चॅम्पियन बनवण्याच्या काहीतास आधीच हे घडलं होतं. सीएसकेचे मालक कोण आहेत? त्यांना इतका नफा कसा झाला? वाचा सविस्तर....

  • 30 May 2023 11:26 AM (IST)

    IPL 2023 Awards List : ऑरेंज, पर्पल कॅपसह कोणाला कुठला पुरस्कार मिळाला जाणून घ्या, विजेत्यांची यादी

    IPL 2023 Awards List : आयपीएल 2023 मधील पुरस्कार विजेत्यांची यादी एका क्लिकवर. ऑरेंज, पर्पल कॅपसह फेयर प्ले, सर्वाधिक चौकार असे सुद्धा पुरस्कार असतात. हे पुरस्कार कोणाला मिळाले ते जाणून घ्या. वाचा सविस्तर....

  • 30 May 2023 11:19 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेसह 12 महापालिकांच्या निवडणुका तातडीने घ्या, घोडिलेंची मागणी

    औरंगाबाद महानगरपालिकामध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त जास्त काळापासून प्रशासक आहे- नंदकुमार घोडिले

    भारताच्या इतीहासात असे पहिल्यांदाच घडत आहे- नंदकुमार घोडिले

  • 30 May 2023 10:53 AM (IST)

    काहीही झालं तरी तंबाखूचे प्रमोशन करणार नाही, वडिलांना वचन दिलं होतं - सचिन तेंडुलकर

    मी वडिलांना दिलेलं वचन नेहमी पाळलं

    आज बाबा वरतून बघत असतील तर ते खूप खुश असतील

    चांगले मौखिक आरोग्य हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे

  • 30 May 2023 10:46 AM (IST)

    धानोरकरांच्या निधनाची बातमी धक्कादायक - अजित पवार

    बाळू धानोरकर यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आणि दु:खद आहे.

    2019 मध्ये मोदींची लाट असतानाही धानोरकर निवडून आले होते

    त्यांचं नेतृत्व अतिशय कणखर होतं

    सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जुळलेला नेता, अशी त्यांची ओळख होती

    अजित पवारांनी धानोरकर यांना वाहिली श्रद्धांजली

  • 30 May 2023 10:43 AM (IST)

    शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीची होणार बैठक

    बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत रणनिती आखणार असल्याची चर्चा

    लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार

    अजित पवार, जयंत पाटील बैठकीस राहणार उपस्थित

  • 30 May 2023 10:36 AM (IST)

    ' स्वच्छ मुख अभियानाचा' सचिन तेंडुलकर बनला 'स्माईल अँबॅसेडर'

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ मुख अभियान

    अभियानातून मौखिक आरोग्याबाबत जनजागृती

  • 30 May 2023 10:31 AM (IST)

    निळू फुले यांची कन्या गार्गी फुले यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

    अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गार्गी फुले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला प्रवेश

  • 30 May 2023 10:14 AM (IST)

    जम्मू-कश्मीर : अमृतसरहून कटरा येथे जाणाऱ्या बसला अपघात, 10 जणांचा मृत्यू

    अमृतसरहून कटरा येथे जाणाऱ्या बसला जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर हायवेजवळ अपघात झाला

    या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 30 May 2023 10:04 AM (IST)

    झारखंड : 12 जागांवर ईडीचे छापे

    झारखंडमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे. 12 ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहेत.

    काँग्रेस आमदार प्रदीप यादव यांच्याशी संबंधित अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले आहेत.

  • 30 May 2023 09:54 AM (IST)

    धाराशिवमध्ये पाणीसाठा खालवला

    धाराशिव जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा खालवला असून 59 प्रकल्पतील पाणीसाठा खाली गेला आहे. 13 प्रकल्प कोरडे पडले आहेत. तापमान वाढीचा यावर परिणाम झाला आहे. गेल्या 8 दिवसांत अडीच टक्के पाणीसाठा कमी झाले आहे.

  • 30 May 2023 09:46 AM (IST)

    केळीचे खोड कापले...

    जळगाव यावल रावेर परिसरात अज्ञात माथे फिरूनने केळीचे खोड कापून फेकले

    आधीच शेतकरी अवकाळी वादळी वाऱ्यामुळे त्रस्त त्यात हे प्रकार

    पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची शेतकरी वर्गांची मागणी

    यावल तालुक्यातील अट्रावल शिवारात गावातील दोघांनी एका शेतकऱ्याचे केळीचे ५० खोडं कापून फेकले.

    शेतकऱ्याचे २० हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी यावल पोलिसांत दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आली

  • 30 May 2023 09:40 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात अपघात, १२ जण जखमी

    लग्न समारंभ आटपून हिंगोलीकडे जात असताना वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते लोणार दरम्यानच्या महामार्गावरील मंगल वाडी नजीक ट्रॅव्हल्स आणि कारमध्ये अपघात  झाला. या अपघातामध्ये  12 जण जखमी झाले आहे.

  • 30 May 2023 09:32 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात पाऊस

    गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे चार वाजेपासून साडेपाच वाजेपर्यंत रिमझिम पावसाची नोंद

    सध्या गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात वातावरणात बदल झालेला आहे

    पहाटे आलेल्या पावसामुळे पावसाळ्यासारखे वातावरण

    या वातावरणामुळे शेतकऱ्यांना व शेतीचे कामाला थोडा फायदा होईल

  • 30 May 2023 09:26 AM (IST)

    प्राण्यांसाठी पाणी अन् चाऱ्याची व्यवस्था

    सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात उष्णतेचा चांगलाच तडाखा बसतोय. त्याला प्राणी ही अपवाद नाहीत

    प्राण्यांना होत असलेला हाच त्रास लक्षात घेवून पिंपरी चिंचवडच्या वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात प्राण्यांसाठी चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था केलीय

    भटक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था ही संस्थेकडून करण्यात आलीय.

  • 30 May 2023 09:18 AM (IST)

    पुणे रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

    पिंपरी चिंचवड शहरामध्ये आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे

    खाजगी रक्त पेढ्यांमध्येही "ए"आणि "ओ" रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे.

    यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय केवळ दहा दिवस पुरेल एवढाच साठा उरलेला आहे. त्यामुळं रुग्णांचे हाल होत आहेत. शहरातील रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्याने रक्त तुटवडा भासत असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले

  • 30 May 2023 09:11 AM (IST)

    पवना धरणात केवळ 26.35 टक्के पाणीसाठा

    मावळच्या पवना धरणात केवळ 26.35 टक्के पाणीसाठा, मागील वर्षी हाच साठा 26.82 इतका होता

    मावळवासीयांची जीवनवाहिनी आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण पाणलोट क्षेत्रात केवळ 26.35 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे

    सध्या उष्णतेच्या झळा बसू लागल्यात त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागलीये

  • 30 May 2023 09:07 AM (IST)

    तीन घरे जळून खाक

    चोपडा तालुक्यात गॅस हंडीचा स्फोट, तीन घरे जळून खाक

    गॅस नळीतील गॅस गळती झाल्याने नळीने पेठ घेतला त्यात तीन घरे जळून खाक झाली

    संसार उपयोगी वस्तू, सर्व साहित्य जळून खाक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

    रात्रीच्या सुमारास ही आग लागली असून यात दोन जण जखमी झाले

  • 30 May 2023 08:58 AM (IST)

    पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याआधी काँग्रेसची तयारी सुरू

    काँग्रेसकडून पोटनिवडणूकीसाठी उमेदवार निश्चित झाल्याची माहिती

    पुणे लोकसभा मतदारसंघात आमदार रविंद धंगेकरांना काँग्रेस रिंगणात उतरवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकरांना दिले तयारीचे आदेश

    एकिकडे पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला असतानाच दुसरीकडे मात्र काँग्रेसने उमेदवार केला निश्चित

  • 30 May 2023 08:52 AM (IST)

    कॉसमॉस बँकेच्या मानद अध्यक्षांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा

    डॉ. मुकुंद अभ्यंकर यांना न्यायालयाने सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार 200 रुपये दंडाची शिक्षा सुनावली

    दुचाकीला कारने जोरात धडक देत महिलेच्या मृत्यूस अभ्यंकर जबाबदार

    जुलै 2016 मध्ये झालेल्या या अपघातात अरुंधती हसबनीस (वय 29) यांचा झाला होता मृत्यू

    अपघातानंतर अभ्यंकर घटनास्थळावरून पळून जात होते

    नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं

  • 30 May 2023 08:46 AM (IST)

    जेजुरी ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस

    आज जेजुरी ग्रामस्थ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेणार

    त्यापूर्वी जेजुरीत आज ग्रामस्थांच्यावतीने घंटानाद आंदोलन केले जाणार

    विश्वस्त पदावरून सुरू झालेलं आंदोलन चिघळताना दिसतंय

    अजित पवार, सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे यांच्याकडून आंदोलनाला पाठिंबा

  • 30 May 2023 08:40 AM (IST)

    खासदार बाळू धानोरकरांचं पार्थिव नागपूरकडे रवाना

    एअर ॲम्ब्युलन्सने पार्थिव नागपूरला आणण्यात येईल

  • 30 May 2023 08:35 AM (IST)

    नाशिक | आता काळाराम मंदिरातदेखील ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता

    मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याबाबत हालचाली सुरू

    विश्वस्तांच्या बैठकीत चर्चा करून घेतला जाणार निर्णय

    सप्तशृंगी वणी मंदिरानंतर काळाराम मंदिरात देखील ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता

  • 30 May 2023 08:28 AM (IST)

    नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कामगिरी

    मागील सहा महिन्यांत तब्बल 86 लाचखोरीचे टाकले सापळे

    125 लाचखोरांना अटक करून नाशिक विभाग राज्यात अव्वल

    नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिवसाआड कारवाई सुरू

  • 30 May 2023 08:21 AM (IST)

    नाशिक : निळवंडे धरणाच्या कालव्याचे उद्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

    नाशिक आणि अहमदनगरच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागणार

    8.5 टीएमसी क्षमता असलेल्या आणि 5177 कोटी खर्च आलेला सर्वात मोठा प्रकल्प

    नगर जिल्ह्यातील 125 गावांची 68 हजार हेकटर जमीन येणार सिंचनाखाली

    तर नाशिकच्या सिन्नरसह इतर तालुक्यांना देखील होणार मोठा लाभ

  • 30 May 2023 08:14 AM (IST)

    कोल्हापुरातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबली

    आमदार प्रकाश आबिटकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचे अबिटकर यांनी केली होती मागणी

    आबिटकर यांच्या पत्रानुसार तात्काळ कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार आयुक्तांना सूचना

    दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री कारखान्याच्या निवडणुकीकडे लागलं होतं लक्ष

    कारखाना निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार के पी पाटील येणार आमने सामने

  • 30 May 2023 08:08 AM (IST)

    सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबणीवर

    कोल्हापुरातील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लांबणीवर जाणार आहे.

    आमदार प्रकाश आबिटकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र.

    आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याची आबिटकर यांनी केली होती मागणी.

    आबिटकर यांच्या पत्रानुसार तात्काळ कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार आयुक्तांना सूचना

  • 30 May 2023 08:06 AM (IST)

    चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

    बाळू धानोरकर हे महाराष्ट्रातील चंद्रपूरचे काँग्रेस खासदार होते. 47 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा प्रवास केला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. वाचा सविस्तर.....

  • 30 May 2023 08:04 AM (IST)

    CSK Win IPl Final 2023 : फायनलमध्ये गुजरातचा पराभव करत सीएसके पाचव्यांदा चॅम्पिअन

    CSK Win IPl Final 2023 : अखेरच्या चेंडूपर्यंत आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात सीएसकेने विजय मिळवत इतिहास रचला आहे. वाचा सविस्तर....

Published On - May 30,2023 8:03 AM

Follow us
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.