कोण म्हणतो पुरूषच जास्त पेताड, आता महिलाही डबल टल्ली! वाचा सविस्तर

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गुजरातमध्ये मागील पाच वर्षांमध्ये महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. (liquor drinking by women)

कोण म्हणतो पुरूषच जास्त पेताड, आता महिलाही डबल टल्ली! वाचा सविस्तर
प्रातिनिधिक फोटो

गांधीनगर : असं म्हटलं जातं की पुरुषांना दारुचं व्यसन (liquor drinking) जास्त आहे. काही पुरुष प्रतिष्ठा जपण्यासाठी दारु पितात. तर काही जण व्यसन म्हणून दारुचं सेवन करतात असं म्हटलं जातं. मात्र, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गुजरातमध्ये मागील पाच वर्षांमध्ये महिलांचे दारु पिण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. ही वाढ दुपटीने झाली असून यामध्ये ग्रामीण भागातील महिला दारु पिण्यामध्ये आघाडीवर आहेत. (liquor drinking by women has been increased in gujarat)

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने 2019-2020 या वर्षी दारु पिणाऱ्या लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये 33343 महिला आणि 5351 परुषांना माहिती विचारण्यात आली. यापेकी 200 महिलांनी (0.6 टक्के) तसेच 310 पुरुषांनी (5.8 टक्के) दारु पिल्याचे सांगतले. 2015 मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 68 महिला (0.3 टक्के) आणि 668 परुषांनी ( 11.1 टक्के) दारू पिल्याचे मान्य केले होते  2015 मध्ये 6018 महिला आणि 22932 पुरुषांचा सर्व्हे करण्यात आला होता. सन 2015 आणि 2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षणांची तुलना केल्यास दारु पिण्याचे प्रमाण महिलांमध्ये वाढले असून परुषांमध्ये हे प्रमाण 2015 पेक्षा कमी झाले आहे.

ग्रामीण भागात दारु पिणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले

गुजरातमध्ये शहरी भागात दारु पिणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले आहे. 2015 मध्ये हे प्रामाण 0.1 टक्के होते. ते 2020 मध्ये 0.3 टक्क्यांवर आले आहे. तसेच शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त दारू पित असल्याचे समोर आलेय. ग्रामीण भागात 2015 मध्ये 0.4 टक्के महिला दारुचे सेवन करत होत्या. ते प्रमाण आता वाढून 2020 मध्ये 0.8 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दुसरीकडे पुरुषांचे दारू पिण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. ग्रामीण भागात 2015 मध्ये दारु पिणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 11.4% होते. ते आता 2020 मध्ये 6.8% टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच ग्रामीण भागातही महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रामाणात दारु पित आहेत.

दरम्यान, गुजरातमध्ये अवैध दारुची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. येथे सुरतमध्ये 30 डिसेंबरला तब्बल 2 कोटींच्या अवैध दारुसाठ्यावर बुलडोझर फिरवण्यात आला होता. पलसाना आणि कडोदरा येथील पोलिसांनी मागील दोन वर्षांमध्ये ही दारू जप्त केली होती. सध्याच्या बाजारमुल्यानुसार या दारूची किंमत तब्बल 2 कोटी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा दारुसाठा मंगळवारी बारडोली गावाजवळ नष्ट केला होता.

संबंधित बातम्या :

गडचिरोलीतील 66 ग्रामपंचायतींसह 110 गावांचा दारुमुक्त निवडणुकीचा ठराव!

New Year Celebration | हवी तेवढी घ्या आणि सुरक्षित घरी जा, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून मद्यपींसाठी अनोखी सुविधा

(liquor drinking by women has been increased in gujarat)

Published On - 2:58 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI