MNS vs BJP : राज ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदाराने डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्षांना दिला मोठा धक्का

MNS vs BJP : डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदाराने भाजप प्रदेशाध्यक्षांना मोठा धक्का दिला आहे. या खेळीची राज्याच्या राजकीय वर्तुळात नक्कीच चर्चा होईल. काल मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल केला.

MNS vs BJP : राज ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदाराने डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्षांना दिला मोठा धक्का
Ravindra Chavan-Raj Thackeray
| Updated on: Sep 07, 2026 | 7:22 AM

ठाण्यात काल राज ठाकरे यांच्या पक्षाचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल केला. जीडीपी, मराठी-अमराठी वाद कसा निर्माण केला जातोय, दंगली घडवण्याचा कट असे अनेक मुद्दे राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून मांडले. मनसेच्या या पदाधिकारी मेळाव्यानंतर ठाणे जिल्ह्यातच मनसेने भाजपला मोठा झटका दिला. महत्वाचं म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासाठी हा धक्का आहे. डोंबिवलीत मनसेने भाजपला मोठा धक्का दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या घराशेजारीच रविवारी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी घरवापसी केली.सोबत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनाही मनसेत आणलं.

“दोन गेले, चार घेऊन आले” रवींद्र चव्हाण यांच्या प्रभागातील महिलांचा राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. चव्हाणांच्या घराशेजारीच पक्षप्रवेश; “घाबरण्याची गरज नाही” म्हणत राजू पाटील यांचा भाजपला टोला. दरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीनंतर राजू पाटील यांनी “हे फटाके रवींद्र चव्हाण यांनी वाजवले का?” अशी मिश्किल टिप्पणी केली. भाजपमधून आलेल्या महिलांना कॅम्प लावायची सवय आहे. त्यांना मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या देणार अशी राजू पाटील यांनी ग्वाही दिली. “आज फक्त झलक आहे, कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही” असा मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी भाजपला थेट इशारा दिला.

योग्य वेळी उत्तर देऊ

‘पुढच्या अडीच वर्षांत मी आमदार होणार, 100 टक्के’ असा राजू पाटील यांनी दावा केला आहे. SIR-EVM वरून भाजपवर निशाणा साधला. कल्याण ग्रामीणमध्ये SIR प्रक्रियेत 2 लाख 55 हजार मतदारांची नावे वगळल्याचा राजू पाटील यांचा दावा. मतदार यादीवर गंभीर सवाल उपस्थित केला. “EVM नंतर SIR हा सत्ताधाऱ्यांचा प्लॅन बी” निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही राजू पाटील यांचा थेट आरोप.

“शेवटच्या दोन दिवसांत समीकरणं बदलली, त्यातून धडा घेतला; पुढच्या अडीच वर्षांत आमदार होणारच” असा विश्वास राजू पाटील यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा. भाजपंविरोधात नाराजी वाढल्याचा दावा, “भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाही, योग्य वेळी उत्तर देऊ” असं राजू पाटील म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us