Kalyan Fraud : मनसे शहराध्यक्षांवर चार कोटी 11 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा

| Updated on: Mar 19, 2022 | 8:55 PM

म्हात्रे यांच्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मी पार्टनरला सर्व पैसे दिले आहेत. त्यांना आणखी पैशाची लालच झाली आहे. पैशांसाठी माझ्याविरोधात खोटे आरोप करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात सर्व काही उघड होईल, असे कौस्तुभ देसाई यांनी सांगितले.

Kalyan Fraud : मनसे शहराध्यक्षांवर चार कोटी 11 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा
मनसे शहराध्यक्षांवर चार कोटी 11 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा
Follow us on

कल्याण : खोट्या सहीच्या आधारे फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई (Kaustubh Desai) व त्यांचे भाऊ कल्पेश देसाई या दोघांच्या विरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. देसाई यांचे पार्टनर गणेश म्हात्रे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. देसाई यांनी खोट्या सहीच्या आधारे बँकेतून 4 कोटी 11 लाख रुपये काढून पार्टनरची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस करीत आहेत. मात्र पार्टनरला सर्व पैसे दिले असून त्याला जास्त पैसे पाहिजेत. त्यामुळे त्याने आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा खुलासा कौस्तुभ देसाई यांनी केला आहे. (Fraud of Rs 4 crore 11 lakh against MNS city president in Kalyan)

जागा विकसित करण्यासाठी म्हात्रे आणि देसाई यांच्यात करार झाला होता

मनसेचे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई व त्यांचे भाऊ कल्पेश देसाई यांच्या विरोधात त्यांच्या पार्टनरने चार कोटी 11 लाख रुपये अपहार केल्याच्या आरोपाखाली महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेश म्हात्रे यांची तक्रार आहे की, गौरीपाडा येथे वडिलोपार्जित 20 गुंठे जागा विकसित करण्यासाठी कौस्तुभ देसाई यांच्यासोबत करार करण्यात आला होता. ड्रीम होम्स या संस्थेच्या नावाखाली हा करार केला होता. पैशाच्या व्यवहारासाठी एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यासाठी गणेशकडून सर्व कागदपत्रे घेतली गेली. नंतर कौस्तुभ देसाई यांनी सांगितले की, ही बँक बरोबर सेवा देत नाही. म्हणून जीपी पारसिक बँकेत खाते उघडले गेले. दरम्यान गणेश म्हात्रे यांनी ऑडीट केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांची चार कोटी 11 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक कौस्तुभ देसाई व त्यांच्या भाऊ कल्पेश यांनी केली आहे.

पैशांच्या लालसेतून केले आरोप : देसाई

एचडीएफसी बँकेतील खाते उघडले होते. ते उघडले गेले नाही असे गणेश यांना खोटे सांगण्यात आले होते. मात्र फ्लॅट धारकांनी या बँकेत जे पैसे जमा केले होते. ते चार कोटी 11 लाख रुपये खोट्या सहीच्या आधारे कौस्तुभ व कल्पेश देसाई यांनी काढून गणेश यांची फसवणूक केली. या प्रकरणी म्हात्रे यांच्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मी पार्टनरला सर्व पैसे दिले आहेत. त्यांना आणखी पैशाची लालच झाली आहे. पैशांसाठी माझ्याविरोधात खोटे आरोप करुन गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात सर्व काही उघड होईल, असे कौस्तुभ देसाई यांनी सांगितले. (Fraud of Rs 4 crore 11 lakh against MNS city president in Kalyan)

इतर बातम्या

Yavatmal Murder : डिजेवरचा ठेका जीवावर बेतला, यवतमाळमध्ये तरुणाची हत्या

Nanded Death : पोहण्याकरीता गेलेल्या दोन तरूणांचा गोदावरी नदी पात्रात बुडून करूण अंत