Pandu Marathi Movie: ‘पांडू’च्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी

| Updated on: Dec 05, 2021 | 1:30 PM

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये पांडू या मराठी सिनेमाचा पहिला शो पार पडला. यावेळी पांडूच्या कलाकारांनी कोरोना नियमांचा भंग केला आहे.

Pandu Marathi Movie: पांडूच्या कलाकारांकडून कोरोना नियमांचा भंग, रिपाइंची गुन्हे दाखल करण्याची मागणी
Pandu Marathi Movie
Follow us on

ठाणे: ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये पांडू या मराठी सिनेमाचा पहिला शो पार पडला. यावेळी पांडूच्या कलाकारांनी कोरोना नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे. कोरोनाच्या नियमांचा भंग करणार्‍या सामान्य नागरिकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. मात्र, सेलिब्रिटींसाठी वेगळा नियम आहे का?, असा सवालही इंदिसे यांनी केला आहे.

भैय्यासाहेब इंदिसे यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला. तसेच वर्तक नगर पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा मागणी केल्याचं इंदिसे यांनी सांगितलं. ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी पांडू या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनिस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रीके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रेटींने मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नाही. विशेष म्हणजे, मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन लस घेणे सक्तीचे असताना एकाच्याही लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पाहणी करण्यात आली नाही, असा दावा इंदिसे यांनी केला आहे.

तर तिसरी लाट अटळ

या कलावंतांनी दोन्ही लस घेतल्या असतीलही, पण, त्यांनी कोरोनासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. एकीकडे सामान्य नागरिकांनी मास्क न वापरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कलावंतांवर अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अनेकदा कलावंतांचे अनुकरण सामान्य लोक करीत असतात. त्यामुळे येथेही असे अनुकरण झाले तर तिसरी लाट अटळ आहे. त्यामुळे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या तत्त्वाने संबधित कलाकारांवर पँडामिक अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी इंदिसे यांनी केली आहे. या संदर्भात इंदिसे यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात निवेदनही दिले आहे.

 

संबंधित बातम्या:

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला! कुशल बद्रिकेच्या साथीने भाऊ कदम करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

Marathi Movie | कौतुकास्पद पाऊल, देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित होणार मराठी चित्रपट ‘अजिंक्य’!

Happy Birthday Amruta Khanvilkar | ‘वाजले की बारा..’ म्हणत गाजवलं मराठी विश्वं तर, हिंदीतही अमृता खानविलकरला पाहण्यास प्रेक्षक ‘राझी’!