Loksabha Election 2024 | कल्याण लोकसभेच्या जागेवरुन मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठ वक्तव्य

| Updated on: Sep 24, 2023 | 5:12 PM

Loksabha Election 2024 | मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार असलेल्या कल्याण लोकसभा क्षेत्राबद्दल राजू पाटील काय म्हणाले?. रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान केलय.

Loksabha Election 2024 | कल्याण लोकसभेच्या जागेवरुन मनसे आमदार राजू पाटील यांचं मोठ वक्तव्य
MNS RAJU PATIL
Follow us on

कल्याण (सुनील जाधव) : लोकसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. पुढच्यावर्षी 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होतील. त्यासाठी आतापासून आघाड्या, युती यांची मोर्चेबांधणी सुरु झालीय. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीला आकाराला आली आहे. यात 24 पेक्षा जास्त पक्ष आहेत. दुसऱ्याबाजूला भाजपाच्या नेतृत्वाखाली NDA सुद्धा स्वत:ला अधिक भक्कम बनवत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापासून काही लोकसभा मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. मित्र पक्षाच्या जागेवरच सहकारी पक्षाकडून दावा सांगितला जातोय. मित्रपक्ष असला, तरी पाठीमागच्या दाराने मोर्चेबांधणी सुरु झालीय. सध्या महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादीच सरकार आहे. तिन्ही पक्षात अजून जागा वाटपाची कुठलीही बोलणी किंवा चर्चा झालेली नाही.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेच्या जागेवरुन एक मोठ वक्तव्य केलय. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कल्याण-डोंबिवली मतदारसंघाच लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. “कल्याण लोकसभेची वाटचाल बीजेपी उमेदवाराच्या दिशेने चालली आहे” असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलय. “कल्याण लोकसभा ही पूर्वीपासून भाजपचीच होती. मात्र ज्या वेळेला भाजपचा काही चालत नव्हतं, त्यावेळेस स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी आपल्याकडे खेचून घेतली होती. आत्ता कुठेतरी भाजप वरचढ होत असताना दिसून येत असून, ते संधी सोडतील असं मला वाटत नाही” असं राजू पाटील म्हणाले.

रोहित पवार यांच्यानंतर राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य

“भाजपची एक पद्धत राहिली आहे, ज्याप्रमाणे रोहित पवार बोलले ते बरोबर बोलले. भाजप नेहमी समोरच्या पक्षाला छोटं करायला बघतो. दाबायला बघतो. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्या अनुषंगाने इकडच्या वाटाघाटी बघितल्या तर ही कल्याण लोकसभेची वाटचाल बीजेपी उमेदवाराच्या दिशेने चाललेली आहे” असं राजू पाटील म्हणाले. कल्याण लोकसभेबाबत रोहित पवार यांच्या वक्तव्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मोठं विधान केलय. राज पाटील हे कल्याण ग्रामीणमधून मनसेचे आमदार आहेत. 2019 सालच्या निवडणुकीत विधानसभेवर निवडणूक जाणारे ते मनसेचे एकमेव आमदार आहेत.