Sandeep Godbole | शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरण, संदीप गोडबोलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Sandeep Godbole | शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरण, संदीप गोडबोलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी
शरद पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणात नागपुरातील एकाला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 3:19 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर एसटी आंदोलकांनी केलेल्या कथित हल्ला केल्या प्रकरणी नागपुरातून अटक करण्यात आलेल्या संदीप गोडबोलेला (Sandeep Godbole) मुंबईतील कोर्टाच्या दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्या सांगण्यावरूनच पवारांच्या घरावर एसटी कर्मचारी धडकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटकही करण्यात आली होती. तर पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शनही उघड झालं आहे. नागपुरातील एसटी कर्मचारी संदीप गोडबोलेला मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतलं होतं. गोडबोले महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात यांत्रिक पदावर कार्यरत असून पवारांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या वेळी तो सदावर्तेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

गोडबोले आमदार निवासमध्ये थांबला

सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप गोडबोले या सगळ्या कटात सूत्रधार म्हणून काम पाहत होता. त्याला आज कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे. गोडबोले आमदार निवासमध्ये थांबला होता. त्याने कोर्टासमोर स्वतः हे मान्य केलं आहे. कोणत्या आमदाराच्या ओळखीवरून तो आमदार निवासला थांबला हे तपासायच आहे चौकशी केली जाईल, असंही वकिलांनी सांगितलं.

गोडबोलेला पोलीस कोठडी, एएनआयचे ट्वीट :

सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी

8 एप्रिल रोजी झालेल्या राड्याबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना कोर्टात हजर केलं असता आधी दोन आणि पुन्हा दोन अशी चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर काल सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आलाय. इतकंच नाही तर सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहआरोपी करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होता.

संबंधित बातम्या :

पवारांच्या घरावरील हल्ल्याचं नागपूर कनेक्शन अखेर उघड

चला भाऊ मीडिया आली, शरद पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणातील दोन आरोपींचं संभाषण उघड, संदीप गोडबोलेला ऐकलं का?

सदावर्तेंवर तिसऱ्यांदा वकील बदलण्याची वेळ, न्यायलयीन कोठडीत रवानगी, कोर्टातला युक्तीवाद वाचलात?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.