AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar Crime : गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात, केबल व्यावसायिक हत्या प्रकरणात घेतला ताबा

या प्रकरणात सुरेश पुजारीसह एकूण 12 जणांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुरेश पुजारी 15 वर्षांपासून परदेशात बसून गुन्हेगारी कारवाया करत असल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. 2021 साली फिलिपाईन्स देशात त्याला अटक करून भारताच्या ताब्यात देण्यात आलं.

Ulhasnagar Crime : गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात, केबल व्यावसायिक हत्या प्रकरणात घेतला ताबा
गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यातImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 14, 2022 | 5:30 PM
Share

उल्हासनगर : कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी (Suresh Pujari) याचा उल्हासनगर पोलिसांनी ताबा (Detained) घेतला आहे. साल 2015 सालच्या केबल व्यावसायिक सच्चू कारीरा हत्याप्रकरणाच्या तपासासाठी पुजारीला उल्हासनगरला आणण्यात आलंय. उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड हे स्वतः या प्रकरणाचा तपास करणार आहेत. उल्हासनगरचे केबल व्यावसायिक सच्चानंद उर्फ सच्चू कारीरा यांच्यावर 11 सप्टेंबर 2015 रोजी गोलमैदान परिसरातील त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात कारीरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी स्वतः सुरेश पुजारी यानं न्यूज चॅनेल्सना फोन करून स्वीकारली होती. (Notorious gangster Suresh Pujari in Ulhasnagar police custody in murder and ransom case)

सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतः करणार पुजारीची चौकशी

या प्रकरणात सुरेश पुजारीसह एकूण 12 जणांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुरेश पुजारी 15 वर्षांपासून परदेशात बसून गुन्हेगारी कारवाया करत असल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. 2021 साली फिलिपाईन्स देशात त्याला अटक करून भारताच्या ताब्यात देण्यात आलं. तेव्हापासून महाराष्ट्रात त्याच्याविरोधात दाखल असलेल्या 24 गुन्ह्यांचा क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. यापैकी 15 गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतले, 7 गुन्हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतले, तर प्रत्येकी एक गुन्हा हा नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आहे. यानंतर उल्हासनगर पोलिसांनी त्याचा ताबा मिळावा यासाठी विशेष मोक्का न्यायालयात अर्ज करून सुरेश पुजारीचा ताबा घेतला. त्याला गुरुवारी 14 एप्रिल रोजी उल्हासनगरात आणण्यात आलं असून त्याची सच्चानंद करीरा हत्या प्रकरणात स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड हे चौकशी करणार आहेत.

अनेक राजकारणी आणि उद्योगपतींना खंडणीसाठी दिल्या होत्या

सुरेश पुजारी हा पूर्वी गँगस्टर रवी पुजारीच्या टोळीत काम करत होता. मात्र 2011 साली त्याने रवी पुजारीपासून फारकत घेत स्वतःची गॅंग सुरू केली. यानंतर त्याने ठाणे जिल्ह्यात दहशत माजवायला सुरुवात केली होती. राष्ट्रवादीचे सध्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार गणपत गायकवाड, पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांच्यासह अनेक राजकारणी, व्यापारी, बिल्डर यांना पुजारी याने खंडणीसाठी फोन करून धमक्या दिल्या होत्या. तर काही ठिकाणी त्याने गोळीबारही केला होता. अखेर त्याला अटक झाल्यानंतर हे धमक्यांचं सत्र थांबलं आहे. आता सच्चानंद कारीरा हत्याप्रकरण आणि इतर धमक्यांच्या प्रकरणात सुरेश पुजारी पोलिसांना काय माहिती देतो? हे पाहावं लागणार आहे. (Notorious gangster Suresh Pujari in Ulhasnagar police custody in murder and ransom case)

इतर बातम्या

Roha Suicide : रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

Pune Crime : कात्रज दरीत आढळला जळालेल्या अवस्थेतला तरुणाचा मृतदेह

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anna Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक