VIDEO | अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ

या तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या आणखी काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली. मात्र हा संपूर्ण धिंगाणा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे

VIDEO | अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ
अंबरनाथमध्ये मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 8:42 AM

अंबरनाथ : एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली.

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ पूर्व भागातील गोविंद पूल ते लोकनगरी या दरम्यान झालेल्या नवीन रस्त्यावर हा प्रकार घडला. गुरुवारी रात्री एक तरुण आपल्या परिवारासह या रस्त्यावरून कारने जात होता. यावेळी अचानक एक तरुणी गाडीसमोर आली आणि गाडीवर हात आपटत शिवीगाळ करू लागली. त्यामुळे या तरुणाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणी पूर्णपणे नशेत होती.

रस्त्यावरून जाणाऱ्यांना शिवीगाळ

यानंतर या तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या आणखी काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली. मात्र हा संपूर्ण धिंगाणा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हा प्रकार तासभर सुरु असतानाही पोलीस मात्र तरुणी निघून गेल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले आणि रिकाम्या हाती परतले.

पाहा व्हिडीओ :

पुण्यातही मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

याआधी, मद्यधुंद तरुणीने पुण्यात भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला होता. गजबजलेल्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने अक्षरशः धिंगाणा घातला होता. रस्त्यावर झोपून तिने वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. रात्री 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात तरुणीने घातलेल्या धिंगाण्याची सर्वत्र चर्चा रंगली होती.

धुळ्यात दीर-भावजयीचा दारु पिऊन धिंगाणा

दुसरीकडे, मुंबई-आग्रा महामार्गावर धुळ्यात महिला आणि पुरुषाने दारु पिऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे चौकशीसाठी आलेल्या पोलिसाचीच कॉलर पकडून महिलेने त्यांना धक्काबुक्की केली. संबंधित महिला आणि पुरुष हे दीर-भावजय असल्याची माहिती नंतर समोर आली होती.

संबंधित बातम्या

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

कोण म्हणतो पुरूषच जास्त पेताड, आता महिलाही डबल टल्ली! वाचा सविस्तर

दूध आणायच्या वेळेत अनेक पुणेकर दारु दुकानांच्या रांगेत, महिलाही वाईनसाठी लाईनमध्ये

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.