गायमुख खाडीत ‘तरंगते हॉटेल’, ठाणेकरांना अनुभता येणार अनोखी मेजवानी

| Updated on: Jul 03, 2021 | 11:12 PM

महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेल्या बोटीवरील तरंगत्या हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यातदेखील अनुभवता येणार आहे. सोमवारपासून या प्रकल्पाला सुरुवात होणार असून ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ हे तरंगते हॉटेल सुरू होणार आहे.

गायमुख खाडीत तरंगते हॉटेल, ठाणेकरांना अनुभता येणार अनोखी मेजवानी
THANE FLOATING RESTAURANT
Follow us on

ठाणे : महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेल्या बोटीवरील तरंगत्या हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यातदेखील अनुभवता येणार आहे. सोमवारपासून या प्रकल्पाला सुरुवात होणार असून ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ हे तरंगते हॉटेल सुरू होणार आहे. सध्या कोरोनामुळे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एक जेट्टी दाखल झाली असून यामध्ये सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता तरंगत्या हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे. (First floating hotel will start in Thane from Monday)

निर्बंधामुळे तरंगत्या हॉटेलची सफर बंद

गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलची संकल्पना मांडण्यात आली होती. ही संकल्पना सर्वप्रथम मुंबईमध्ये राबवण्यात आली. लॉकडाऊन आणि निर्बंधामध्ये या तरंगत्या हॉटेलची सफर बंद करण्यात आली होती. मात्र आता ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ अशाच तरंगत्या हॉटेलची सुरुवात होणार असून ठाणेकरांना आगळा वेगळा अनुभव घेता येणार आहे.

द सी फ्लोटिंग रेस्टोरेंट या खासगी कंपनीने सुरु केले हॉटेल

गायमुख येथे या तरंगत्या हॉटेलमधून एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराळ भाग असे नयनरम्य दर्शन होणार आहे. या संकल्पनेतून पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यात येणार आहे. द सी फ्लोटिंग रेस्टोरेंट या खासगी कंपनीने हे हॉटेल सुरू केलेले असून महाराष्ट्र शासनाची ही संकल्पना आहे. एकीकडे चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट प्रकल्प हाती असतानाच ठाण्यातील गायमुख खाडीत तरंगणारे हॉटेल ठाणेकरांना आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

हॉटेलसाठी महाराष्ट्र मेरिटाईन बोर्डने दिली परवानगी

दरम्यान या तरंगत्या हॉटेलसाठी महाराष्ट्र मेरिटाईन बोर्डने परवानगी दिली असून या जहाजमध्ये 100 पर्यटक बसू शकतात. ठाण्यात प्रथमच खाडीकिनारी फ्लोटिंग रेस्टॉरंट अशी नवीन संकल्पना अमलात येत आहे. तसेच यामध्ये पर्यकटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या असून लाईफ गार्ड, सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या :

पवार-अमित शाह भेट, ठाकरे- मोदी, फडणवीस-शाह, ते राऊत- शेलार भेट, आतापर्यंत किती गुप्त भेटी?

“… तर भाजप विचार करेल” संजय राऊत-आशिष शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

संजय राऊत-आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, नाना पटोले म्हणाले…

(First floating hotel will start in Thane from Monday)