Sharad Pawar : आंदोलकांचा घरात घुसून पवारांना इजा करण्याचा डाव होता, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Apr 10, 2022 | 3:59 PM

शरद पवार यांच्या घराचे दरवाजे कसे उघडे असतात, याची सर्व चौकशी केली होती. त्यामुळे माझा असा आरोप गंभीर आरोप आहे की त्यांनी घरात घुसून शरद पवारांना इजा केली असती, असा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Sharad Pawar : आंदोलकांचा घरात घुसून पवारांना इजा करण्याचा डाव होता, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप
जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर (St Worker Protest)  राज्यात जोरदार आरोप प्रत्योरोप सुरू आहेत. याच मुद्द्यावरून मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. शरद पवार हे शरद पवार आहेत .कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर आम्हाला सांगितले होते की माझी शस्त्र क्रिया झाली आहे .त्यावेळी डॉक्टर यांना आराम करण्यास संगितले, मात्र त्यांच्या पत्नीने सांगितले जाऊ द्या त्यांना हीच त्यांची ऊर्जा आहे. तसेच ते हल्ला झाल्यानंतर देखील दुसऱ्या कामाला निघाले. हे सांगताना जितेंद्र आव्हाडांनी आरोप किला आहे की, शरद पवाांच्या घरात घुसून त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे पुन्हा एखदा खळबळ माजली आहे. गेल्या दोन दिवसांपासून यावरून मोठा पॉलिटिकल गदारोळ सुरू आहे.

पवारांच्या घराचा दरवाजा तुटला असता तर?

दरम्यान जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवार हे घाबरणारे नाहीत, महात्मा गांधी देखील घाबरणाऱ्यांपैकी नव्हते त्यांच्यावर 5 वेळा हल्ला केला. माझे स्पष्ट मत आहे की परवारांच्या घारावरील हल्ला हा प्लांट होता. तो कट होता, त्यांनी रेकी केली होती, शरद पवार यांच्या घराचे दरवाजे कसे उघडे असतात, याची सर्व चौकशी केली होती. त्यामुळे माझा असा आरोप गंभीर आरोप आहे की त्यांनी घरात घुसून शरद पवारांना इजा केली असती, असा थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अजूनही विष पेरण्याचे काम सुरू

या लोकांच्या आधी बैठका झालेल्या होत्या आणि मी पहिल्यापासूनच सांगतोय जर पवारांच्या घराचा दरवाज्यात तुटला असता आणि हे दारू पेलेले 5 ते 10 लोक घरात घुसले असते तर? असा सावलही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. घरचे सावध झाले तेव्हा हे प्रकरण अटोक्यात आलं. अमरावतीच्या ठिकाणी एक माणूस बोलतो शरद पवार यांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत. फ्रांसच्या राज्य क्रांतीत जे काय झाले ते होईल. म्हणजेच तुम्ही असे करणार असा याचा अर्थ होतो, असेही ते म्हणाले आहेत. आता देखील शरद पवार यांच्याबाबत महाराष्ट्रात विष पेरण्याचे काम काही संघटना करत आहेत, असा आरोपही पुन्हा आव्हाडांनी केला आहे.

Raosaheb Danve: शिवसेनेने दिवसाढवळ्या बगावत केली, सत्ता गेल्याचं नाही, धोका दिल्याचं दु:ख; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

Devendra Fadnavis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे का?; फडणवीस काय म्हणाले?

Raosaheb Danve: राज ठाकरेंनी मला पेढे दिले, मी त्यांना रेल्वेचं इंजिन गिफ्ट दिलं; रावसाहेब दानवेंना नेमकं सांगायचंय काय?