Thane : ठाण्यात नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी “मॉर्निंग वॉक प्लाझा”, महापालिका आयुक्तांची नवी संकल्पना

| Updated on: Mar 24, 2022 | 9:46 PM

सध्यस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निंग वॉक महत्चाचा विषय आहे. यासाठी शहरातील उपवन परिसरात वाहतूक विभागाशी समन्वय साधून "मॉर्निंग वॉक प्लाझा'' ही नवीन संकल्पना राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला असून या संदर्भातील ट्रॅकचा पाहणी दौरा आज करण्यात आला.

Thane : ठाण्यात नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक प्लाझा, महापालिका आयुक्तांची नवी संकल्पना
ठाण्यात नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी "मॉर्निंग वॉक प्लाझा"
Image Credit source: TV 9
Follow us on

ठाणे : शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच पोस्ट कोव्हिडनंतरच्या काळात सकाळच्या वेळेत व्यायाम (Exercise) व मॉर्निंग (Morning Walk) वॉक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. नागरिकांना सुरक्षितपणे व्यायाम व चालता यावे यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Vipin Sharma) यांच्या संकल्पनेतून ठाण्यात 3 ठिकाणी येत्या 1 एप्रिल, 2022 पासून ”मॉर्निंग वॉक प्लाझा” सुरू करण्यात येणार आहे. आज सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत उपवन परिसरात ‘मॉर्निंग वॉक ट्रॅक’ संदर्भात पाहणी केली. (Morning Walk Plaza, new concept of Municipal Commissioner for better health of citizens in Thane)

यावेळी अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनिष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील, सर्व कार्यकारी अभियंता तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची नवीन संकल्पना

सध्यस्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मॉर्निंग वॉक महत्चाचा विषय आहे. यासाठी शहरातील उपवन परिसरात वाहतूक विभागाशी समन्वय साधून “मॉर्निंग वॉक प्लाझा” ही नवीन संकल्पना राबविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला असून या संदर्भातील ट्रॅकचा पाहणी दौरा आज करण्यात आला. यामध्ये महापौर निवासस्थान ते पायलादेवी मंदिर चौक, वीर बिरसा मुंडा चौक ते डॉ. काशिनाथ नाट्यगृह आणि धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार ते वाहतूक पोलीस ऑफिस या ठिकाणी “मॉर्निंग वॉक प्लाझा” तयार करण्यात येणार आहे. दररोज सकाळी 5.30 ते 8.00 या कालावधीत हा मॉर्निंग वॉक प्लाझा सुरु राहणार आहे. या वेळेत वाहतूक विभागाशी समन्वय साधून या ठिकाणाची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. दरम्यान उपवन परिसरात तातडीने मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे काम हाती घेवून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच दोन्ही बाजूला पदपथ बांधणे, स्वच्छता, साफसफाई, भिंतीची रंगरंगोटी व वृक्ष लागवडही करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. (Morning Walk Plaza, new concept of Municipal Commissioner for better health of citizens in Thane)

इतर बातम्या

युट्युब चॅनेलद्वारे भोंदूगिरीचा प्रसार, नरबळीच्या तयारीत असलेल्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Breaking : सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणांची चौकशी आता सीबीआयकडे