VIDEO | वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी, मध्यरात्री सव्वाबारा वाजता भररस्त्यात ढिशूम-ढिशूम

भर रस्त्यावर दोन गटांमध्ये ठोसा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. मात्र ही मारामारी करणारे कोण आहेत, नेमकी का मारामारी करत आहेत, हे मात्र स्पष्ट झाले नाही.

VIDEO | वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी, मध्यरात्री सव्वाबारा वाजता भररस्त्यात ढिशूम-ढिशूम


वसई : वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पश्चिम अंबाडी रोडवरील भाजी मार्केटसमोरील मध्यरात्री सव्वाबारा वाजताची ही दृश्यं आहेत.

काय आहे प्रकरण?

भर रस्त्यावर दोन गटांमध्ये ठोसा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. मात्र ही मारामारी करणारे कोण आहेत, नेमकी का मारामारी करत आहेत, हे मात्र स्पष्ट झाले नाही. मात्र हाकेच्या अंतरावर माणिकपूर पोलीस ठाणे असतानाही मारामारी करणाऱ्यांची एवढी हिंमत वाढल्याने वसईत कायदा सुव्यस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस आयुक्तालय स्थापन, मात्र गस्तीवर पोलीस नाही

वाढत्या लोकसंख्येनुसार गुन्हेगारी रोखण्यासाठी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन सव्वा वर्ष उलटले आहे. तरीही एकही पोलीस कर्मचारी रात्रीचा गस्तीवर नाही. त्यामुळेच वसई विरारची सुरक्षा सध्या रामभरोसेच चालू आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

दुसरीकडे, एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पूल ते लोकनगरी या दरम्यान झालेल्या नवीन रस्त्यावर हा प्रकार घडला. एक तरुण आपल्या परिवारासह या रस्त्यावरून कारने जात होता. यावेळी अचानक एक तरुणी गाडीसमोर आली आणि गाडीवर हात आपटत शिवीगाळ करू लागली. त्यामुळे या तरुणाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी पूर्णपणे नशेत होती.

रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ

यानंतर या तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या आणखी काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली. मात्र हा संपूर्ण धिंगाणा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा प्रकार तासभर सुरु असतानाही पोलीस मात्र तरुणी निघून गेल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि रिकाम्या हाती परतले.

संबंधित बातम्या

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

VIDEO | अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI