AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC : कल्याण-डोंबिवलीतील एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

या पक्ष प्रवेशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशात जे सांप्रदायिक वातावरण तयार होत आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार आहे. या विचारानुसार सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.

KDMC : कल्याण-डोंबिवलीतील एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
एमआयएम, भाजपच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेशImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 2:56 PM
Share

कल्याण : कल्याण-डोंबिवलीचे एमआयएम पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अयाज गुलजार मौलवी, कल्याण-डोंबिवलीमधील एमआयएम नगरसेवक तन्झिला अयाज मौलवी, ॲड. आर. झेड. हास्मी, अर्शद शब्बीर शेख, मोहम्मद मेहबूब शेख, अकदूस सोहेल सुसे, हरमीत सिंग गुप्ता यांच्यासह 105 पदाधिकाऱ्यांनी आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल दिनकरशेठ पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला गोसावी, भाजपच्या नगरसेविका सुनिता खंडागळे, माजी नगरसेवक फैसल जलास यांनीही राष्ट्रवादी (NCP)त यावेळी जाहीर प्रवेश केला. कल्याण ग्रामीणमधील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच आणि मनसे, युवासेना, आरपीआय, समाजवादी पार्टी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी पक्षप्रवेश झाला. (MIM and BJP corporators from Kalyan-Dombivali joined NCP In the presence of Jitendra Avhad)

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार : आव्हाड

या पक्ष प्रवेशावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. देशात जे सांप्रदायिक वातावरण तयार होत आहे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र आणण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचा पक्षाचा विचार आहे. या विचारानुसार सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. वाढत्या महागाईचा भार सामान्य माणसाच्या खिशावर पडतो याची जाणीव केंद्र सरकारला नाही. याउलट देशाला संविधान देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला न जुमानण्याची भूमिका आज केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी घेतलेली दिसत आहे. ही भूमिका म्हणजे देशासाठी पहिली धोक्याची घंटा असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीतील आगामी निवडणुकांसाठी माजी आमदार जगन्नाथ शिंदे आणि सुधीर वंडारशेठ पाटील शहरात पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, कल्याण शहराध्यक्ष सुधीर वंडारशेठ पाटील तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. (MIM and BJP corporators from Kalyan-Dombivali joined NCP In the presence of Jitendra Avhad)

इतर बातम्या

Navneet Rana on Hanuman Chalisa: बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा विसर पडलाय का?; नवनीत राणा यांचा शिवसेनेला सवाल

Chandrasekhar Bavankule | अमोल मिटकरींकडून धार्मिक वातावरण बिघडविण्याचे काम, यवतमाळात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ब्राम्हण समाजाची माफी मागावी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.