कै.धर्मवीर आनंद दिघे तरण तलावाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

| Updated on: Feb 28, 2022 | 6:05 PM

आज ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहराने पर्यावरणाचा समतोल राखला असून महापालिकेने अनेक क्रीडांगणे, मैदाने तसेच स्टेडियम निर्माण केल्याने आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असणाऱ्या या शहरात राहण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती असल्याचेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

कै.धर्मवीर आनंद दिघे तरण तलावाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
कै.धर्मवीर आनंद दिघे तरण तलावाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
Follow us on

ठाणे : धर्मवीर कै.आनंद दिघे यांच्या नावाने बाळकुम येथे ऑलम्पिकच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या तरण तलावा (Swimming Pool)चा या परिसरातील जलतरणपट्टूना चांगलाच फायदा होणार आहे. हे खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करून ठाणे शहराचा नावलौकिक करतील असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. ठाणे महापालिकेच्या विद्यमाने प्रभाग क्रमांक 8 मध्ये महापालिका निधीतून बाळकुम येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ‘कै.धर्मवीर आनंद दिघे’ तरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यास खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उप महापौर पल्लवी कदम यांच्यासह अन्य लोकप्रतिनीधी, जलतरणपपट्टू, प्रशिक्षक व स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते. (Dharmaveer Anand Dighe swimming pool inaugurated by Gaurdian Minister Eknath Shinde)

खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून ठाणे शहराचा नावलौकिक करतील

महापालिकेने खेळांसाठी दिलेल्या उत्तम सुविधांमुळे आज राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळात ठाण्यातील खेळाडू चमकत आहेत. आज महापालिकेच्या सहाव्या कै.धर्मवीर आनंद दिघे” तरण तलावाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. बाळकुम, घोडबंदर परिसरातील जलतरणपट्टूना याचा चांगलाच फायदा होणार असून अनेक राष्ट्रीय स्पर्धेत या शहरातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून ठाणे शहराचा नावलौकिक करतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे यांचं बाळकुम परिसरावर विशेष प्रेम होते. आज ऑलम्पिकच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या तलावाला कै. धर्मवीर आंनद दिघे यांचे नाव दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर तसेच सर्व पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक व महापालिका प्रशासनाने विशेष आभार मानले.

आज ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. या शहराने पर्यावरणाचा समतोल राखला असून महापालिकेने अनेक क्रीडांगणे, मैदाने तसेच स्टेडियम निर्माण केल्याने आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असणाऱ्या या शहरात राहण्यासाठी नागरिकांची प्रथम पसंती असल्याचेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका

शहरात विकास कामांसोबत खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ठाणे ही एकमेव महानगरपालिका आहे. महापालिकेने तयार केलेल्या क्रीडांगण, स्टेडियम, क्रीडा संकुल व मैदानात अनेक खेळाडू सराव करत असून अर्जुन पुरस्कार, श्रीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार यासोबत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठाण्यातील खेळाडूंनी पटकाविले आहेत. “कै.धर्मवीर आनंद दिघे” तरण तलावाचा फायदा ठाण्यातील अनेक जलतरणपट्टूना सरावासाठी होणार असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी या लोकार्पण सोहळ्यानिमित्त व्यक्त केले. (Dharmaveer Anand Dighe swimming pool inaugurated by Gaurdian Minister Eknath Shinde)

इतर बातम्या

Maratha Reservation: तर ठाकरे-पवारांच्या बंगल्यात घुसू; संभाजी छत्रपतींच्या उपोषणानंतर मराठा ठोक मोर्चा आक्रमक

CCTV | भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, डोंबिवलीत भरदिवसा प्रकार