AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपघाताची मोठी अपडेट ! जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना काळाचा घाला; जखमींची नावे जाहीर

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

अपघाताची मोठी अपडेट ! जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना काळाचा घाला; जखमींची नावे जाहीर
accidentImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 10:33 AM
Share

खोपोली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीत खासगी बस कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 4 वाजता हा भीषण अपघात झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील जयंतीचा कार्यक्रम आटोपून येत असताना प्रवाशांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रवाशांमध्ये गोरेगावाच्या बाजीप्रभू ढोलताशा पथकाचे कार्यकर्तेही होते. त्यातील काहीजण अपघातात जखमी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, दरीत रेस्क्यूचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पुण्यावरून मुंबईला ही खासगी बस जात होती. पहाटे 4च्या सुमारास ही बस जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बाजूलाच असलेल्या दरीत ही खासगी बस कोसळली. ही दरी 400 ते 500 फूट खोल आहे. एवढ्या उंचावरून बस कोसळल्याने बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या बसमधून 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व जण बाजीप्रभू ढोलताशा पथक गोरेगाव येथील आहेत, सूत्रांनी सांगितलं.

जयंतीहून येत असताना अपघात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हे पथक पुण्यात कार्यक्रमासाठी गेलं होतं. कार्यक्रम करून मुंबईला जात असताना हा अपघात घडला. अपघातातील 13 जणांवर काळाने घाला घातला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील सर्व जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमींची संख्या अधिक असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

दरम्यान, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून आज पहाटे झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबींयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अपघातानंतर तातडीने मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीममधील तरुणांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या संकटसमयी मदतकार्यात तातडीने धावून आल्याबद्दल या टीमच्या सदस्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

घटना दुर्देवी

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून प्रवासी मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी, वेदनादायक आहे. घटनेतील जखमींना तत्काळ उपचार मिळून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अपघातातील जखमींची नावे

1) नम्रता रघुनाथ गावणूक, वय 29 2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 गोरेगाव. 3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 गोरेगाव. 4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 गोरेगाव. 5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 गोरेगाव. 6) लवकुश रंजित कुमार प्रजाती, वय 16 गोरेगाव. 7) आशिष विजय गुरव, वय 19, दहिसर. 8) सनी ओमप्रकाश राघव, वय 21, खालची खोपोली. 9) यश अनंत सकपाळ, वय 19, गोरेगाव. 10) वृषभ रवींद्र थोरवे, वय 14-गोरेगाव. 11) शुभम सुभाष गुडेकर, गोरेगाव. 12) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 कांदिवली. 13) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 कांदिवली. 14) रुचिका सुनील धूमणे, वय 17, गोरेगाव. 15) ओम मनीष कदम, वय 18, गोरेगाव. 16) युसूफ उनेर खान, वय 14, गोरेगाव. 17) अभिजित दत्तात्रय जोशी, वय 20, रत्नागिरी. 18) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15, मुंबई. 19) हर्ष वीरेंद्र दुरी, वय 20, कांदिवली. 20) ओमकार जितेंद्र पवार, वय 24, खोपोली, सोमजाई वाडी ळ. 21) दिपक विश्वकर्मा, वय 21, कांदिवली. 22) हर्षदा परदेशी 23) वीर मांडवकर 24) मोहक दिलीप सालप, वय 18. मुंबई.

मयत

1) जुई सावंत, वय 15, गोरेगाव.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.