Nanded Death : पोहण्याकरीता गेलेल्या दोन तरूणांचा गोदावरी नदी पात्रात बुडून करूण अंत

Nanded Death : पोहण्याकरीता गेलेल्या दोन तरूणांचा गोदावरी नदी पात्रात बुडून करूण अंत
डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
Image Credit source: TV9

जय आणि गजानन हे दोघे मित्र शुक्रवारी दुपारी विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वर मंदिराच्या पाठीमागील गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, त्या दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही गोदावरी नदीत बुडून करूण अंत झाला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 19, 2022 | 6:48 PM

नांदेड : पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूण मित्रांचा शुक्रवारी सायंकाळी गोदावरी नदी पात्रातील पाण्यात बुडून (Drowned) करूण अंत झाला आहे. नांदेडच्या विष्णूपुरी भागातील श्री ‘काळेश्वर’ मंदिराच्या मागील गोदावरी नदीचे पात्रात तथा विष्णूपुरी प्रकल्पात घडली आहे. जय रूपेश पुजारी (19) आणि गजानन राजू हाटकर (28) अशी बुडून मृत्यू (Death) झालेल्या तरुणांची नावे आहेत. जय हा विजयनगरमधील तर गजानन हा दत्तनगर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्कमिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Two youngsters who went for swimming drowned in Godavari river)

अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले आणि बुडाले

जय आणि गजानन हे दोघे मित्र शुक्रवारी दुपारी विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वर मंदिराच्या पाठीमागील गोदावरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, त्या दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघांचाही गोदावरी नदीत बुडून करूण अंत झाला, अशी माहिती ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो.कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली. विशेष म्हणजे, धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या दुख:द घटनेमुळे पुजारी व हाटकर परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे नांदेड शहर व विष्णूपुरी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी विजय रूपेश पुजारी यांनी शनिवारी दिलेल्या माहितीच्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्र.पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल संजय रामदिनेवार याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

गोंदियात दोन दुचाकींच्या धडकेत एक ठार तीन जखमी

दोन अनियंत्रित दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी तालुक्यातील मुंगली गावात घडली आहे. नक्षीकांत वाघाडे (50) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो भिवखिडकी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. (Two youngsters who went for swimming drowned in Godavari river)

इतर बातम्या

Jalna Murder : जालन्यात तरुण ट्रक चालकाची दगडाने डोकं ठेचून हत्या

ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 4 वर्ष मुंबईच्या तुरुंगात खितपत पडलेला टेबल टेनिसपटू निर्दोष, न्यायालयाकडून सुटकेचे आदेश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें