एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा, दोघे पोलिसांच्या ताब्यात

मनसेच्या (MNS) दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वसईत (Vasai) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यक्रमातच राडा केला.

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसैनिकांचा राडा, दोघे पोलिसांच्या ताब्यात
वसईत एकनाथ शिदेंच्या कार्यक्रमात मनसेने घोषणाबाजी केली
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 3:40 PM

वसई : शिवसेनेचे दिग्गज नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वसईतील कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. “आयुक्त साहेब वेळ द्या, आयुक्त साहेब वेळ द्या” अशा घोषणा मनसे कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यानंतर वसई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. (MNS workers ruckus at Eknath Shinde Program in Vasai)

मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमातच राडा केला. पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना बेदम चोप देत कार्यक्रमातून बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे वसईत आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. एकनाथ शिंदेंकडे ठाण्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा आहे.

परिवहन सेवेवरुन बविआ-शिवसेना आमनेसामने

दरम्यान, वसई-विरार परिवहन सेवा सुरू करण्यावरुन बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचं राजकारण सुरु झालं आहे. लॉकडाऊनच्या काळात परिवहन सेवा बंद झाली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच महापालिका हद्दीत बविआने उद्घाटन करुन सेवा सुरु केली.

आता हीच परिवहन सेवा आम्ही सुरु केली असल्याचा दावा करत, या परिवहन सेवेचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळा वसई विरार महानगरपालिकेच्या वतीने आज आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा (Black magic against Eknath Shinde) केला जात असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. शिंदेंच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत पाहायला मिळाले होते. आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

एकनाथ शिंदेंविरोधात जादूटोणा, मोठं राजकीय षडयंत्र?

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, वाशी टोल नाक्याजवळची घटना

(MNS workers ruckus at Eknath Shinde Program in Vasai)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.