Smart City Award : राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक

| Updated on: Apr 18, 2022 | 10:05 PM

या स्पर्धेसाठी दोन टप्प्यांमध्ये अनेक कसोट्यांवर मूल्यमापन करण्यात आले. एकूण 100 सहभागी प्रकल्पांपैकी केवळ 50 स्मार्ट सिटी प्रकल्पांची कोविड-19 साथीच्या कालखंडात अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या डिजी ठाणे प्रकल्पाला ‘प्रशासन’ श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे.

Smart City Award : राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक
राष्ट्रीय स्तरावरील इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धेत डिजीठाणे प्रकल्पाचा दुसरा क्रमांक
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या “इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा 2020” (India Smart City Awards Competition 2020) मध्ये ठाणे महापालिकेच्या ‘डिजी ठाणे‘ (Digi Thane) या डिजिटल प्रकल्पाने राष्ट्रीयस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त(1) संदीप माळवी यांनी सुरत येथील समारंभ सोहळ्यात हा पुरस्कार स्वीकारला. भारत सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड्स स्पर्धा 2020 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कोरोना काळात प्रकल्पांची अंमलबजावणी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या संदर्भातील कामगिरीचे धोरण, प्रकल्प आणि संकल्पना या मापदंडांवर मूल्यमापन करण्यात आले असून यामध्ये अग्रणी ठरणाऱ्या शहरांना आयएससीएच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. (Digithane project ranked second in the national level India Smart City Awards)

एकूण 100 सहभागी प्रकल्पांपैकी केवळ 50 स्मार्ट सिटी प्रकल्पांची निवड

या स्पर्धेसाठी दोन टप्प्यांमध्ये अनेक कसोट्यांवर मूल्यमापन करण्यात आले. एकूण 100 सहभागी प्रकल्पांपैकी केवळ 50 स्मार्ट सिटी प्रकल्पांची कोविड-19 साथीच्या कालखंडात अभिनव संकल्पना राबविल्याबद्दल निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या डिजी ठाणे प्रकल्पाला ‘प्रशासन’ श्रेणीमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. डिजी ठाणेने राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. त्याचबरोबर, डिजी ठाणे प्रकल्पाने कोरोना साथीच्या कालखंडात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डिजी ठाणेच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात अद्ययावत आकडेवारी देणारा डॅशबोर्ड कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या, मृत्यूदर, अॅम्ब्युलन्स सेवा इत्यादींच्या अद्ययावत माहितीमुळे कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सहाय्य झाले आहे.

शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घेतला डिजिठाणे सुविधेचा लाभ

तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून डिजीठाणे कोव्हिड-19 डॅशबोर्डच्या संकेतस्थळावर विसर्जनाची टाइमस्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने यशस्वीरीत्या राबविण्यात येणारा डिजीठाणे हा डिजीसिटी प्लॅटफॉर्म सर्वाधिक संवादी(interactive) पद्धतीने कार्यरत असणारे वेब पोर्टल आणि मोबाईल अॅप्लिकेशन ठरले आहे. ठाणे स्मार्ट सिटीज लिमिटेडने उत्कृष्ट कामगिरी केली असून सरकार, स्थानिक व्यवसाय यांच्यात वाढलेली डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सहकार्य ही उद्दिष्टे साध्य केली आहेत. या सर्व उपक्रमाला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच डिजी ठाणेचा सन्मान हा राष्ट्रीय पातळीवर करण्यात आला आहे. (Digithane project ranked second in the national level India Smart City Awards)

इतर बातम्या

Raj Thackeray : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’ म्हणणाऱ्या अब्दुल मतीन शेखानीला जामीन, भोंग्यांच्या मुद्द्यावरुन थेट राज ठाकरेंना इशारा!

Kalyan Railway CCTV: तोंड चाकाखाली जाणारच होतं, इतक्यात पाय खेचला म्हणून वाचला! स्थळ – कल्याण स्थानक