Roha Suicide : रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

आरोपी रविंद्र वाघमारे हा रोहा तालुक्यातील शेनवई येथील रहिवासी आहे. आरोपीने अज्ञात कारणातून आपल्या पत्नीची हत्या केली होती. याच हत्या प्रकरणात आरोपीला 9 एप्रिल 2022 रोजी रोहा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 16 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.

Roha Suicide : रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Apr 14, 2022 | 4:44 PM

रोहा / संतोष दळवी (प्रतिनिधी) : रायगड जिल्हातील रोहा पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या आरोपी (Accused)ने आज पोलिस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपीने चादरीची किनार फाडून त्या सहाय्याने पोलिस ठाण्यातील बाथरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. रविंद्र वसंत वाघमारे (25) असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती घेण्यासाठी पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली का ? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. (Accused commits suicide by hanging in lockup at Roha police station)

पत्नीच्या हत्येप्रकरणी पोलिस कोठडीत होता आरोपी

आरोपी रविंद्र वाघमारे हा रोहा तालुक्यातील शेनवई येथील रहिवासी आहे. आरोपीने अज्ञात कारणातून आपल्या पत्नीची हत्या केली होती. याच हत्या प्रकरणात आरोपीला 9 एप्रिल 2022 रोजी रोहा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 16 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सध्या आरोपी रोहा पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. आरोपीला पोलिस ठाण्यात झोपण्यासाठी दिलेल्या चादरीची किनार फाडून त्याच्या सहाय्याने त्याने बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. (Accused commits suicide by hanging in lockup at Roha police station)

इतर बातम्या

Nalasopara Crime : नालासोपाऱ्यात प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या

Sandeep Godbole | शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरण, संदीप गोडबोलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें