लसीकरण कॅम्प आणि बॅनरबाजीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली; महापौरांच्या दालनातच राष्ट्रवादीचा गोंधळ

| Updated on: Oct 18, 2021 | 4:49 PM

ठाण्यात लसीकरण मोहिमेचा कॅम्प लावण्याच्या मुद्दयावरून आणि बॅनरबाजीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रचंड जुंपली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घुसून गोंधळ घातला. (chaos between ncp and shiv sena in thane mayor office)

लसीकरण कॅम्प आणि बॅनरबाजीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली; महापौरांच्या दालनातच राष्ट्रवादीचा गोंधळ
thane mayor office
Follow us on

ठाणे: ठाण्यात लसीकरण मोहिमेचा कॅम्प लावण्याच्या मुद्दयावरून आणि बॅनरबाजीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रचंड जुंपली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या दालनात घुसून गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं.

लसीकरण आवाहनाचे बॅनर शिवसेनेने फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. आज राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी महापौर दालनात जाऊन महापौर नरेश म्हस्के यांना निवेदन देताना त्यांनी लसीकरण मोहिमेच्या कॅम्पवरून आणि बॅनरबाजीवरून महापौरांना जाबही विचारला. यावेळी नजीमबुल्ला यांनी लसीकरणासाठी 20 लाखांचा धनादेश दिला. मात्र, महापौरांनी धनादेश घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी निवेदन घेण्यास नकारही दिला.

महापौरांनीच आवाहन केलं होतं

महापौरांनी निवेदन आणि चेक स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मी तुम्हाला ओळखतच नाही, असं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. मी परांजपेंकडून निवदेन घेणार नाही असं ते म्हणाले. मात्र, नंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून त्यांनी निवेदन स्विकारले.

आमचा चेक घेण्यास नकार दिला

पाचपाखाडीला 22 नंबर रोड आहे. तिथे कॅम्प घ्यायचा होता. ठाण्यात शिवाजी मैदानात महोत्सव घ्यायचा होता. त्याचं निवेदन द्यायला गेलो होतो. शनिवारी महापौरांनी एक निवेदन काढलं होतं. यावेळी त्यांनी लसीकरणासाठी स्टेज वगैरे लागतो. त्याचा खर्च स्थानिक मंडळ करतं, असं महापौरांनी म्हटलं होतं. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 20 लाखाचा चेक पाठवला होता. 10-10 लाखांचे असे दोन चेक होते. ते आम्ही द्यायला गेलो होतो. दहा लाख रुपये कोपरी पाचपाखाडीसाठी खर्च करण्याचे सूचवले होते. मात्र, त्यांनी चेक घेण्यास नकार दिला, असं आनंद परांजपे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीकडून राजकारण

राष्ट्रवादीकडून कळव्यात राजकारण झालं. कळवा पूर्वेला लसीकरण कमी झालं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे आले होते. त्यांनी लोकांच्या घरापर्यंत जाण्यास सांगितलं होतं. आमचे खासदार आणि नगरसेवकांनी पुढाकार घेऊन मेगा कॅम्प लावला. दिवा येथेही एकाच दिवशी एकाच ठिकाणी 10 हजार 10 जणांना लस दिली. लसीकरणाचा मेगा कॅम्पही लावला. आमच्या खासदार आणि नगरसेवकांनी बैठका घेतल्या. घरोघरी जाऊन कॅम्प राबवले, असं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

कल्याणच्या कारागृहात तब्बल 20 कैद्यांना कोरोना, तत्काळ रुग्णालयात हलवलं, प्रशासन अलर्ट

VIDEO | लाकडी दांडके-लोखंडी रॉड, नालासोपाऱ्यात दोन गट भिडले, तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

VIDEO | वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी, मध्यरात्री सव्वाबारा वाजता भररस्त्यात ढिशूम-ढिशूम

(chaos between ncp and shiv sena in thane mayor office)