AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला लागली गोळी, मंगेश गायकर आणि त्यांचा मुलगा जखमी

कल्याणमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिका गोळी लागल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत बांधकाम व्यावसायिक आणि त्यांचा मुलगा जखमी झाले आहेत. दोघांना कल्याणच्या मीरा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं आहे.

कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला लागली गोळी, मंगेश गायकर आणि त्यांचा मुलगा जखमी
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 10, 2024 | 6:37 PM
Share

कल्याणमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा मंगेश श्री ग्रुपचे मालक मंगेश गायकर यांना गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. मंगेश गायकर यांच्या चिकन घर येथील कार्यालयात संबंधित घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, मंगेश गायकर यांच्या संरक्षणासाठी देण्यात आलेल्या बंदुकीतून निघालेल्या गोळीनेच त्यांना गोळी लागली आहे. पण मिस फायरिंग झाली की गोळीबार झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. गोळी बंदूक साफ करताना अपघाताने चालली की कोणी इतरांनी गोळी चालवली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेत मंगेश गायकर यांच्यासह त्यांचा मूलगा जखमी झाला आहे. त्यांना तातडीने कल्याणमधील मीरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मंगेश गायकर यांच्या कार्यालयात त्यांच्या व्यावसायातील पार्टनर एकत्र बसले होते. यावेळी बंदुक साफ करत असताना मंगेश यांच्या हातून बंदुकीतून चुकून गोळी सुटली. ती गोळी त्यांच्या हाताच्या आरपार गेली आणि नंतर त्यांच्या मुलालादेखील लागली, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सविस्तर घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पोलीस मीरा हॉस्पिटल येथे चौकशीसाठी गेले आहेत. या प्रकरणी गायकर यांना गोळी कशी लागली? हा तपासाचा भाग आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्यांच्या तपासात काय माहिती समोर येते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था